रिपब्लिकन सेनेचे आनंदराव नेरलीकर यांचे निधन -NNL


परभणी|
जिल्ह्याचे पाहिले आमदार स्मृतिशेष माधवराव नेरलीकर ( एम डी नेरलीकर )यांचे चिरंजीव   आनंदराव नेरलीकर यांचे हृदयविकाराने शुक्रवारी रात्री साडे अकरा दुःखद निधन झाले. शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर पूर्णा ( जं) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .मृत्यू समयी त्याचे वय ७५ वर्ष होते .

रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आंदरराज आंबेडकर यांचे ते विश्वासू सहकारी होते. रिपब्लिकन सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य होते. आंबेडकरी चळवळीत त्याचे जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. पाश्चात भाऊ गौतम,सरकारी वकील  ऍड मिलिंद, न्यायाधीश राजेश नेरलीकर, मुंबई हायकोर्ट येथील सरकारी वकील महेंद्र नेरलीकर हे बंधू , तीन बहिणी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुलगा भूषण नेरलीकर हे उल्हासनगर येथे न्यायाधीश आहेत. 

परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे,आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते विजय वाकोडे, वंचित चे माजी जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक दादाराव पंडित, लोह्याचे माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल , पूर्णाचे माजी नगराध्यक्ष संतोष एकलारे, पूर्णा शहर तसेच जिल्ह्यातील विविध भागातून सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते अंत्यसंस्कारा साठी उपस्थित होते मान्यवरांनी त्यांच्या आंबेडकरी चळवळीतील कार्याचा अनेक मान्यवरांनी गौरव करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी