नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पिकविम्याचे 131 कोटी रुपयाचा दुसरा हफ्ता तात्काळ वाटप करा -NNL

रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांची कृषिमंञी दादाजी भुसे यांच्याकडे मागणी


मुखेड, रणजित जामखेडकर|
जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीमधुन 461 कोटी रुपयांचा परतावा शेतकर्‍यांना मंजुर असुन त्यापैकी 73 टक्यानुसार शेतकर्‍यांना 330 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा असुन ऊर्वरीत 27 टक्याचे नांदेड जिल्ह्याचे 131 कोटी रुपये अद्यापपर्यत शेतकर्‍यांना वाटप झाले नसल्याने रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी केली.

या मागणीसाठी त्यांनी थेट मंञालय गाठुन सरकार व विमाकंपनी यांच्यातला सबसिडीचा वाद बाजुला ठेवुन 7 लाख 35 हजार 811  शेतकर्‍यांना तात्काळ पिकविमा वाटप करणे. बाबत इफको टोकोयो पिक विमा कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी मंञालयात कृषिमंञी दादाजी भुसे यांच्याकडे केली.

नांदेड जिल्ह्यात इफको टोकोयी पिक विमा कंपनीकडे एकुण 7 लाख 35 हजार 811  शेतकर्‍यांना पिक विमा मंजुर असुन त्यापैकी मंजुर रक्कमेच्या  73 टक्याचे 330 कोटी शेतकर्‍यांचा खात्यावर टाकण्यात आले तर 27 टक्के नुसार 131कोटी रुपये ईफको टोकीयो पिक विमा कंपनी शेतकर्‍यांचे देणे असुन यासाठी जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी पिक विमा कंपनीकडे वेळोवेळी पाठपुरावा व पञव्यवहार केला.

यावेळी शासनाकडुन सबसिडी येणे बाकी असल्याचे सांगण्यात आल्याने ढोसणे यांनी थेट मंञालय गाठत सरकार व विमा कंपनीचा वाद बाजुला सारुन शेतकर्‍यांचे शिल्लक असलेले नैसर्गिक आपत्तीमधील मंजुर परताव्याचे 131 कोटी रुपये तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यावर टाकण्याचे आदेश आपल्या स्तरावरुन विमा कंपनीला द्यावेत लवकरात लवकर हा विषय निकाली काढावा अशी मागणी रयतचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी कृषि मंञी दादाजी भुसे यांच्याकडे केली.या मागणीसाठी थेट मंञालय गाठल्याने शेतकर्‍यातुन समाधान व्यक्त होत आहे.

शेतकर्‍यांना 100 टक्के रक्कमही  नैसर्गिक आपत्ती मधुन तात्काळ देणे बंधनकारक असताना शासन निर्णय असताना दोन हफ्ते पाडुन शेतकर्‍यांची थट्टा करण्याचा प्रकार शासन व पिकविमा कंपनीने कैला असुन याबाबत सरकार व कंपनी व संबधित विभागाविरुध्द न्यायालयात दाद मागणार असल्याचे रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी सांगीतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी