वसरणी येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक -NNL


नविन नांदेड| 
ग्रामीण पोलीस स्टेशन हदीतील वसरणी भागातील अनोळखी पुरूष जातीच्या मृतदेह आढळून आला होता  या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पथकाने या खुन प्रकरणी तिनं जणांना अटक केली असून दोन फरार आरोपी चा शोध घेत आहेत व मयताची ओळख  पटली असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अटक केलेले संबंधीत आरोपी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्वाधिन दिले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी प्रसिध्दी केलेल्या पत्रकात दिनांक 21 मार्च 22 रोजी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्यीत वसरणी येथे एक अनोळखी इसमाचे त्याचे शरीरावर जखमा असलेले प्रेत आढळुन आले होते. सदरची माहीती स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड ला मिळाल्याने सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून सदर घटनास्थळी स्था. गु. शा. चे डी. जी. चिखलीकर पोलीस निरीक्षक, पी. डी. भारती स. पो. नि. व स्टाफ यांनी तात्काळ जाऊन घटनास्थळाला भेट दिली व मयताचे फोटो काढुन सदर मयताची ओळख पटविण्यासाठी व्हॉटसअॅपव्दारे बातमीदारांना पाठविले. 

त्यावरुन सदर मयताची ओळख पटली असुन सदर मयताचे नाव गजेंद्र ऊर्फ बिल्टा कैलास ठाकुर वय 17 वर्षे रा सांगवी, नांदेड असे असल्याचे समजले. त्यानंतर स्था. गु. शा. चे पथकाला यातील मयताचा खुन इसम नामे योगेंद्र ठाकुर, सुरेंद्र ठाकुर, निलेश पेनुरकर, चारुदत्त बालाजी वाघमारे यांनी केला असल्याची माहीती गुप्त बातमीदाराकडुन मिळाली. त्यावरुन स्थागुशा चे पथकाने संशयीत आरोपीतांचा शोध घेतला असता, योगेंद्र ठाकुर, सुरेंद्र ठाकुर, निलेश पेनुरकर हे तीन आरोपी मिळुन आले त्यांचेकडे सदर गुन्हयासंबंधाने त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगीतले आहे. सदर प्रकरणी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुरनं. 175/2022 कलम 302,34 भा द वि प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील पकडलेल्या तिनही आरोपीतांना पुढील कायदेशिर कार्यवाहीस्तव पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांच्या ताब्यात दिले असुन सदर गुन्हयातील इतर दोन फरार आरोपीतांचा शोध घेणे सुरु आहे.

सदरची कामगिरी  प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, नांदेड, व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक  सचिन सोनवणे, अशिष बोराटे, सहायक पोलिस उपनिरीक्षक जसवंतसिंह शाहु, गोविंद मुंडे, पोहेकॉ मारोती तेलंग, संजय केंद्रे, सखाराम नवघरे, पोलीस नायक हाणमंत पोतदार, दासरवार, सुरेश घुगे, विठल शेळके, पोकॉ तानाजी येळगे, मोतीराम पवार, बजरंग बोडके, विलास कदम, गजानन बयनवाड, चालक/कलीम शेख बालाजी मुंडे , यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी