हिमायतनगर| वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत ग्रामीण कृषी जागृकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या रोहिणी मुरलीधर सोमवंशी हिने तालुक्यातील मौजे कार्ला येथे शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी बांधवाना दिली.
आयोजित कृषी अभ्यास दौऱ्यात रोहिणी सोमवंशी हिने कारला गावातील शेतकऱ्यांना माती परीक्षण, चारा प्रक्रिया, बीजप्रक्रिया, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, गांडूळ खत निर्मिती, शेतीक्षेत्रात ॲपचा वापर, एकात्मिक तन व्यवस्थापन, फळप्रक्रिया, खरीप पिकाचे कलम, याविषयी मार्गदर्शन केले.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी, पंप कसा हाताळावा, कृषी रसायने हाताळणी, साठवणूक याविषयी प्रत्यक्ष बांधावर जाऊन माहिती दिली. यावेळी प्रगतिशील शेतकरी मुरलीधर सोमवंशी, बालाजी वानखेडे, जनार्दन, लक्ष्मण मंदेवाड, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सय्यद ईस्माल, कार्यकारी अधिकारी डॉक्टर ए डब्लू मोरे, डॉक्टर कल्याणकर, डॉक्टर कापसे यांचे मार्गदर्शन लाभले.