हदगाव| भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान, अफगानिस्तानात अत्याचार चालू आहेत. बांगलादेशात तर आम्हाला हिंदूचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. मात्र आया बहिणींची अब्रू आपण वाचवू शकलो नाहि याची खंत आहे. अश्या प्रकारे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा द्यावि अशी मागणी बजरंग दल, किनवट जिल्हा सहसंयोजक गुरु स्वामी यांनी केली.ते हदगाव येथे पाकिस्तान, अफगानिस्तानात हिंदूंवर होत असेलल्या अत्याचार घटनेच्या निषेधाचे निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, बांगलादेशात जे हिंदूंवर अत्याचार केले जातेय व प्रकार निंदनीय आहे, या ठिकाणी दुर्गा पूजा मंडप वाचवू शकलो, हिंदू मंदिरे, मंदिरात बळजबरी घुसून मूर्त्या तोडणे, छोट्या मुलींसह महिलांवर बलात्कार करणे या शिवाय हिंदूच्या घरात घुसून लुटपाट, घरे जाळणे इ.सर्व मुस्लिम जिहादी अतंकवाद्यांनी केले आहे.
जेव्हापासून अतंकवाद्यांनी अफगानिस्तानचा ताबा घेतला तेव्हापासून शेजारी देशामध्ये जिहादी आतंकवाद्याची आक्रमणे वाढली आहेत. केवळ दुर्गापुजे दरम्यान २२ जिल्ह्यामध्ये हिंसात्मक घटना घडल्या,हिंदूचे १५० दुर्गापुजा पेंडॉल नष्ट करण्यात आले. यामध्ये नौखालीचे ईस्कॉन मांदिर, ढाक्याचे ढाकेश्वरी मंदिर, बंदरबनचे लामा हरी मंदिर, चौमुहानीचा रामठाकूर आश्रम, चौकबाजार मधील करुणाई काली मंदिर याशिवाय कुउरीगावचे सात अन्य मंदिर अशी ही यादी खुप मोठी आहे. याशिवाय कीतीतरी दुकानात घरात देवळात आतंकवाद्यांनी आग लावून नंगानाच केला. यात १० ते १२ हिंदू आपल्या प्राणाला मुकले आहेत. हे सर्व होवूनही बांगलादेश येथील सरकारने डोळ्यावर पट्टी बांधली आहे.
या तीनही देशात हिंदू मदतीसाठी आक्रोश करीत आहे. बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथीला सरकारने कडक पावले उचलावीत तसेच भारत सरकारकडे निवेदन आहे की, त्यांनी बांगला देशातील या घटना थांबाव्यात यासाठी दबाव वाढवावा अशी मागणी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद करीत आहे. असे निवेदन देण्यात आले असून, या निवेदनात बांगला देशावरील दबाव वाढवावा जेणेकरुन१] ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे त्या हिंदूना न्याय व सुरक्षा मिळेल २] जे मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई मिळेल ३] जे आक्रमणकारी आहेत त्यांना शोधून अटक करुन कडक शासन दिले जाईल ४] अशा घटना पुनःश्च होऊ नये आवश्य ती पावले उचलली जातील ५] जे हिंदू शिल्लक आहेत त्यांना उत्तम जीवन जगण्यासाठी संरक्षण मिळेल. अश्या मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या असून, हादगावचे तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती, भारतीय गणराज्य राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. या निवेदनावर बजरंग दल किनवट जिल्हा सहसंयोजक श्री. गुरु स्वामी, राहुल विलास स्वामी, दिपक स्वामी, अंकुश पवार, निलेश चटणे, अंकुश धोतरे, गोविंद कळसे, अतुल स्वामी, शुभम दागट, शरद गिरी, पवन महाजन, वैभव लव्हारे, प्रदीप पेंदे, दिनेश नरवाडे, अतुल राठोड,आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.