180 सीटचे जम्बो जहाज नांदेड विमानतळावर पहिल्यांदा च उतरणार
नांदेड| संत नामदेव महाराज यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या औचित्याने नानक साई फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घुमान यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली असून यावेळी घुमान वारी विमानाने प्रवास करणार आहे. आज शनिवार दि 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी एअर इंडिया च्या जम्बो विमानाने पंजाब ला रवाना होणार आहे.
संत नामदेवाची सातशे एकावणवे जन्म - शताब्दी वर्ष आहे. यावेळी घुमान याञेनं कात टाकली आहे, यात्रा हवाई मार्गानं घुमानला जाणार आहे. भक्तीची एक नितळ वाट माणसाच्या मनात धोपटं करून , भक्तीरसात अक्षरशः भिजवते. धकाधकीच्या जीवनात हरवत चाललेलं समाधानाच धन यातून मिळतं .. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून भक्तानी हजेरी लावली आहे, आनंदाचा अनुपम सोहळा अनुभवत सातवी घुमान याञा यासाठी महत्वाची आहे की, संत नामदेवाची सातशे एकावण जन्म - शताब्दी वर्ष आहे.. करोनाला हरवून आम्ही हवाई प्रवास करून घुमानवारी यशस्वी करू असा दृढ - निश्चय नानक-साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी व्यक्त केला आहे.. या वेळी संत नामदेव महाराजांच्या जन्म -शताब्दी वर्षाचा संदर्भ असल्या कारणाने,घुमानवारीला वेगळे,ऐतिहासिक महत्त्व आहे. पंजाब सरकारच्या माध्यमाने मोठ्या उत्सवाची पुर्वतयारी सुरू आहे. घुमान हरगोविंदपूर चे आमदार सरदार बलविंदरसिंघ लाड्डी यांनी यात्रा समितीचे स्वागताध्यक्ष पद स्वीकारले आहे. त्या उत्सवात, हुजूर - साहेब नांदेडहून घुमानवारी म्हणजे ,दुग्ध शर्कर योगच जुळून आला आहे. जवळपास 125 भाविक यात्रेत सहभागी झाले आहेत. घुमान यात्रेच्या निमित्ताने केंद्र सरकारने 180 सीट चे जम्बो विमान खास बाब म्हणून मंजूर केले आहे, एवढे मोठे विमान नांदेड विमानतळावर पहिल्यांदा च उतरणार आहे.
संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी 'तीर्थक्षेत्र घुमान' - 'सुवर्ण मंदिर' अमृतसर - शक्ती पीठ 'माता नैना देवी' (हिमाचल प्रदेश) - 'आनंदपूर साहिब' (तख्त) - आशिया खंडातील सर्वात उंच आणि भव्य 'भाकरा नांगल' धरण - पंजाबच्या संस्कृतीचा अंखो देखा इतिहास असलेले 'विरास्ते 'खालसा मुजियम' आनंदपूर साहिब - जालंधर - सुल्तानपूर लोहडी- परजिया कलान-'कार्तिकी स्वामी' - वाघा 'अटारी' बॉर्डर - 'माता दुर्गा' मंदिर अमृतसर - 'जालियनवाला' बाग - अमृतसर हवाई अड्डा - असे भ्रमण व दर्शन घडवून यात्रा 28 ऑक्टोबर रोजी नांदेड च्या श्री गुरू गोबिंद सिंघ जी विमानतळावर परतीचा प्रवास करणार आहे.. पहिल्यांदा च धार्मिक आणि सामाजिकतेचे मिलन असलेली यात्रा हवाई मार्गाने जात आहे, तो योग नानक साई फाऊंडेशनने जुळवून आणला आहे. हवाई मार्गाने प्रवास करणारी धार्मिक-सामाजिक यात्रा म्हणून 'घुमान' यात्रेची नोंद होणार आहे.
संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेल्या घुमान वारीचे नांदेड च्या श्री गुरू गोबिंद सिंघ जी विमानतळावर स्वागत आणि यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नानक साई फाऊंडेशन चे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष बल्लेवार, माधवराव पटणे,राणा रणबीरसिंघ खोकर,सतिश देशमुख तरोडेकर, हरिदास भट्टड,तुलसीदास भुसेवार, जी. नागय्या, विनायकराव पाथरकर,प्रा.उत्तमराव बोकारे,एन एम बेंद्रीकर,संजय कदम रुईकर, गंगाधर पांचाळ, बळीराम पवार, आयुब पठाण, गोविंद राऊत,चरणसिंग पवार, सुभाष लंगडापुरे, दिपक मराठे, बिरबल यादव,दयानंद बसवंते यांनी केले आहे.