हिमायतनगर तालुका आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराने कुपोषणात वाढ होण्याची भीती -NNL

तालुक्यात गरोदर माता, बालकांची तपासणी शिबीर घेण्यास तीन महिण्यापासून होतेय टाळाटाळ  


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत माता व बालकांचे आरोग्य चांगले रहावे, कुपोषण नष्ट व्हावे व बालमृत्यूला आळा घालण्यासाठी शिबिरांचे आयोजन करून तालुक्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यासाठी हिमायतनगर तालुका आरोग्य विभागाकडे लाखोंचा निधी वर्ग केला आहे. मात्र येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणामुळे गेल्या तीन महिन्यापासून तपासणी शिबिरे झाली नाही. त्यामुळे गरोदर मतांच्या आरोग्याच्या समस्या वाढून पुन्हा तालुक्यात कुपोषणाच्या संख्या वाढण्याची भीती ग्रामीण भागातील आरोग्यप्रेमी नागरीकातून व्यक्त केली जात आहे. 

मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये सुरू केला आहे. त्यात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले असून, प्राधान्याने कुपोषित बालके, कमजोर माता, गरोदर महिला यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून परिपूर्ण तपासणी करणे, त्यानुसार उपचाराची सुविधा देणे अशा सर्वच बाबींचा अंतर्भाव या योजनेत कऱण्यात आला आहे. असे असताना हिमायतनगर तालुका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील ३ ते ४ महिन्यापासून केवळ डॉक्टर नसल्याचे कारण पुढे करत शिबीर घेण्यास चालढकल चालविली जात आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या मात्र याची अंमलबजावणी झाली नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

अगोदरच कोरोना सारख्या महामारीने नागरिक त्रस्त झाले, आता साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे, त्यात ताप, चीकनगुनिया, डायरिया, डेंग्यू सर्दी, खोकला आदी आजाराचे रुग्ण खाजही दवाखान्यात मोठ्या प्रमाणात येत आहेत. असे असताना देखील तपासणी शिबिराचे आयोजन करण्यास होत असलेली टाळाटाळ कोपोषण सारख्या आजार वाढविण्यास कारणीभूत ठरणार आहे. हि बाब लक्षात घेता याकडे जिल्हा असल्या चिकित्सकांनी हिमायतनगर येथील तालुका आरोग्य  आधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या भोंगळ कारभाराकडे लक्ष देऊन तातडीने तालुक्यातील सरसम, चिंचोरडी पीएससी अंतर्गत गरोदर महिलांची आरोग्य स्थिती, बाळांत महिलांची, त्यांच्या बालकांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी तातडीने शिबिराचे आयोजन करावे आणि अश्या गरजू बाबीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करावी आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करून ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहस्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आरोग्य प्रेमी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी श्री संदेश पोहरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र ते कार्यालयात वाजवुन आले नाहीत येतील असे सांगण्यात आले. 

कुपोषणासह माता मृत्यू, बाल मृत्यूचे मागील काही दशकांतील वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी, त्यासाठी बालक, माता, गरोदर महिलांची तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्रांवर आरोग्य तपासणी शिबिरे घेण्याची योजना सुरु केली आहे. अश्या एका शिबिरासाठी१८ हजार रुपये शासनाकडून खर्च केला जातो. त्यात डॉक्टरांचे ५ हजार रुपये मानधन, रुग्णांना केंद्रापर्यंत घेऊन येण्याची व्यवस्था, जेवणासाठी हे पैसे दिले जातात. या माध्यमातून संबंधित पीएससी आणि तालुक्यातील गरोदर महिलांची आरोग्य स्थिती, बाळांत महिलांची, त्यांच्या बालकांची आरोग्य स्थिती अशी परिपूर्ण माहिती ही आरोग्य विभागाकडे उपलब्ध होते. मात्र त्यानुसार पुढील योजना राबविण्यास हिमायतनगर तालुका पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी