महाकाली शक्तिउत्सव कार्यक्रमाची भव्य शोभा यात्रा व अग्निप्रवेशाने सांगता

हिमायतनगर (नृसिंह न्यूज नेटवर्क) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाकाली शक्तिउत्सव कार्यक्रमाची दि. २३ रोजी अकाली भव्य शोभा यात्रेने सुरुवात करण्यात आली आहे. 

शहरातील बोरगाडी रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या महाकाली मंदिरात मार्गशीर्ष शुक्ल ५ शके १९३९ गुरुवार दि.२३ रोजी सकाळी
१०.३० वाजता साईनाथ बडवे यांच्या शुभ हस्ते संयोजक संजय मादसवार यांच्या उपस्थितीत श्री महाकाली मातेचा अभिषेक, गादीपूजन, झेंडा व लॉड जागेचे पूजन करण्यात आले. दुपारी १२ वाजता बंडू देवकर व बाळू देवकर यांच्या हस्ते गादि पूजन झाल्यानंतर दुपारी २ वाजता छबिना पूजन करून पापन्ना पोतराज यांची रात्र जागरणाला सुरुवात झाली असून, त्यानिमित्ताने शहरातील मुख्य रस्त्याने हलगीच्या तालावर भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.


रात्रीला अग्निप्रवेश संपन्न झालेलं. तर शक्रवारी सकाळी चंपासष्टी होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी गुरु शेवंतामाय निवघेकर, गुरु महाराज चालगणीकर, गुरु शिवाजी महाराज चालगणीकर, गुरु दिगंबर महाराज पार्डीकर, श्री नीलकंठ गायकवाड यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सादर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तराव वानखेडे, नथुराव वानखेडे, प्रकाश वानखेडे, माणिकराव वानखेडे, उत्तमराव वानखेडे, बाबाराव पवार, दगडूजी पाटील, माधवराव डोंगरे, दिलीप कदम, दादाराव बरवे, चांदराव विनकरे, भगवान थोटे, मारोतराव वंजारे, संतोष माने, ज्ञानेश्वर कदम, चांदराव बनसोडे, सौ.सखुबाई पोचीराम बनसोडे, सौ.मीनाबाई मंडोजवार, अनुसयाबाई बनसोडे, सौ.लक्ष्मीबाई गड्डमवार, भाग्यरथाबाई करंजीकर यांच्यासह शेकडो महिला - पुरुष भजनी मंडळ खडण्यात आलेल्या शोभा यात्रेत सामील झाले होते. या मिरवणुकीत हलगीच्या तालावर पोतराजानी महाकालीचा जयजयकार केला. रात्रभर छबिना पूजन व पोतराजाचा जागर कार्यक्रम उत्सहात संपन्न झाला.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी