पेयजल समस्येवर मात करण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न
माहूर (सरफराज दोसाणी) विदर्भ मराठवाडय़ाला जोडणारी जिवन वाहिनी पैनगंगा कोरडी पडल्याने माहुर शहर व रेणुका देवी गडावरील पाणी पुरवठा खंडीत झाला आहे.पैनगंगा नदीत पुस धरनातुन पाणी सोडण्या साठी स्थानिक तहसील, नगरपंचायत प्रशासनानी त्यांचा पातळीवरुन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केले असुन उग्ररुप धारण करु पाहत असणाऱ्या पेयजल समस्येवर मात करण्यासाठी नगराध्यक्ष, आमदार, खासदार यांनी थेट राज्याच्या पाणी पुरवठय़ामंत्र्या पर्यंत संपर्क साधल्याने लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल असी अपेक्षा असुन तूर्तास चेंडु कार्यकारी अभियंत्याचा कोर्टात असुन दत जयंती उत्सव तोंडावर असल्याने त्वरीत पाण्याची व्यवस्था करण्यात यावा अशी मांगणी रेणुकादेवी संस्थान चे विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी केली आहे.
यंदा माहुर तालुक्यात सरासरी पेक्षा केवळ 38 टक्के पाऊस झाल्याने पाण्याची समस्या वेळेपुर्विच उभी टाकली आहे.या वर्षीच्या पावसाळ्यात एकदा हि नदी नाल्यांना पुर आलेला नसल्याने विहिरी,बोअरवेल, हि अटले असुन पाण्याची पातळी खोल गेली आहे. तर नद्या नाले कोरडे ठणठणीत पडले आहे. त्यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनली असुन या वर्षी शहरासह तालुक्यातील नागरीकांना डिसेंबर ते जुण असी सात महिने पाणी टंचाई जाणवनार आहे. पिकांची आनेवारी 47 टक्के निघली असुन तालुका भिषण दुष्काळाच्या गर्तेत सापडला आहे. लातुर सदृश्य परीस्थिती निर्माण होऊ पाहणाऱ्या माहुरच्या पेयजल समस्येवर मात करण्यासाठी तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर यांनी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, नपचे लेखापाल वैजनाथ स्वामी, मेघराज जाधव, अजीज भाई, विश्वस्त संजय कान्नव, आनंद तुपडाळे, यांच्या सोबत पैनंगगा नदी पात्रास आज दिनांक 24 (शुकरवारी) भेट देऊन पाहणी केली.तर आमदार प्रदिप नाईक यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी पाणीप्रश्नी हिंगणी बंधार्यात उपलब्ध असलेल्या पाणी संदर्भात चर्चा केली असता त्यांनी विनाविलंब नगरपंचायत मार्फेत प्रस्ताव दाखल करा मंजुरी देउत असे शाश्वत केले.
तर नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी उद्भवलेल्या पाणी टंचाईवर प्रतिक्रीया देतांना हि नैसर्गिक आपत्ती असली तरी मागील चार वर्षापुर्वी मंजुर झालेली व अत्ता पुर्णत्वाकडे जात असलेली 12 कोटी 34 लक्ष रुपयाच्या योजनेला पैनंगगा नदीतुन न जोडता दोन किमी अंतरावरील हिंगणी बंधार्यातुन पाईपलाईन टाकली असती तर हा प्रश्नच उद्भवत नव्हता असे मत व्यक्त केले. दरम्यान कार्यकारी अभियंत्यास मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सादर केलेल्या प्रस्तावा बाबत सुविस्तर माहिती दिला असता त्यांनी सोमवार दिनांक 27 ला चर्चे साठी कार्यालयात प्राचरण केले असुन, या बाबत त्याच दिवशी निर्णय होईल असी शक्यता आहे. सध्या प्रशासनाला दोन डिसेंबर पासुन सुरु होणार्या दत जयंती यात्रा काळात भेडसावणाऱ्या पेयजल समस्येवर तोडगा काढण्याचे आव्हान उभे असुन अंदाजे पाच लाख भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.