मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) 'आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करत आहोत.' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या याच मसुद्याला 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळेच 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रमाने आपल्या भारत देशाचे संविधान 2 वर्ष, 11 महिने व 17 दिवसात लिहूण या देशाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी समर्पित केले आहे. याच दिनाचे औचित्य साधून मुखेड मधील सम्राट परिवाराच्या वतीने संविधान गौरव दिन सोहळयाचे आयोजन दि. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुखेड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. सदस्य दशरथ लोहबंदे असून तर प्रमुख उपस्थिती आरपीआय जिल्हाध्यक्ष नांदेड चे गौतम काळे, नायब तहसिलदार डी.सिरसे, एपीआय विनोद कांबळे, डॉ. श्रावण रॅपनवाड हे राहणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक मुखेड न्यायालयाचे सरकारी अभिवक्ता अॅड. आमेर काजी, बहुजन नेते शिवाजी गेडेवाड, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील व शहरातील सर्व जनतेने मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डी.डी. वाघमारे इंजिनियर, डॉ. राहुल कांबळे, प्रा. तेलंग, थोटे व सम्राट परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.