अखेर.... तांदुळ उंकड्यात पुरणारा मुख्याध्यापक निलंबित..!

हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे पोटा बु. येथील जिला परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आलेला शालेय पोषण आहाराचा तांदूळ चक्क ऊकंड्यात पुरल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्या नंतर जिल्हा शिक्षण अधिकारी सोनटक्के यांच्या आदेशावरून मुख्याध्यापकास निलंबित करण्यात आले आहे.  

तालुक्यातील मौजे पोटा बु. येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक गोदाजी लकडे यांनी
विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शालेय पोषण आहारत अफरातफर केली. त्यामुळेच कि काय..? याची कोठे वाचता होऊ नाही म्हणून शाळेत असलेल्या स्टॉकरूम मधील तांदुळ व चवळी शाळेच्या पाठीमागे असलेल्या उंकड्यामध्ये रोजदार लावून शेणाच्या उंकड्यात पूरली. यांची कुजबुज गावकऱ्यांना लागताच प्रसार माध्यमांना कळवून त्याच्या समक्ष केन्द्रप्रमुख यांना सदर धान्याचा पंचनामा केला. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत विद्यमान गटशिक्षण अधिकारी रमेश संगपवाड यांनी प्रथमतः दुर्लक्ष केले, याबाबतचे वृत्त झळकताच अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानांतर संबंधित मुख्याध्यापकास दुसऱ्या दिवशी सुःचना  देऊन पत्र व्यवहार करून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वृत्ताची दखल घेऊन तसेच केंद्र प्रमुखाच्या पंचनामा व समक्ष पाहणीनंतर काल दि.२६ जूलै रोजी पोट शाळेच्या मुख्याध्यापकाने ३ क्विंटल तांदूळ चुकीच्या पद्धतीने उकिरड्यात पुरून विल्हेवाट लावल्याचे उघड झाले. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा परिषद शिस्त व अपिलीय नियम १९६४ मधील तरतुदीनुसार सदरील आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी