लाठीचार्ज करनारा पोलिस कर्मचारी शेख सादुल वर गुन्हा दाखल

हिमायतनगर (एनएनएल) पीक विमा भरणार्या शेतकर्यावर लाठीचार्ज करनार्या पोलिस कर्मचारी शेख सादुलवर हिमायतनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीक विमा भरण्यासाठी येथील भारतीय स्टेट बँकेच्या रांगेत उभे असलेल्या एका शेतकऱ्यावर आरसीपी कर्मचारी पथकातील पोलीस शेख सादुल यांनी
लाठीचार्ज केल्याने वयोवृद्ध शेतकरी जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच बळाचा वापर करून शेतकर्याची मुस्कुटदाबी करनार्या सरकाच्या कर्मचाऱ्यावर बच्चू कडूं यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बलपेलवाड, तालुकाध्यक्ष गजानन ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे जांबुवंत मिराशे, भाजपाचे तालुकाध्यक्ष विजय नरवाडे, राम सुर्यवंशी, गोविंद शिंदे, दिलीप राठोड, काॅ. दिगंबर काळे, हानुसिंह ठाकूर, राम नरवाडे, पापा पारडीकर, यांच्यासह शहरातील तालुक्यातील शेतकरी युवकांनी शेतकऱ्यांवर होणार अन्याय सहन करणार नसल्याचा पवित्रा घेऊन रास्ता रोको केला. तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी केली होती. शेतकऱयांचा वाढत रोष पाहता अखेर पोलीस निरीक्षक विट्ठा चव्हाण यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने याना निवळला. जखमी शेतकऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी गोविंद राघोजी सूर्यवंशी यांच्या ताकारीरवरून पोलीस कर्मचाऱ्यावर कलाम ३२३ भादंवि अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी