NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

बुधवार, 27 अप्रैल 2016

हरिणाच्या पाडसाला जीवदान

विहिरीत पडलेल्या हरिणाच्या पाडसाला शेतकरी वन कर्मचार्यांनी दिले जीवदान


नांदेड (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी रस्त्यावरील एका शेतकऱ्याच्या ५० फुट विहिरीत पाण्याच्या शोधत आलेल्या हरिणाच्या कळपातील पाडस पडले होते. रात्रभर विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला सकाळी शेतकरी व वन कर्मचार्यांनी बाहेर काढून जीवदान दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. 

सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, उष्णतेने ४५ अंश सेल्सियासाचा आकडा पार केला आहे. त्यामुळे विहिरी, बोअरची पाणी पातळी जमिनीला टेकली असून, नदी, तलाव कोरडेठाक पडले आहे. वाढत्या उन्हामुळे जंगलातील झाडांची पानगळी झाल्याने सावलीचा आधार राहिला नाही. तर पाणवठे आटल्यामुळे नीळ, हरीण, मोर, लांडोर, रोही, ससे, लांडगे, रानडुक्कर, वानरे, बिबट्या वाघ आदीसह अन्य वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. 

असेच दि.२६ मंगळवारच्या सायंकाळी पाण्याच्या शोधत टेंभी - नांदेड- किनवट राज्य रस्त्यावरील शेतीतील विहिरीकडे आले होते. दरम्यान अचानक सुसाट वारे सुरु झाल्याने हरणाचे कळप धावू लागले. त्यापैकी हरणाची अंदाजे १.५ महिन्याचे नर जातीचे एक पाडस थेट ५० फुट खोल असलेल्या आशिष सकवान यांच्या गट न.३५ मधील विहिरीत पडले असावे अशी माहिती शेतमजुराने वनकर्मचारी यांना दिली. सकाळी ६ वाजता शेतात फेरफटका मारताना विहिरीतून आवाज आल्याने पहिले असता हरिणाचे पाडस पडल्याचे शेमाजूर इंदल यांना दिसून आले. तत्काळ याची माहिती वनपाल शिंदे यांना दिल्यानंतर वनरक्षक संदीप गुट्टे, वनमजूर अहेमद यांनी भेट देवून पाहणी केली. आणि हरिश्चंद्र राठोड नामक युवकाच्या सहाय्याने विहिरीतून सदर पाडसास बाहेर काढले. 

५० फुट खोल विहिरीत पडल्यानंतर रात्रभर विहरीतील पाण्यात राहिलेल्या हरिणाच्या पाडसाच्या मानेला, डोक्याला, पायाला गंभीर मार लागला असून, त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करून जंगलात सोडणार असल्याचे वनकर्मचार्यांनी सांगितले. यावेळी जगदीश सूर्यवंशी, ज्योतिबा सूर्यवंशी, रमेश जाधव, पत्रकार अनिल मादसवार, कानबा पोपलवार, साईनाथ धोबे यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. 

वनपरिक्षेत्र अधिकार्याचा नाकर्तेपणा 
------------------------ 
पाणी टंचाईमुळे तालुक्यातील अनेक ग्रामीण परिसरात सध्या बिबट्याने धुमाकूळ माजवून अनेक गाई, म्हशी फस्त केल्या आहेत. असे असताना देखील वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम पांडे हे वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पाणवठे उभारण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. तर मलिदा लाटण्यासाठी उपयुक्त असलेली बांधकामे करण्यावर भर देत असल्याचा आरोप शेतकरी व परिसरातील नागरीकातून केले जात आहे. तसेच आजवर घडलेल्या एकही घटनास्थळी ते स्वतः हजार राहत नाहीत. वन कर्मचाऱ्यावर सोपवून आपली जबाबदारी झटकत असल्याने वन्य प्रण्याबाबत त्यांना आस्था नाही काय..? असा सवालही वन्य प्रेमी नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

वनविभागाचे अधिकारी उठले जंगलच्या मुळावर 
--------------------------------- 
तालुक्यात असलेल्या जंगलातून सध्या मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जात आहे. यामुळे जंगल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जंगलात आसरा नसल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. गेल्या दोन महिन्यात अनेक वन्य प्राण्यांनी मानवी वस्तीकडे धाव घेवून पिण्याच्या पाण्याची शोध शोध चालू केली आहे. लाकूड तस्करांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे भय नसल्याने लाकडांनी भरलेले टेम्पो जंगलातून राजरोसपणे वाहतूक करताना आढळून येत आहेत. या बाबत अधिकार्यांना विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता मी सध्या बाहेरगावी आहे असे सांगून वेळ मारून नेली. यामुळे वन्यप्रेमी नागरीकातून वनविभागाच्या वेळकाढू वृत्ती बाबत संताप व्यक्त करून जंगल वाचवायचे असेल आणि वन्य प्राणी जोपासायचे असतील तर निष्क्रिय अधिकार्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सोमवार, 25 अप्रैल 2016

मनरेगा फसवणूक

मनरेगा फसवणूक अंतर्गत सात महिन्यांनी एका तांत्रिक अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन नाकारला
नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)नरेगा अंतर्गत मातीनाला बांधकामात खोटे जोब कार्ड तयार करून २७ लाख ८५ हजार ७८४ रुपयाची शासनाची फसवणूक करणाऱ्या एका तांत्रिक अधिकाऱ्याची अटक पूर्व जामीन विनंती जिल्हा न्यायाधीश जी.ओ.अग्रवाल यांनी फेटाळून लावली आहे.विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल होवून आता ७ महिनांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.

नांदेडच्या सिंदखेड पोलिस ठाण्यात दिनांक १० ऑक्टोंबर २०१५ रोजी मोहन जगू राठोड यांनी तक्रार दिली होती की,चोरड गावात मातीनाला बांधकाम आणि इतर २५ कामे मनरेगा अंतर्गत झाली.त्यात त्यांचे,त्यांच्या पत्नीचे आणि इतर अनेकांचे खोटे जोब कार्ड बनवून एकूण २५ कामांपैकी १२ कामे अपूर्ण राहिली.त्यात अनेक लोकांवर सिंदखेड भादवीच्या कलम ४०६,४०९,४०८,४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाला.काही जणांना या प्रकरणात अटक पूर्व जामीन मिळाला.या प्रकरणात पंचायत समिती माहूरचे तांत्रिक अधिकारी सतीश लिंबाजी जाधव यांचे नाव आरोपी या रकान्यात होते. 

तब्बल सात महिन्या नंतर सतीश लिंबाजी जाधव यांनी नांदेड जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.त्यात सिंदखेडचे सहायक पोलिस निरीक्षक एम.टी.निकम यांनी से दाखल केला.त्यात तांत्रिक अधिकारी सतीश जाधव यांना अटकपूर्व जामीन देण्यात येवू नये असे त्यात लिहिले आहे.आज सरकारी वकील अड़.विनायक भोसले यांनी जाधव हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा युक्तिवाद मांडून अटकपूर्व जामीन देण्यास विरोध दर्शवला.त्या युक्तिवादास ग्राह्य मानून न्या.अग्रवाल यांनी पंचायत समिती माहूरचे तांत्रिक अधिकारी सतीश लिंबाजी जाधव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावतांना अश्या मोठ्या रकमेच्या फसवणुकीवर तीव्र ताशरे ओढले आहेत. 
  
बारावीच्या परीक्षेत नापास मुलीने केली आत्महत्या   
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
नांदेड(प्रतिनिधी)बारावीच्या पुरवणी परीक्षेत नापास झालेल्या एका युवतीने आत्महत्या केल्याचा प्रकार किनवट शहरात घडला आहे.

हिराबाई जगजीवन पुरके,राहणार बुधवारपेठ ता.किनवट यांनी दिलेल्या खबरीनुसार ६ मार्च २०१६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी किरणबाई जगजीवन पुरके हिचा आदिलाबाद रुग्णालयात मृत्यू झाला.ती बारावीच्या पुरवणी परीक्षेत नापास झाल्याने तिच्या मनावर परीणाम झाल्याने विषारी औषध पिल्याने तिस औषध उपचार कामी सरकारी दवाखाना अदिलाबाद येथे दाखल केले असता उपचार चालु असतांना मरण पावली आहे.किनवट पोलिसांनी किरणबाईच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे.तपास पोलिस नाईक शेख हे करीत आहेत. 
 
ज्ञानेश्र्वर नगर भागात ६९ हजारांची चोरी झाली 
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
नांदेड(प्रतिनिधी)ज्ञानेश्र्वर नगर,नांदेड येथे एका सेवानिवृत्त माणसाचे घर फोडून चोरट्यांनी ६९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

रत्नाकर भालचंद्र वाळवेकर रा. ज्ञानेश्र्वर नगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ एप्रिल २०१६ च्या सायंकाळी ६ वाजेपासून ते २४ एप्रिलच्या सकाळी ९ वाजेदरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश केला आणि घरातील रोख रक्कम ४० हजार रुपये आणि चार सोन्याच्या अंगठ्या २९ हजार रुपयांच्या चोरून नेल्या आहेत.भाग्यनगर पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलिस नाईक आलेवार हे करीत आहेत.

पाणपोई सुरु

भीम बोईस मित्रमंडळाच्या वतीने दार्लूम चौकात पाणपोई सुरु 

हिमायतनगर(प्रतिनिधी)वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे घसा कोरडा पडून मनुष्य जीव पाणी पाणी करीत आहे. हि बाब लक्षात घेता ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी येथील भीम बोईस मित्रमंडळाचे इम्रान खान, उबेद खान, मोहम्मद अरबाज यांच्या वतीने शहरातील चौपाटी परिसरात असलेल्या दार्लूम चौकात पाणपोईची सुरुवात केली आहे. याचे उद्घाटन दि.२५ रोजी मजहर मौलाना यांच्या हस्ते करण्यात आले असून, तळपत्या उन्हातही नागरिकांची तहान भागणार आहे.

या ठिकाणी लावलेल्या बैनरवरून युवकांनी जल हि जीवन है... चा संदेश देवून अनमोल पाण्याची बचत करण्याचे आवाहनही केले. यावेळी पत्रकार फाहद खान, रियाज अहेमद, मसूद मौलाना, मोहमद अक्रम, मो.सद्दाम मोहसीन खान, मो.नदीम, निसार शेवालकर यांच्यासह अनेक युवकांची उपस्थिती होती. पाणी टंचाई लक्षात घेवून नागरिकांची तहान भागविण्यासाठी युवकांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

शेततळे उभारून मजुरांच्या हाताला काम द्या

खडकी बा. येथील गायरान जमिनीत रोहयोतून शेततळे उभारून मजुरांना काम द्या

हिमायतनगर(प्रतिनिधी)तालुक्यात उद्भवलेली पाणी टंचाई व दुष्काळी परिस्थितीने शेतकरी, मजूरदार व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. शेतीत कामे नसल्याने मजूरदारांना कामाच्या शोधत परप्रांतात स्थलांतर करावे लागत आहे. हि बाब लक्षात घेता खडकी बा.येथील गायरान जमिनीत शेततळे उभारून मजुरांच्या हाताला काम मिळवून द्यावे अशी मागणी येथील युवकांनी ग्रामसेवकाकडे केली आहे.

अल्प पर्जन्यमानामुळे खडकी बा.परिसरातील पाणी पातळी पूर्णतः खालावली आहे. त्यामुळे पाणी टंचाई ची भीषण समस्या उद्भवली आहे. हि समस्या कायमरूपी सोडवून मजुरांना कामे मिळवून देण्यासाठी येथील गायरान जमिनीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततळे उभारावे. जेणे करून शेततळ्यात पाणी साठवून भविष्यात परिसरातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. मजुरांच्या हाताला काम मिळेल आणि पाणी पातळीत वाढ झाल्यास नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती थांबेल असे निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर गौरव सूर्यवंशी, साहेबराव शेट्टे, सतीश मोरे, ज्ञानेश्वर राहुलवाड, साहेबराव मनमंदे, राहुल हनवते, गजानना ठाकरे, तानाजी सोळंके यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत. 

रविवार, 24 अप्रैल 2016

कराटे स्पर्धा

कराटे प्रशिक्षणाचा उपयोग अन्यायाच्या विरोधात व देशसेवेसाठी करावा - श्रीश्रीमाळ

हिमायतनगर(प्रतिनिधी)धकाधकीचे जीवन व स्पर्धेच्या युगात स्वतः व कुटुंबाच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच पार पाडावी लागणार आहे. हि बाब लक्षात घेता सर्वच मुला - मुलीनी शिक्षनाबरोबर कराटे महत्व जाणून घेवून प्रशिक्षण घ्यावे. यामुळे बुद्धीला चालना तर मिळते शिवाय इच्छाशक्ती प्रबळ होण्यास मदत मिळते. भविष्यात याचा उपयोग स्वरक्षनाबरोबर आजूबाजूला घडणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तसेच संधी मिळाल्यास देशसेवेसाठी करावा. असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केले. 

ते साऊथ इंडिया वादोकाई कराटे असोशियेषण द्वारा आयोजित पहिली मराठवाडा स्तरीय विभागीय कराटे स्पर्धेच्या अध्यक्षीय भाषणातून बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन दि.२४ रविवारी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदिर समितीचे अध्यक्ष महाविराचंद श्रीश्रीमाळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गजानना शिंदे, विजय नरवाडे, विठ्ठल ठाकरे, लखमावाड मैडम, नगरसेवक म.जावेद अ.गन्नि, अ.गुफरान, अनिल पाटील, अन्वर खान, अश्रफ भाई, विशाल राठोड, गजानन चायल, सदाशिव सातव, विलास वानखेडे, हरडपकर काका, पत्रकार आणि विविध तालुक्यातून आलेले कराटे कोच सेन्साई यांच्यासह अनेक मान्यवर, पालकांची उपस्थिती होती. रविवारी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंगल कार्यालयात संपन्न झालेली मराठवाडा स्तरीय विभागीय कराटे स्पर्धा ऑल इंडिया ग्रैंड मास्टर वाडोदरा गुजरातचे राजेश अग्रवाल, साऊथ इंडिया वादोकाई कराटे असोसियेशनचे अध्यक्ष सुशीलकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. कलर व ब्लैक बेल्ट स्पर्धा प्रतिस्पर्धी वजन गटात पार पडली. या स्पर्धेत मराठवाडा विभागातील नांदेड, औरंगाबाद, उमरखेड, किनवट, भोकर, डोंगरखेडा, हदगाव, तामसा, पुसद आदीसह अनेक ठिकाणाहून कराटे प्रशिक्षक व विद्यार्थी - विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. 

विभागीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी - विद्यर्थिनिना आकर्षक मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रथम येणाऱ्या संघास सुवर्णपदक व विभागीय कराटे चषक पदक देवून व्यंकटेश पाटील, अभिजित मुळे, पत्रकार अनिल मादसवार, कानबा पोपलवार, अनिल भोरे, साईनाथ धोबे, राजू गाजेवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन हिमायतनगर येथील मुख्य प्रशिक्षक सेन्साई खंडू चव्हाण यांनी आयोजित केली होती. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामा गाडेकर, शुभम संगणवार, राजू कदम, रवि देवसरकर, शेख फिरदोस, संदेश नरवाडे, अनिकेत गुड्डेटवार, कु.शुभांगी गाजेवार, रंजना आढाव, विकास लोखंडे, आकाश भोरे, राविसागर महाजन, रघु देशमुख, ऋषभ मिराशे, प्रवीण कूपटीकर, विक्रांत खेडकर यांच्यासह स्पर्धा आयोजक समितीच्या सर्व कराटे प्रशिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाठोरे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार खंडू सर यांनी मानले.

शनिवार, 23 अप्रैल 2016

प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक

दुष्काळग्रस्त जनतेच्या समस्यांचा पाठपुरावा करा!   खा. अशोक चव्हाण 


मुंबई(प्रतिनिधी)राज्यातील दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्याची गांभिर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. या परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक आज सकाळी मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक चव्हाण होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी राज्याच्या विविध जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थिती आणि विविध लोकसमस्यांवर चर्चा झाली. आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा झाली. प्रदेश कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक असल्याने प्रदेशाध्यक्षांनी जबाबदारी वाटपाच्या अनुषंगानेही पदाधिका-यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

राज्यातील दुष्काळ हाच या बैठकीतील चर्चेचा प्रमुख मुद्दा होता. दि. 5, 6 व 7 मे रोजी पक्षाचे प्रमुख नेते दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौ-याच्या अनुषंगानेही खा. अशोक चव्हाण यांनी पदाधिका-यांना सूचना केल्या. या भीषण दुष्काळाच्या काळात जनतेच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. त्यांच्या समस्यांची तीव्रता कमी करण्याची आवश्यकता आहे. दुष्काळी जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा, असे खा. अशोक चव्हाण याप्रसंगी म्हणाले. बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

डीरेक्टरीचे उद्घाटन

कर सल्लागार संघटनेच्या वतीने माहिती व टेलिफोन डीरेक्टरीचे उद्घाटन

जागतिक ग्रंथ दिन

मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी पुस्तकाची संपती महत्वाची - बस्वराज कडगे

नांदेड(प्रतिनिधी)जिवनामध्ये किती संपती कमवली हे महत्वाचे नसुन आपण किती पुस्तके वाचली याचे महत्व जास्त आहे. पुस्तकाने माणुस प्रग्ल्भ होतो. मानवाचे जिवनात खरी संपती हे पुस्तकेच  आहेत असे मत बस्वराज कडगे यांनी व्यक्त केले.

ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित जागतिक ग्रंथ दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन व व्याख्यानात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. गाडगे महाराज यांचेकडे कुठलीही संपती नसतांना त्यांनी आज जे संगळयांच्या मनावर मनोराजय गाजवले ते फक्त ग्रंथामुळे असा उल्लेख करत थोर महापूरूषांचे दाखले देत उपस्थितांना ग्रंथाचे महत्व पटवून दिले.

श्री कारले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनात ग्रंथाचे महत्व कशाप्रकारे होते. हे सांगताना म्हणाले की, जर आपल्याकडे 10 रूपये असतील तर त्यातील 5 रूपयाचे पुस्तक घ्यावे. आणि बाकी 5 मध्ये चरितार्थ चालवावा असा बाबासाहेबांचा संदेश उपस्थितांना दिला. आरती कोकुलवार यांनी उपस्थितांना ग्रंथामुळे ज्ञानात कशी भर पडते यावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उदघाटक श्री बस्वराज कडगे प्रमुख पाहुणे कार्लेसर व आरती कोकुलवार हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अजय वटटमवार यांनी केले. आभार प्रदर्शन श्री संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी मयुर कल्याणकर, ओंकार कुरुडे,लक्ष्मण शेनेवाड, संजय मस्के, बुधेवार,रोहिदास इंगोले,सुजाता वडजे इ.उपस्थित हेाते.

ज्योतिर्लिंगांना जोडणाऱ्या रस्त्यांचे श्रेणीवर्धन करा

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांना जोडणाऱ्या रस्त्यांना
राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे  - सुधीर मुनगंटीवार

             मुंबई(प्रतिनिधी)महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांना जोडणाऱ्या रस्त्यांचे श्रेणीवर्धन करावे व त्यास राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करावे, अशी विनंती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांना पाठवलेल्या पत्रान्वये केली आहे.
            भाविकांच्या दृष्टीने ज्योतिर्लिंगांचे असलेले महत्व आणि या पाचही ज्योतिर्लिंगांना होणारी भक्तगणांची गर्दी लक्षात घेऊन ही मागणी केल्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले कीया ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी दररोज  लाखोंच्या संख्येने भाविक येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी हीच संख्या १० ते १५ लाख इतकी वाढते तसेच पूर्ण श्रावण महिन्यात या ज्योतिर्लिंगांना गर्दी असते.
            भारतातील एकूण १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. यामध्ये पाचवे ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ येथेसहावे भीमाशंकर पुणे येथेआठवे औंढा नागनाथ येथेदहावे त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे तर बारावे घृष्णेश्वर वेरुळ येथे आहे. महाराष्ट्र सरकाने येथे पर्यटक आणि भाविकांसाठी सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतू राष्ट्रीय महामार्गाने ही ज्योतिर्लिंगे जोडली गेल्यास ती राष्ट्रीय नकाशावर येतीलअसेही वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
            महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ आणि घृष्णेश्वर वेरुळ या ज्योतिर्लिंगांना राष्ट्रीय महामार्गाने जोडण्याचे तत्वत: निश्चित झाले आहे.  उर्वरित तीन ज्योतिर्लिंगांच्या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात श्रेणीवर्धन करण्याची गरज आहे.
            भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुण्यापासून १२७ कि.मी. अंतरावर वसले असून ते भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या परिक्षेत्रात येते. सध्या पुणे-राजगुरुनगर-भीमाशंकर (६७ कि.मी)मंचर घोडेगाव- भीमाशंकर (६० कि.मी.)  या दोन मार्गाने भीमाशंकरला जाता येते. यातील मंचर-घोडेगाव-भीमाशंकर  हा ६० कि.मी. चा छोटा लिंक रोड राष्ट्रीय महामार्ग ५० पासून जवळच्या अंतरावर आहे. याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर  झाल्यास भाविकांना ते सोयीचे होईल.
            हिंगोली पासून २३ कि.मी.,परभणीपासून ५२ कि.मी आणि नांदेडपासून ६० कि.मी. अंतरावर वसलेल्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाला जाण्यासाठी हिंगोली-औंढा नागनाथ हत्ता-पुर्णा-पालम-लोहा या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करावे, असे झाल्यास राष्ट्रीय महामार्ग ३६१ कर्नाटक (लातूर च्या बाजूने),  राष्ट्रीय महामार्ग ३६१ मध्यप्रदेश (अकोल्याच्या बाजूने)येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी जाणे सोयीचे होईल.
            त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक पासून २८ कि.मी. अंतरावरपालघरपासून १५० कि.मी. अंतरावर आहे. पालघर-मनोर-विक्रमगड-जवाहर-मोखाडा-त्र्यंबकेश्वर-नाशिक या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर केल्यास गुजरात आणि मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांनाही तिथे दर्शनासाठी जाणे सोयीचे होईलअसेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

इसाई देवीच्या उत्सव

अखंड हरिनाम व संगीत रामायण ज्ञानयज्ञाने वाळकी येथील इसाई देवीच्या उत्सवात सुरुवात
 
हिमायतनगर(प्रतिनिधी)हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या मौजे वाळकी(बा.) येथील इसाई देवीच्या यात्रा उत्सवाच्या मिनित्ताने अखंड हरिनाम व संगीत रामायण ज्ञान यज्ञास दि. २२ एप्रिल पासून थाटात सुरुवात करण्यात आली आहे.

या अप्ताहास दि. २० पासून सुरुवात करण्यात आली असून, पहिल्या दिवशी देवीचा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली आहे. यावेळी दर्शनसाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तर दि. २१ रोजी सकाळी गणेश पवार यांच्या भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर इसाई देवीची छबिना उत्सव व आरत्या आणि देवीच्या उत्सवा निमित्ताने सौ.संगीताबाई पाटील सोलापूर यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहात सकाळी ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते ४ राम कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत हभप महाराजांचे हरीकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ रोजी हभप. संतोष महाराज पळसोना आणि दि. २३ रोजी हभप.ज्ञानेश्वर महाराज जालना यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला आहे. दि.२४ रोजी हभप.सुरेश महाराज पोफळी, दि.२५ रोजी हभप.सौ.मीनाताई हिपळणीकर, दि. २६ रोजी हभप.दासा महाराज रातोळीकर, दि. २७ रोजी हभप.किशन महाराज हिप्परगेकर, तर दि.२८ एप्रिल रोजी हभप. श्यामसुंदर गिरी महाराज आष्टी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, यांच्या मधुर वाणीतून उपस्थितांना भक्तीचा मार्ग दाखविला जात आहे.

 
दि.२२ पासून रामायनाचार्य हभप.पंजाब महाराज चालगणीकर यांच्या मधुर वाणीत रामकथेला सुरुवात झाली असून, व्यासपीठ हभप.केशव विश्वनाथ कदम महाराज सांभाळत आहेत. तर त्यांना मृदंगाचार्य म्हणून हभप.माधव महाराज मरसूळकर, गायनाचार्य हभप.प्रकाश महाराज, रामराव महाराज, गंगाधर महाराज, भीमराव महाराज, पांडुरंग महाराज, चौपदर हभप.प्रकाश महाराज आमगव्हाणकर, तर वाळकी, धानोरा, शिवानी, कोपरा, वाळकी बु, दगडवाडी, टाकराळा, करारी, धोतरा, हरडफ, आष्टी, कोळेगाव, कंजरा आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळी सहकार्य करीत आहेत. सदर रामकथेला गावकरी महिला - पुरुष भक्तांचा प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यक्रमातून दिसून येत आहे. सात दिवसानंतर दि.२९ एप्रिल रोजी कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाच्या कार्यक्रमाने होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन गावकरी व संयोजक मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम

गोवंश हत्या बंदी कायद्याचा आदर सर्वांनी करावा... डॉ. अरविंद गायकवाड 
हिमायतनगर(प्रतिनिधी)महाराष्ट्रात प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अन्वये गोवंश हत्या बंदी कायदा ०४ मार्च २०१५ पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून, याचा आदर सर्वांनी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभाग नांदेडचे सहाय्यक आयुक्त डॉ.अरविंद गायकवाड यांनी केले. 

ते दि.२३ शनिवारी हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय कार्यालयात लावण्यात आलेल्या जनजागृती फलक आनावरण व शेतकर्यांना पूरक व्यवसाय प्राधान्य क्रमाने निवड केलेल्या प्रकल्पाची पाहणी कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी हिमायतनगर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय मादळे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी जी.एम.कदम, पत्रकार अनिल मादसवार, कानबा पोपलवार यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले कि, महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्याची माहिती शेतकर्यांना व्हावी व पशु हत्या थांबावी याबाबतचे मार्गदर्शन व त्याची सखोल माहिती दिली जात आहे. कुठेही गोवंश विक्री, अथवा खरेदीचं उद्देशाने कोणी च्चापानी करीत असेल तर परिसरातील पशु प्रेमी नागरिकांनी प्रश्नाला याची माहिती द्यावी. तसेच जनावारंची वाढती संख्या व भाकड जनावरांच्या पालन पोषणासाठी शासन प्रयत्न करीत असून, लवकरच याबाबत ठोस उपाययोजना जाहीर झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून गोशाला उभारल्या जाणार आहेत. प्राणी राक्षांची सुधारित कायद्यातील कलम ५ अन्वये कोणताही व्यक्ती राज्यातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही गाईंची, वळूची किंवा बैलाची कत्तल करणार नाही किंवा करविणार नाही, कलम ५ अ (१) अन्वये कत्तल करण्यासाठी गाय, वळू किंवा बैल याची वाहतूक करण्यास प्रतिबंध, कलम ५ अ (२) अन्वये कत्तल करण्यासाठी गाय, वळू, किंवा बैल याचं निर्यात करण्यास प्रतिबंध, कलम ५ ब अन्वये गाय, वळू , बैल यांची अन्य कोणत्याही पद्धतीने  कत्तलीसाठी विक्री, खरेदी करण्यास, विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध. कलम ५, ५ अ, ५ ब चा भंग केल्यास १० हजाराचा दंड व ५ वर्ष कारावासाची शिक्षा होणार आहे. तसेच कलम ५ क अन्वये गाय, वळू, बैल यांचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई, कलम ५ ड अन्वये महाराष्ट्र राज्याबाहेरील कत्तल केलेली गाय, वळू, बैल यांचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई, कलम ६ अन्वये अनुत्पादक म्हशी आणि म्हशींची पारडे या प्राण्यांची सक्षम पशुवैद्यकामार्फत कत्तल पूर्व तपासणी न करता कत्तल करण्यास मनाई(मान्यताप्राप्त कत्तलखान्याचे ठिकाणीच ताक्कालीस परवानगी) कलम ५(क), ५(ड), ६ चा भंग केल्यास २००० रुपये दंड व ०१ वर्ष कारावासाची शिक्षा ठेवण्यात आली आहे.   तसेच कलम ६, कलम १० विषयी विस्तृत अशी माहिती उपस्थितांना दिली.  

त्यानंतर तालुक्यातील मौजे वारंगटाकळी, जवळगाव, मंगरूळ येथील पूरक व्यवसायासाठी निवड झालेल्या पत्रा लाभार्थ्यांच्या प्रकल्पास भेट देवून पाहणी केली आणि लाभार्थ्यांना पाकालाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी यावेळी डॉ.पी.आर.लोखंडे, डॉ. पी.के.माघाडे, डॉ. के.आर.पवार, श्री गोडबोले, शेख फेरोज, सुशील शिंदे, जक्कलवाड यांच्यासह शेतकरी शिवाजी जाधव पाव्नेकर, शे.सिकंदर हि.नगर, अरविंद गणेश राठोड उमरहिरा तांडा, अनिल महादू घुले खडकी यांच्यासह अनेकांचं उपस्थिती होती.     

मराठवाडा विभागीय कराटे स्पर्धा

२४ एप्रिल रोजी होणार हिमायतनगर येथे पहिली मराठवाडा विभागीय कराटे स्पर्धा  - खंडू चव्हाण

हिमायतनगर(प्रतिनिधी)साऊथ इंडिया वादोकाई करते असोशियेषण द्वारा आयोजित पहिली मराठवाडा विभागीय कराटे स्पर्धा २०१६ चे आयोजन हिमायतनगर येथे करण्यात आले आहे. हि स्पर्धा दि.२४ एप्रिल रोजी संपन्न होणार असल्याची माहिती मुख्य प्रशिक्षक खंडू एम.चव्हाण यांनी दिली.

मराठवाडा स्तरीय विभागीय करते स्पर्धा हि पहिल्यांदाच हिमायतनगर शहरात पार पडत असून, यासाठी करते संघांनी नोंदणी करून घेण्यासाठी खंडू चव्हाण यांच्या ९६०४३१३५५१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या स्पर्धेत खालिक वजन गटात स्पर्धा संपन्न होणार असून, कलर बेल्ट मध्ये मुलांच्या गटातून १५ किलो वजन खालील व ६१ किलो वजनाच्या वरील विद्यार्थ्यांना खेळता येणार आहे. कलर बेल्ट मुलीच्या गटातून १५ किलो वजना खालील ते ५६ किलो वजनाच्या वरील विद्यार्थीनीना खेळता येणार आहे. ब्लैक बेल्ट स्पर्धेत मुलांच्या गटात ३५ किलो वजन गट खालील ते  ६० किलो वजन गटावरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. तसेच ब्लैक बेल्ट मध्ये मुलींच्या गटात ३० किलो वजना खालील व ५१ किलो वजना वरील विद्यार्थीनीना खेळता येणार आहे.

विभागीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी - विद्यर्थिनिना आकर्षक मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या संघास सुवर्णपदक व विभागीय कराटे चषकाने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ऑल इंडिया ग्रैंड मास्तर वाडोदरा गुजरात, साऊथ इंडिया वादोकाई कराटे  असोसियेशनचे अध्यक्ष सुशीलकुमार चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेत तम्मा कराटेप्रेमी विद्यार्थी,विद्यर्थिनिनि मोठ्या संखेत सहभाग नोंदवावा असे आव्हान सेन्साई खंडू चव्हाण यांनी केले. 


   

शुक्रवार, 22 अप्रैल 2016

१० वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड

आत्याच्या मुलीवर अत्याचार करून तिला अल्पवयात आई करणाऱ्यास १० वर्ष सक्तमजुरी
 नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)आपल्या आत्याच्या अल्पवयीन बालिकेवर सतत अत्याचार करून तिला वयाच्या पूर्वी गर्भवती करणाऱ्या एकाला नांदेडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी १० वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.या प्रकरणात दुसरा आरोपी हा विधी संघर्ष ग्रस्त बालक आहे त्याचे आरोपपत्र बाल न्याय मंडळा समोर प्रलंबित आहे. 
                           सिडको,बळीरामपूर भागात आपल्या आत्याची मुलगी असलेल्या एक अल्पवयीन बालिकेवर राजू उर्फ राजरत्न साहेबराव नवघडे वय २३ या युवकाने सतत अत्याचार केले.त्याच्या या अघोरी कृत्यात एक विधी संघर्ष ग्रस्त १७ वर्षाचा बलाकचा सुद्धा समावेश होता.या दोघांनी त्या बालिकेला गर्भवती होई पर्यंत तिच्यावर अत्याचार केले.या प्रक्रातून त्या अल्पवयीन बालिकेने दिनांक २८ मार्च २०१३ रोजी पिडीत बालिकेने पुन्हा मुलीला जन्म दिला.हा प्रकार पिडीत बालिकेच्या आईने आपला भाऊ आणि राजूचा वडील यास सांगितली.आपल्या बहिणीला मदत करण्या ऐवजी भावाने सुद्धा पिडीत बालिकेच्या आईला झिडकारले आणि पोलीसाकडे गेलीस तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.
                               अखेर आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची तक्रार पिडीत बालिकेच्या आईने दिनांक २५ जुलै २०१३ रोजी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली.सहायक पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी राजू आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यास पकडले.तपासा नंतर राजू उर्फ राजरत्न विरुद्ध नांदेडच्या जिल्हा न्यायालयात आणि अल्पवयीन बालाकाविरूढ जिल्हा बाल न्याय मंडळात दोषारोप पत्र दाखल केले.जिल्हा न्यायधीश सविता बारणे यांच्या समोर राजू उर्फ राजरत्न विरुद्ध एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.उपलब्ध पुरावा आधारे न्या.सविता बारणे यांनी राजू उर्फ राजरत्न साहेबराव नवघडे यास भादवीच्या कलम ३७६ साठी १० वर्ष सक्तमजुरी आणि बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम अन्वये १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि एक हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.या दोन्ही शिक्षा राजू उर्फ राजरत्नला सोबत भोगायच्या आहेत.या प्रकरणातील विधी संघर्ष ग्रस्त बालकाचे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे प्रलंबित आहे.या खटल्यात सरकार पक्षाची बाजू अड़.रणजीत देशमुख यांनी मांडली.

गुरुवार, 14 अप्रैल 2016

अधिकृत एजन्सी मिळाली

अखेर.... हिमायतनगर शहराला एच.पी. गैसची अधिकृत एजन्सी मिळाली 

हिमायतनगर(प्रतिनिधी)गेल्या अनेक वर्षापासून ग्राहकाकडून केली जाणारी मागणी अखेर पूर्ण झाली असून, शहरासाठी अधिकृत गैस एजन्सी जाहीर झाल्याने शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची परवड थांबणार असल्याने ग्राहकातून समाधानाचे वातावरण आहे. 

हदगाव तालुक्यातून विभाजन होऊन हिमायतनगर तालुक्याला जवळपास १५ वर्षाहून अधिकच काळ  लोटला. परंतु तालुक्याला म्हणाव्या त्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यात महत्वपूर्ण आणि इंधनाची  सोय म्हणून राबविण्यात येणारी अधिकृत गैस एजन्सी नव्हती. म्हणून येथील नागरिकांना थेट हदगाव, उमरखेड अथवा भोकर शहराकडे जाउन गैस मिळवावा लागत आहे. हि बाब लक्षात घेता आणि नागरिकांची मागणी लक्षात घेत दोन वर्षापूर्वी हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. ची डीस्ट्रीब्युटर (एजन्सी) साठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. हिमायतनगर तालुक्याच्या एजन्सीसाठी जवळपास २५ लोकानी सर्व नियम, अटी, शर्ती नुसार निविदा भरल्या होत्या. त्यापैकी ड्रो पद्धतीने निवड करण्यात आली असून, यात हिमायतनगर येथील प्रसिद्ध शेतकरी सौ. जया प्रवीण जन्नावार यांच्या नावाने जाहीर करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा कंपनीच्या वतीने करण्यात आली असून, असे पत्र दि.१२ एप्रिल रोजी एजन्सिधारक सौ.जन्नावार यांच्या नावाने देण्यात आले आहे. यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना आता एच.पी.चा गैस कनेक्शन व रिफील नोंद व त्याची डिलिवरी हिमायतनगर शहरातून मिळणार आहे. एजन्सीच्या कामास वेग आला असून, लवकरच शहराच्या बाहेर गैस एजन्सीचे अधिकृत गोडावून आणि शहरात वितरण कार्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर जवळपास २ महिन्यात हि एजन्सी कार्यान्वित होणार असल्याने नागरिकांची परवड थांबणार आहे. 

मंगलवार, 12 अप्रैल 2016

वगाराची शिकार...

बिबट्याने केली म्हशीच्या वगाराची शिकार...
हिमायतनगर शिवारातील घटना

हिमायतनगर(प्रतिनिधी)पळसपूर रस्त्यावरील हिमायतनगर शिवारात आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एका भुकेल्या बिबट्याने आखाड्यावरील म्हशीच्या वगाराची शिकार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे नदी काठावरील व यावर अवलंबून असलेल्या गावात पाणी टंचाई ची भीषण समस्या उद्भवली आहे. हिमायतनगर शहराच्या दक्षिण भागाकडून तेलंगणा आणि उत्तर भागाकडून विदर्भ आहे. त्याच्या आजूबाजूला जंगलाचा परिसर असून, यावर्षी अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे मानवा बरोबर वन्य प्रण्यानाही तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशीच तहान भागविण्यासाठी पळसपूर - हिमायतनगर शिवारात भटकणाऱ्या एका बिबट्या वाघाने दि.१२ मंगळवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास नागोराव विश्वनाथ वानखेडे हे शेतातून दुध घेऊन गावाकडे गेले होते. दरम्यान शेत सर्व क्रमांक २६/७ मधील आखाड्यावर बांधून असलेल्या म्हशीच्या गोर्ह्यावर बिबट्याने झडप टाकून शिकार केली. सकाळी १० वाजता जेवण करून शेतात येताच वगारू मृत अवस्थेत आढळून आल्याने घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनपाल शिंदे यांनी घटनास्थळी येउन पंचनामा केला. तर पशुधन विकास अधिकारी धनंजय मादळे यांनी शाविछेदन केले. या घटनेत शेतकर्याचे नुकसान झाले असून, शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन वनपाल श्री शिंदे यांनी दिले आहे. 

मागील दोन महिन्यात पळसपूर - वारंगटाकळी परिसरात बिबट्याने दोन गाईंचा फडश्या पडला तर एक महिला व एका पुरुषावर रानडूकरणे हल्ला करून जखमी केले होते.  तेंव्हापासून या परिसरात बिबट्याचा वावर असून, यामुळे सर्व सामान्य शेतकरी, मजूर दार जगलीसाठी शेतीवर व दिवस एकटे जाण्यास धजावत नाहीत. हा प्रकार लक्षात घेता वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी जंगल परिसरात पाणवठे तयार करून नागरिक व पशुधानाना सुरक्षा द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

रानडुकराच्या हल्यात शेळी जखमी 

तालुक्यातील विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या वारंगटाकळी नदी काठावर मानाग्लावारी सकाळी ८ वाजता खंडीभर शेळ्या घेवून भारत कोंडाबा कांबळे हे गेले होते. दरम्यान पाण्याच्या शोधत आलेल्या रानडुकराने शेळीच्या कळपावर हल्ला चढविला. प्रसंगवधानाने शेळ्या चारविनार्या शेतकर्याने आरडा - ओरड करून नागरिकांच्या मदतीने रानडुक्करास धुडकावून लावाले. परंतु रानडुक्कराणे एका शेळीस चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पशुधन विकास अधिकारी यांनी शस्त्रक्रिया करून उपचार केले.