हिमायतनगर। हु. ज. पा.महाविद्यालया मध्ये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरी करण्यात आली...करियर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.
हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालया मध्ये ग्रंथालय विभागाद्वारे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली . याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम म्हणून लाभल्या .
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ .मगर सर मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा रोजगार विभाग अंतर्गत करिअर कट्टा स्पर्धा घेण्यात आली होती .या स्पर्धेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील श्री बोंबले राजू यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट दिले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .