१० वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड

आत्याच्या मुलीवर अत्याचार करून तिला अल्पवयात आई करणाऱ्यास १० वर्ष सक्तमजुरी
 नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)आपल्या आत्याच्या अल्पवयीन बालिकेवर सतत अत्याचार करून तिला वयाच्या पूर्वी गर्भवती करणाऱ्या एकाला नांदेडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी १० वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.या प्रकरणात दुसरा आरोपी हा विधी संघर्ष ग्रस्त बालक आहे त्याचे आरोपपत्र बाल न्याय मंडळा समोर प्रलंबित आहे. 
                           सिडको,बळीरामपूर भागात आपल्या आत्याची मुलगी असलेल्या एक अल्पवयीन बालिकेवर राजू उर्फ राजरत्न साहेबराव नवघडे वय २३ या युवकाने सतत अत्याचार केले.त्याच्या या अघोरी कृत्यात एक विधी संघर्ष ग्रस्त १७ वर्षाचा बलाकचा सुद्धा समावेश होता.या दोघांनी त्या बालिकेला गर्भवती होई पर्यंत तिच्यावर अत्याचार केले.या प्रक्रातून त्या अल्पवयीन बालिकेने दिनांक २८ मार्च २०१३ रोजी पिडीत बालिकेने पुन्हा मुलीला जन्म दिला.हा प्रकार पिडीत बालिकेच्या आईने आपला भाऊ आणि राजूचा वडील यास सांगितली.आपल्या बहिणीला मदत करण्या ऐवजी भावाने सुद्धा पिडीत बालिकेच्या आईला झिडकारले आणि पोलीसाकडे गेलीस तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.
                               अखेर आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची तक्रार पिडीत बालिकेच्या आईने दिनांक २५ जुलै २०१३ रोजी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली.सहायक पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी राजू आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यास पकडले.तपासा नंतर राजू उर्फ राजरत्न विरुद्ध नांदेडच्या जिल्हा न्यायालयात आणि अल्पवयीन बालाकाविरूढ जिल्हा बाल न्याय मंडळात दोषारोप पत्र दाखल केले.जिल्हा न्यायधीश सविता बारणे यांच्या समोर राजू उर्फ राजरत्न विरुद्ध एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.उपलब्ध पुरावा आधारे न्या.सविता बारणे यांनी राजू उर्फ राजरत्न साहेबराव नवघडे यास भादवीच्या कलम ३७६ साठी १० वर्ष सक्तमजुरी आणि बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम अन्वये १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि एक हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.या दोन्ही शिक्षा राजू उर्फ राजरत्नला सोबत भोगायच्या आहेत.या प्रकरणातील विधी संघर्ष ग्रस्त बालकाचे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे प्रलंबित आहे.या खटल्यात सरकार पक्षाची बाजू अड़.रणजीत देशमुख यांनी मांडली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी