अखेर.... हिमायतनगर शहराला एच.पी. गैसची अधिकृत एजन्सी मिळाली
हिमायतनगर(प्रतिनिधी)गेल्या अनेक वर्षापासून ग्राहकाकडून केली जाणारी मागणी अखेर पूर्ण झाली असून, शहरासाठी अधिकृत गैस एजन्सी जाहीर झाल्याने शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची परवड थांबणार असल्याने ग्राहकातून समाधानाचे वातावरण आहे.
हदगाव तालुक्यातून विभाजन होऊन हिमायतनगर तालुक्याला जवळपास १५ वर्षाहून अधिकच काळ लोटला. परंतु तालुक्याला म्हणाव्या त्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यात महत्वपूर्ण आणि इंधनाची सोय म्हणून राबविण्यात येणारी अधिकृत गैस एजन्सी नव्हती. म्हणून येथील नागरिकांना थेट हदगाव, उमरखेड अथवा भोकर शहराकडे जाउन गैस मिळवावा लागत आहे. हि बाब लक्षात घेता आणि नागरिकांची मागणी लक्षात घेत दोन वर्षापूर्वी हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. ची डीस्ट्रीब्युटर (एजन्सी) साठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. हिमायतनगर तालुक्याच्या एजन्सीसाठी जवळपास २५ लोकानी सर्व नियम, अटी, शर्ती नुसार निविदा भरल्या होत्या. त्यापैकी ड्रो पद्धतीने निवड करण्यात आली असून, यात हिमायतनगर येथील प्रसिद्ध शेतकरी सौ. जया प्रवीण जन्नावार यांच्या नावाने जाहीर करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा कंपनीच्या वतीने करण्यात आली असून, असे पत्र दि.१२ एप्रिल रोजी एजन्सिधारक सौ.जन्नावार यांच्या नावाने देण्यात आले आहे. यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना आता एच.पी.चा गैस कनेक्शन व रिफील नोंद व त्याची डिलिवरी हिमायतनगर शहरातून मिळणार आहे. एजन्सीच्या कामास वेग आला असून, लवकरच शहराच्या बाहेर गैस एजन्सीचे अधिकृत गोडावून आणि शहरात वितरण कार्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर जवळपास २ महिन्यात हि एजन्सी कार्यान्वित होणार असल्याने नागरिकांची परवड थांबणार आहे.