कराटे स्पर्धा

कराटे प्रशिक्षणाचा उपयोग अन्यायाच्या विरोधात व देशसेवेसाठी करावा - श्रीश्रीमाळ

हिमायतनगर(प्रतिनिधी)धकाधकीचे जीवन व स्पर्धेच्या युगात स्वतः व कुटुंबाच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच पार पाडावी लागणार आहे. हि बाब लक्षात घेता सर्वच मुला - मुलीनी शिक्षनाबरोबर कराटे महत्व जाणून घेवून प्रशिक्षण घ्यावे. यामुळे बुद्धीला चालना तर मिळते शिवाय इच्छाशक्ती प्रबळ होण्यास मदत मिळते. भविष्यात याचा उपयोग स्वरक्षनाबरोबर आजूबाजूला घडणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तसेच संधी मिळाल्यास देशसेवेसाठी करावा. असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केले. 

ते साऊथ इंडिया वादोकाई कराटे असोशियेषण द्वारा आयोजित पहिली मराठवाडा स्तरीय विभागीय कराटे स्पर्धेच्या अध्यक्षीय भाषणातून बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन दि.२४ रविवारी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदिर समितीचे अध्यक्ष महाविराचंद श्रीश्रीमाळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गजानना शिंदे, विजय नरवाडे, विठ्ठल ठाकरे, लखमावाड मैडम, नगरसेवक म.जावेद अ.गन्नि, अ.गुफरान, अनिल पाटील, अन्वर खान, अश्रफ भाई, विशाल राठोड, गजानन चायल, सदाशिव सातव, विलास वानखेडे, हरडपकर काका, पत्रकार आणि विविध तालुक्यातून आलेले कराटे कोच सेन्साई यांच्यासह अनेक मान्यवर, पालकांची उपस्थिती होती. रविवारी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंगल कार्यालयात संपन्न झालेली मराठवाडा स्तरीय विभागीय कराटे स्पर्धा ऑल इंडिया ग्रैंड मास्टर वाडोदरा गुजरातचे राजेश अग्रवाल, साऊथ इंडिया वादोकाई कराटे असोसियेशनचे अध्यक्ष सुशीलकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. कलर व ब्लैक बेल्ट स्पर्धा प्रतिस्पर्धी वजन गटात पार पडली. या स्पर्धेत मराठवाडा विभागातील नांदेड, औरंगाबाद, उमरखेड, किनवट, भोकर, डोंगरखेडा, हदगाव, तामसा, पुसद आदीसह अनेक ठिकाणाहून कराटे प्रशिक्षक व विद्यार्थी - विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. 

विभागीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी - विद्यर्थिनिना आकर्षक मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रथम येणाऱ्या संघास सुवर्णपदक व विभागीय कराटे चषक पदक देवून व्यंकटेश पाटील, अभिजित मुळे, पत्रकार अनिल मादसवार, कानबा पोपलवार, अनिल भोरे, साईनाथ धोबे, राजू गाजेवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन हिमायतनगर येथील मुख्य प्रशिक्षक सेन्साई खंडू चव्हाण यांनी आयोजित केली होती. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामा गाडेकर, शुभम संगणवार, राजू कदम, रवि देवसरकर, शेख फिरदोस, संदेश नरवाडे, अनिकेत गुड्डेटवार, कु.शुभांगी गाजेवार, रंजना आढाव, विकास लोखंडे, आकाश भोरे, राविसागर महाजन, रघु देशमुख, ऋषभ मिराशे, प्रवीण कूपटीकर, विक्रांत खेडकर यांच्यासह स्पर्धा आयोजक समितीच्या सर्व कराटे प्रशिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाठोरे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार खंडू सर यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी