NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

शनिवार, 23 अप्रैल 2016

ज्योतिर्लिंगांना जोडणाऱ्या रस्त्यांचे श्रेणीवर्धन करा

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांना जोडणाऱ्या रस्त्यांना
राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे  - सुधीर मुनगंटीवार

             मुंबई(प्रतिनिधी)महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांना जोडणाऱ्या रस्त्यांचे श्रेणीवर्धन करावे व त्यास राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करावे, अशी विनंती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांना पाठवलेल्या पत्रान्वये केली आहे.
            भाविकांच्या दृष्टीने ज्योतिर्लिंगांचे असलेले महत्व आणि या पाचही ज्योतिर्लिंगांना होणारी भक्तगणांची गर्दी लक्षात घेऊन ही मागणी केल्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले कीया ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी दररोज  लाखोंच्या संख्येने भाविक येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी हीच संख्या १० ते १५ लाख इतकी वाढते तसेच पूर्ण श्रावण महिन्यात या ज्योतिर्लिंगांना गर्दी असते.
            भारतातील एकूण १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. यामध्ये पाचवे ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ येथेसहावे भीमाशंकर पुणे येथेआठवे औंढा नागनाथ येथेदहावे त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे तर बारावे घृष्णेश्वर वेरुळ येथे आहे. महाराष्ट्र सरकाने येथे पर्यटक आणि भाविकांसाठी सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतू राष्ट्रीय महामार्गाने ही ज्योतिर्लिंगे जोडली गेल्यास ती राष्ट्रीय नकाशावर येतीलअसेही वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
            महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ आणि घृष्णेश्वर वेरुळ या ज्योतिर्लिंगांना राष्ट्रीय महामार्गाने जोडण्याचे तत्वत: निश्चित झाले आहे.  उर्वरित तीन ज्योतिर्लिंगांच्या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात श्रेणीवर्धन करण्याची गरज आहे.
            भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुण्यापासून १२७ कि.मी. अंतरावर वसले असून ते भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या परिक्षेत्रात येते. सध्या पुणे-राजगुरुनगर-भीमाशंकर (६७ कि.मी)मंचर घोडेगाव- भीमाशंकर (६० कि.मी.)  या दोन मार्गाने भीमाशंकरला जाता येते. यातील मंचर-घोडेगाव-भीमाशंकर  हा ६० कि.मी. चा छोटा लिंक रोड राष्ट्रीय महामार्ग ५० पासून जवळच्या अंतरावर आहे. याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर  झाल्यास भाविकांना ते सोयीचे होईल.
            हिंगोली पासून २३ कि.मी.,परभणीपासून ५२ कि.मी आणि नांदेडपासून ६० कि.मी. अंतरावर वसलेल्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाला जाण्यासाठी हिंगोली-औंढा नागनाथ हत्ता-पुर्णा-पालम-लोहा या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करावे, असे झाल्यास राष्ट्रीय महामार्ग ३६१ कर्नाटक (लातूर च्या बाजूने),  राष्ट्रीय महामार्ग ३६१ मध्यप्रदेश (अकोल्याच्या बाजूने)येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी जाणे सोयीचे होईल.
            त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक पासून २८ कि.मी. अंतरावरपालघरपासून १५० कि.मी. अंतरावर आहे. पालघर-मनोर-विक्रमगड-जवाहर-मोखाडा-त्र्यंबकेश्वर-नाशिक या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर केल्यास गुजरात आणि मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांनाही तिथे दर्शनासाठी जाणे सोयीचे होईलअसेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं: