२४ एप्रिल रोजी होणार हिमायतनगर येथे पहिली मराठवाडा विभागीय कराटे स्पर्धा - खंडू चव्हाण
हिमायतनगर(प्रतिनिधी)साऊथ इंडिया वादोकाई करते असोशियेषण द्वारा आयोजित पहिली मराठवाडा विभागीय कराटे स्पर्धा २०१६ चे आयोजन हिमायतनगर येथे करण्यात आले आहे. हि स्पर्धा दि.२४ एप्रिल रोजी संपन्न होणार असल्याची माहिती मुख्य प्रशिक्षक खंडू एम.चव्हाण यांनी दिली.
मराठवाडा स्तरीय विभागीय करते स्पर्धा हि पहिल्यांदाच हिमायतनगर शहरात पार पडत असून, यासाठी करते संघांनी नोंदणी करून घेण्यासाठी खंडू चव्हाण यांच्या ९६०४३१३५५१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या स्पर्धेत खालिक वजन गटात स्पर्धा संपन्न होणार असून, कलर बेल्ट मध्ये मुलांच्या गटातून १५ किलो वजन खालील व ६१ किलो वजनाच्या वरील विद्यार्थ्यांना खेळता येणार आहे. कलर बेल्ट मुलीच्या गटातून १५ किलो वजना खालील ते ५६ किलो वजनाच्या वरील विद्यार्थीनीना खेळता येणार आहे. ब्लैक बेल्ट स्पर्धेत मुलांच्या गटात ३५ किलो वजन गट खालील ते ६० किलो वजन गटावरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. तसेच ब्लैक बेल्ट मध्ये मुलींच्या गटात ३० किलो वजना खालील व ५१ किलो वजना वरील विद्यार्थीनीना खेळता येणार आहे.
विभागीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी - विद्यर्थिनिना आकर्षक मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या संघास सुवर्णपदक व विभागीय कराटे चषकाने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ऑल इंडिया ग्रैंड मास्तर वाडोदरा गुजरात, साऊथ इंडिया वादोकाई कराटे असोसियेशनचे अध्यक्ष सुशीलकुमार चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेत तम्मा कराटेप्रेमी विद्यार्थी,विद्यर्थिनिनि मोठ्या संखेत सहभाग नोंदवावा असे आव्हान सेन्साई खंडू चव्हाण यांनी केले.