नांदेड मध्ये अलर्ट

हैद्राबादमधील घटने नंतर नांदेड मध्ये अलर्ट 

नांदेड,(प्रतिनिधी)-हैद्राबादमधील छावणी भागात असलेल्या किशन बाग गुरुव्दारातील निशाण साहिब अज्ञात समाजकंटकांनी जाळून शिख धर्मियांच्या भावनेला ठेच पोहंचविली. या घटनेच्या निषेधार्थ व समाजकंटकांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन येथील सचखंड गुरुव्दाराच्या प्रशासकीय समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.नांदेड मेषे अलर्ट जरी झाला आहे. 

हैद्राबाद येथील छावणी भागात असलेला किशन बाग गुरुव्दारा शिख बांधवांसाठी एक पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाते. दि.13 मे च्या मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी या गुरुव्दारात जावून निशाण साहिब याला आग लावली व जाळून त्याची राख केली. ही बाब हैद्राबाद परिसरातील व हैद्राबादमधील शिख बांधवांना समजताच छावणी हैद्राबाद परिसरात तणावाचे वातावरण बनले. यापूर्वीही याच गुरुव्दारामध्ये अशा काही समाजकंटकांकडून शिखधर्मियांच्या भावना दुखावण्यात आल्या होत्या. उलट स्थानिक प्रशासनाकडून शिख युवकावरच पोलिसांकडून अन्याय होत गेला. काल रात्री झालेल्या घटनेमुळे तमाम शिख समाज संतप्त झाला असून, या घटनेच्या निषेधार्थ आज नांदेड येथील सचखंड गुरुव्दारा बोर्डाच्या प्रशासकीय समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात निशाण साहिब जाळणाऱ्या अज्ञात समाजकंटकांना ताबडतोब अटक करा व त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने केली आहे. या निवेदनावर सचखंड गुरुव्दारा प्रशासकीय समितीचे सदस्य सरदार बलवंतसिंघ गाडीवाले, सरदार रविंद्रसिंघ बुंगई, सरदार सुखदेवसिंघ हुंदल, सरदार जर्नेलसिंघ गाडीवाले, सरदार नवनिहालसिंघ जहागीरदार, सरदार गुरुचरणसिंघ घडीसाज, सरदार सुरींदरसिंघ आणि सरदार गुलाबसिंघ कंधारवाले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या पार्श्वभूमीवर नांदेड मध्ये अलर्ट जरी करण्यात आला असून पोलिसांनी अनेक ठिकाणी फिक्स पोईंट लावले आहेत आणि गस्त वाढवली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी