चौकशी गुलदस्त्यात

पवना तांडा येथील सोन्याची चौकशी गुलदस्त्यात 



हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे पवना तांडा येथील बहुचर्चित गुप्तधनाची चौकशी अद्यापही गुलदस्त्यातच असून, पोलिस मात्र या ठिकाणी काहीच नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मराठवाडा - अंध्रप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या तालुक्यातील मौजे पवनातांडा येथील एका शेतकर्यास बार्शीच्या दिवशी शेतात काम करताना चार सोन्याच्या विटा सापडल्याची चर्चा सबंध तालुकाभर पसरली होती. हि बाब पोलिसांपर्यंत जाऊ नये म्हणून राजू शंकर पवार या युवकाने सुरक्षेच्या दृष्टीने विटा त्याच्या भावाजीकडे ठेवल्याचे सांगण्यात आले. काही दिवसाने राजूने सोन्याच्या विटाची मागणी भावजीकडे केली असता, देण्यास टाळाटाळ केली. त्यावरून दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे राजूने गुप्तधनाची तक्रार हिमायतनगर पोलिसांना दिली. प्रथम अधिकार्याने चौकशीच्या नावखाली गावात भेट देऊन किरकोळ मारहाणीचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर राजू शंकर पवार याने सोने सापडल्याची फिर्याद दि.०५ मे  २०१४ रोजी दिली.  तेंव्हापासून सदर प्रकरणी चौकशी चालू असल्याच्या बतावण्या पोलिसांकडून केल्या जात आहेत. आता तर चक्क पोलिस या घटनेत काहीच तथ्य नसल्याचे सांगून सदर प्रकरण दडपण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा तालुकाभर सुरु आहे. असे असले तरी यातील एक सोन्याची वीट पोलिसांनी हस्तगत केली असून, उर्वरित सोन्याच्या विटा एका राजकीय व्यक्तीकडे ठेवण्यात आल्याच्या चर्चेला उधान आले आहे. त्यामुळे पोलिसांची चौकशी मंदावली असून, या प्रकरणाची चौकशी गुलदस्त्यात ठेऊन शासकीय मालमत्ता असलेले सोने गिळंकृत करण्याचे षड्यंत्र सुरु असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. 

या ठिकाणी सापडलेल्या सोन्याचे मुल्य कोट्यावधीपेक्षा जास्त मूल्याचे असल्याने हे प्रकरण निवडणुकीच्या धामधुमीचा फायदा घेत पोलिसांनी एका राजकीय व्यक्तीला हाताशी धरून आपले उखळ पांढरे करीत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु केल्याची जोरदार चर्चा ग्रामस्थांमधून होताना दिसून येत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी