...तर हिंगोलीची जागा

....तर हिंगोलीची जागा अपक्ष लढविणार ..? सुर्यकांता पाटील

हिमायतनगर(अनिल मादसवार)हिंगोलीच्या जागेवर डोळा ठेवणाऱ्या मित्र पक्षाच्या पदाधिकार्यांनी जास्त थायथयाट करू नये, कारण हि जागा आमुचीच आहे, आणि आम्हीच लढविणार, तिकीट न मिळाल्यास वेळ प्रसंगी अपक्ष निवडणूक लढविणार असे ठाम मत माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, सुशीलकुमार जाधव, किनवटचे आ.प्रदीप नाईक, वसंत सुगावे, आनंद पाटील, चक्रधर शेळके, अमर काजी, सुरेश रंगेनवार आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, सत्तेवर असताना केलेल्या कामगिरीचा पाढा वाचताना उपस्थित नागरिकांपैकी एका शेतकर्यांनी कारखान्याचे काय..? केले असा प्रश्न विचारतच बाई भडकल्या आणि काही हरामखोराणी आमचा कारखाना पळविला. दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारे स्वतःच खड्ड्यात पडतात याचा अनुभव त्यांना येतही आहे, असा टोला नाव न घेता अशोक चव्हाण यांना लगावला. आम्ही १५ वर्ष हुजपा कारखाना चालविला मात्र शेतकऱ्यांचा एक नवा पैसाही खाऊन बाटलो नाही. शेतकऱ्यांसाठी जीवाचे रान केले, मात्र कधीही दुसर्यांना पाण्यात पहिले नाही.

देशात कॉंग्रेसची सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसार्वो शरद पवार साहेबांनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या हक्काच्या २२ जागांवर निवडणूक लढविणार. मित्र पक्ष काँग्रेस हा आमचा मोठा भाऊ आहे. मोठा भाऊच धुरा खोदण्याची कामे करून हिंगोलीच्या जागेसंबंधी वावड्या उठवीत असून, आमच्या हक्काची जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्ता माझ्याच घरी राहावी असे म्हणणारे काही राक्षस जन्माला आले आहेत, त्यासाठी काँग्रेसवाल्यांनी जास्त थयथयाट करून आमच्या नादी लागू नये. कोणत्याही परिस्थिती तुमची ताई २०१४ ची लोकसभेची निवडणूक लढवून हि जागा जिंकून दाखवेल असा ठाम विश्वास यांनी दाखवून, वेळप्रसंगी हिंगोलीतून अपक्ष निवडणूक लढविणार अशी घोषणा हिमायतनगर येथे विकास रथ यात्रेच्या मंचावरून बोलताना श्रीमती पाटील यांनी केली. सत्तेवर असताना केलेल्या विकास कामांचा गवगवा न केल्यामुळेच गेल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर विद्यमान खा. सुभाष वानखेडे यांच्यावर तोंडसुख घेत कपड्यात झालेले परिवर्तन हेच मतदार संघाचे परिवर्तन असल्याची खिल्लीही त्यांनी उडविली. तसेच आगामी निवडणुकीत मतभेत निर्माण करू पाहणार्यांच्या थापाड्या गोष्टीला बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी मतदारांना यावेळी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी