तिरंग्याचा अनादर

तिरंग्याचा आदर न करणाऱ्या शिक्षकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा 


हिमायतनगर/सरसम(वार्ताहर)नांदेड - किनवट राज्यरस्त्यावर असलेल्या मौजे सरसम येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्या प्रसंगी केंद्रीय प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण नंतर शाळेतील एका शिक्षकाने राष्ट्रध्वजास एकास बुद्धीने सलामी दिली नसल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन येथील ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे दिले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मौजे सरसम येथे २६ जानेवारी २०१४ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा पहासष्टावा वर्धापन दिन केंद्रीय प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आले. सकाळी ध्वजारोहण नंतर शाळेतील एका करामती असलेल्या बावणे नावाच्या शिक्षकाने राष्ट्रध्वजास सलामी दिली नाही. हि बाब उपस्थित नागरिकांच्या लक्षात आली. सदर शिक्षकाने जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अंदर केला आहे. आणि अश्या शिक्षकावर तत्काळ गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी उपस्थित गावकर्यांनी गटशिक्षण अधिकारी एस.एस.सुराजुसे यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर माजी सरपंच सुनील वानखेडे, बालाजी तुकाराम मंडलवाड, विजय बिच्चेवार, मारोती परसेवाड, साईनाथ शिंदे, गोविंद गोडसेलवार, रामजी ताटेलोटे, ग्राम पंचायत सदस्य साईनाथ धोबे, दत्त अडबलवार, व्यंकटेश जाधव, पुंडलिक कदम, हरीश गिरी, गजानन मोरे, नामदेव मैकलवाड, कोंडाबा कवडे, विष्णू शिंदे, संभाजी मोरे, सुनील दमकोंडवार यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.

बदलीची अनेक वेळा मागणी
-------------------------------

सदरील उचापती शिक्षक बावणे यांची बदली करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीने व गावातील सरपंच, उपसरपंच यांनी शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही बदली झाली नाही. परिणामी सदर शिक्षकाचा मनमानी कारभार वाढला असून, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी या उचापती शिक्षकास पाठीशी घालत आहेत कि काय..? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी केला आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी