विकास रुपी महामेरू शरद पवार

मोदी विकासाचे नव्हे धर्मांधतेचे मोडेल होय.. उमेश पाटील
विकास रुपी महामेरू शरद पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन

हिमायतनगर(अनिल मादसवार)भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदीनि सत्ता हस्तगत करण्यासाठी हिंदुत्ववादाच्या नावावर, जाती धर्माच्या नावावर, महाराष्ट्रातील जनतेत धार्मिकतेचे तेढ निर्माण करीत आहेत. एवढेच नव्हे तर एम.आय.एम.सारख्या पक्षांना पैसा पुरउन पंतप्रधान पद बळकावण्याचे षड्यंत्र सुरु केले आहे. अशी घणाघाती टीका करून मोदी विकासाचे नव्हे धर्मांधतेचे मोडेल असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला. ते हिमायतनगर येथे विकास रथ यात्रा घेवून आले असता मंचावरून बोलत होते. यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, सुशीलकुमार जाधव, किनवटचे आ.प्रदीप नाईक, वसंत सुगावे, आनंद पाटील, चक्रधर शेळके, अमर काजी, सुरेश रंगेनवार आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

सांप्रदाईकता छोडो...भारत जोडो..विकास कि और चलो.. या रथाचे आगमन होतच शहरातील मुख्य रस्त्यावरून मोटार सायकल रेली काढण्यात आले. तसेच रथ श्री परमेश्वर मंदिराच्या मैदानात दाखल फटक्याच्या आतीशबजीने कार्यक्रमाचे संयोजक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सरदार खान यांनी जंगी स्वागत केले. यानंतर पुढे बोलताना ते म्हणाले कि, देशात गुजरात महाराष्ट्राच्या तुलनेत मागे आहे. एकूण उत्पादनात गुजरात ७ टक्के तर महाराष्ट्र १५ टक्के आहे. गुजरातमध्ये ८० टक्के बारमाही रस्त्यांनी गावे जोडली तर आपल्या राज्यात ९५ टक्के गुंतवणुकीत गुजरातपेक्षा आपण दुप्पट पुढे आहोत. तीन बालकामागे एक बालक कुपोषित.. हाच विकासाचा मॉडेल भाजप देशासमोर देणार काय..? धर्मांध शक्तीला बळ देणाऱ्या भाजपच्या नीतीमुळे भारताचे विघटन होईल. सोव्हिएट संघ (रशिया) सारखी अवस्था आपल्या देशाची होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. तसेच भाजप हा धर्मांध - जात्यंध पक्ष आहे, म्हणून जातीवादी विघटनवादी एम.आय.एम.सारख्या पक्षाला सभा घेण्यासाठी पैसा पुरवितो असा आरोपही त्यांनी केला. गुणवत्तेच्या बाबतीत पिछाडीवर असलेले गुजरातच्या मोदिनी महाराष्ट्रातील कृषी, औद्योगिक - आर्थिक - शैक्षणिक गुणवत्तेची बरोबरी करून दाखवावी असे म्हणून गोपीनाथ मुंडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजडीवाल यांच्यावर थेट हल्ला चढविला. तसेच ना. शरद पवार साहेबांनी शेतकरी, कष्टकरी, यांच्यासाठी विकासाच्या वाटा चालू करून, राजीव गांधी जीवनदायी योजना, अन्न सुरक्षा योजना, सिंचन व्यव्यस्था यासह अनेक विकासच्या योजना राबविल्या. त्यामुळे आगामी काळात कोणत्याही जातीयवादी संघटनेच्या अमिषाला बळी ना पडता ना.शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस बळकट करण्याचे काम करणार्यांच्या पाठीशी पूर्णपणे पक्ष असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख, जिल्हा सरचिटणीस परमेश्वर गोपतवाड, तालुकाध्यक्ष नागोराव पतंगे, गणेश शिंदे, दशरथ गोसलवाड, अनंता देवकते, इरफान खान, बाळू मुधोळकर, बाबुराव होनमने, चंद्रकलाबाई गुड्डेटवार, लक्ष्मी मादसवार, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी