NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

शनिवार, 31 अगस्त 2013

मसुदा

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचा मसुदा
येत्या लोकराज्य मासिकात प्रसिद्ध होणार -- मुख्यमंत्री

मुंबई(प्रतिनिधी)अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचा मसुदा राज्यमंत्रिमंडळाने मंजूर केला असून शासनाच्या येत्या लोकराज्य मासिकात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिली.

मंत्रालय विधिमंडळ ........

कारवाई

कायदयाचे पालन न केल्यास कठोर कारवाई


फार्मासिस्टच्या गैरहजेरीज औषध विक्री केल्यास परवाने रद्द

नांदेड(अनिल मादसवार)फार्मासिस्ट हा रुग्ण व डॉक्टर यांच्यामधील अत्यंत महत्वाची कडी आहे. फार्मासिस्टने डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन मधील औषधी योग्य प्रकारे डिस्पेन्स करणे व ती कशा प्रकारे घेतली जावीत याबाबत मार्गदर्शन करण्याचे काम रजिस्टर्ड फार्मा सिस्टद्वारे..........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3132&cat=Latestnews

नामर्द सरकार

प्रधानमंत्री म्हणजे चाबीचा बाहुला..
नामर्द सरकारकडून काय अपेक्षा करताय.. खा.सुभाष वानखेडे


हिमायतनगर(अनिल मादसवार)खते बियाणे व्याजाने आणले, अतिवृष्टीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले, तरीही गेंड्याची कातडी पांघरलेले सरकार जागे होत नाही. त्यामुळे शेतकर्यांन हक्काच्या मागणीसाठी आंदोलने करावी लागत आहेत. यास कारणीभूत काँग्रेसचे सत्ताधारी नेते असल्याचा आरोप करीत, नामर्द सरकारकडून काय..? अपेक्षा करताय असा सवालही सुभाष वानखेडे यांनी उपस्थित शेतकर्यांना विचारला. सत्ताधारी.........http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3126&cat=Mainnews

रुमणे मोर्चा

तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले ....

खासदार सुभाष वानखेडे


हिमायतनगर(अनिल मादसवार) कायदा सुव्यवस्थेचा दंडोरा पिटावणार्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिमायतनगर तालुक्यात ४ खून झाले आहेत. अश्या आरोपींना पकडण्याचे सोडून स्थानिक पोलिस हे तटाखालच्या मांजरासारखी वागत आहेत. जातीय दंगली, मटका - जुगरासह स्वस्त धान्य व रेशनचा काळा बाजार, विकास कामाच्या नावाखाली केला..........

शुक्रवार, 30 अगस्त 2013

चिंता वाढली

पिकांची स्थिती पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढली हिमायतनगर - तालुक्यात मागील दिवसात झालेल्या पावसाने पिके नुकसानीत आले असून, वाढही खुंटली आहे. त्या पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. अधून मधून रिमझिम पावसाचे आगमन होत असल्याने पिकांवर मावा, आळ्या चा प्रादुर्भाव वाढला असून, असमाधानकारक पिके दिसत असल्याने खरीप हंगामात केलेला खर्च निघेल कि नाही याची चिंता शेतकर्यांना लागली आहे.

http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3103&cat=Latestnews

गालबोट ...

अंतर्गत गटबाजीने शिवसंपर्क अभियानाला गालबोट ...

जुनी कार्यकारिणी बरखास्त होणार...हिमायतनगर(अनिल मादसवार)मोठ्या गाजावाजाने हिमायतनगर तालुक्यात शिवसेनेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून आगामी लोकसभा - विधानसभा निवडनुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी व जास्तीती जास्त युवकांना आकर्षित करण्यासठी नोंद शिवसंपर्क नोंदणी अभियान सुरु करण्यात आले, नोंदणीच्या शुभारंभ करन्यासाठी नांदेड जिल्हा प्रमुख हेमंत पाटील आले होते. परंतु या शुभारंभ प्रसंगीच येथील शिवसेनेतील गटबाजी उघड झाली असून, चक्क हेमंत पाटील बोलत असताना एका अतिउत्साही कार्यकर्त्यांनी ऊठून गोंधळ घातल्याने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे.

 सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

चौकशी करा

शाळेतील निधीत व भत्त्यात अपहार करणाऱ्या वाघी येथील मुख्याध्यापकाची चौकशी करा..

वाघी(वार्ताहर)नुकतीच बांधकाम करण्यात आलेली शाळा खोली अल्पश्या पावसाने गळू लागली  असून, मुलांना आसन व्यवस्था नसल्याने खाली बसून ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे. मागील २०१० पासून शाळेतील मुलांना उपस्थिती भत्ता न देत अपहर केल्याचा संशय गावकर्यांना आल्याने येथील नागरिकांनी चौकशीची मागणी शिक्षण अधिकार्याकडे निवेदन द्वारे केली आहे.
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3102&cat=Latestnews

गुरुवार, 29 अगस्त 2013

22 शिक्षक निलंबीत

बदल्यानंतर शाळेत रुजू न होणार्‍या हदगाव / हिमायतनगर तालुक्यातील 22 प्राथमिक शिक्षक तडकाफडकी निलंबीत


नांदेड(अनिल मादसवार)सार्वत्रिक बदल्यानंतर शाळेत रुजू न होणार्‍या हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील 22 प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आज तडकाफडकी निलंबीत केले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांनी गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांची आज दि 29 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. .....
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा..

‘भूगर्भातील अभ्यास’

‘भूगर्भातील अभ्यास’ नवसंशोधकांना एक आव्हान - प्रो. कृष्णनलाल

नांदेड(प्रतिनिधी)भूगर्भातील अभ्यास करणे हा पुर्वी खुप किचकट विषय होता पण विज्ञानाच्या साहयाने निर्माण होणार्‍या नवनविन उपकरणाच्या आधारे आता ते अधिक सोपे झाले आहे. जगभरातील भूगर्भिय संशोधक रोज नवनविन संशोधन करीत आहेत तरी भारतातील संशोधकापुढे आजही बरेच संशोधनासाठी आव्हाने उभे आहेत, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूशास्त्र संकुल आणि भारतीय भूभौतिक ..........
सविस्तर वृत्तासाठी पुढील लिंक क्लिक करा ...

वाहतूक बंद...

  • उमरखेड - हिमायतनगर रस्ता बनला मृत्यूचा सापळा...
  • सणासुदीच्या दिवशी रिमझिम पावसाने १० तास वाहतूक बंद... 
  • स्थानिक नेत्यांच्या नावाने नागरिकांनी मोडली बोटे...हिमायतनगर(अनिल मादसवार)विदर्भ - मराठावाड्याला जोडणारा उमरखेड - हिमायतनगर रस्ता अतिशय खराब झाला असून, रिमझिम पावसाने वाहने फसत असल्याने तासन - तास मार्ग बंद होत आहे. असाच काहींसा अनुभव दि.२९ रोजी प.स.सभापतीसह वाहनधारक व प्रवाश्यांना आला असून, सकाळपासून बंद पडलेला रस्ता जेसीबी...........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

उपोषण मागे.

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळून देण्यासाठी करण्यात आलेले उपोषण ठोस आश्वासनाने मागे... तहसिलदाराच्या हलगर्जीपणामुळे वंचित शेतकऱ्यांची आमदार व उपविभागीय अधिकार्याकडे तक्रार.... 
आतातरी वंचित शेतकर्यांना न्याय मिळेल काय ?
हिमायतनगर(अनिल मादसवार)तहसिलदाराच्या दिशाभूल आदेशामुळे तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्या सर्व शेतकर्यांना न्याय मिळावा व तालुका ओला दुष्काळ जाहीर होऊन सरसगट शेतकर्यांना मदत मिळावी अशी मागणी करत गेल्या तीन दिवसापासून येथील शेतकरी प्रल्हाद पाटील व परमेश्वर मांगुळकर यांनी उपोषण सुरु केले होते. तब्बल तीन दिवसानंतर दि.२९ रोजी स्थानिक नेते व उपविभागीय अधिकार्यांनी भेट देऊन .....

सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा ...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3078&cat=Mainnews

बुधवार, 28 अगस्त 2013

परिक्रमा

" परिक्रमा एक वैचारिक मंथन "
हे भारतीय पुरुषा,
तू ......
विसरू नकोस कि, तुझ्या स्त्रियांचा आदर्श सीता, सावित्री, दमयंती, आहेत.
विसरू नकोस कि तुझ्ये उपास्य दैवत सर्वत्यागी उमानाथ शंकर आहेत.
सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा..


http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3075&cat=Nanded

" भ्रम " कि " वस्तुस्थिती "

साक्षात्कार " भ्रम " कि " वस्तुस्थिती "

संत वाड्मयात व अध्यात्मिक क्षेत्रात साक्षात्काराला फार महत्व आहे. असा साक्षात्कार आपणास व्हावा ; अशी प्रबळ इच्छा भाविकांना असते . संतानी त्यासाठी काही उपायही सांगितले आहेत. आपल्या हिंदू धर्मात शेकडो देव - देवता आहेत, त्यांचे भक्तही आहेत.अश्या भक्तांना त्यांच्या इष्ठ देवतांचे साक्षात्कार झाल्याचे दाखले पुरातन, संतांच्या चारित्र्यात भरपूर आहेत. असा साक्षात्कार खरंच होत असतो का..? हा कुतूहलाचा विषय आहे. सामान्य संसारी माणसाला त्याचे नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. 
सविस्तर लेखासाठी पुढील लिंक क्लिक करा...

आज होळी

वेगळा विदर्भ आणि स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी विदर्भ -मराठवाडयाच्या सीमेवर शेतकरी संघटना करणार नागपुर कराराची होळी

हदगांव(वार्ताहर)स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी स्वतंत्र भारत पक्षाचे माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली विदर्भवाद्यांकडून नांदेड-नागपुर महामार्गावर विदर्भ मराठवाडयाच्या हद्दीवर पैनगंगा नदीवर नागपुर कराराची होळी आज दि. २९ रोजी गुरुवारी दु. १२ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी वेगळया विदर्भाची मागणी करणारे ..........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3051&cat=Latestnews

उपोषणाचा दुसरा दिवस

ओला दुष्काळ जाहीर करा.. मागणीसाठी दुसर्या दिवशी आमरण उपोषण सुरु

हिमायतनगर(वार्ताहर)ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी दुसर्या दिवशी आमरण उपोषण सुरु असून, आजवर जवळपास १५ ग्राम पंचायतीने उपोषणाला पाठींबा दर्शविणारे ठराव दिले तर शेकडोहून अधिक शेतकरी व नागरिकांनी अभिप्राय नोंदून पाठिबा दिला आहे. परंतु एकही जबाबदार पदाधिकारी अथवा अधिकार्यांनी भेट दिली नसल्याने शेतकरी वर्गातून ..........
उपोषणाचा दुसरा दिवस सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

मंगलवार, 27 अगस्त 2013

सेक्स रॅकेट

मुंबईमध्ये नाशिकच्या माजी आमदाराच्या घरात सेक्स रॅकेटमुंबई(प्रतिनिधी)नाशिकचे विधानपरिषदेचे माजी आमदाराच्या वर्सोवा येथील घरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.काल रात्री मुंबई पोलीसांच्या समाजसेवा शाखेने वर्सोवा मधील....

सविस्तर बातमीसाठी खालील लिंक क्लिक करा ...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3036&cat=Crime

हल्ला

रानडुकराच्या हल्ल्यात सालगडी गंभीरहिमायतनगर(वार्ताहर)शेतात खताची मात्रा देणाऱ्या सालगड्यावर रानडुकराने हल्ला चढउन गंभीर जखमी केल्याची घटना दि.२७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वडगाव ज. परिसरातील शेत शिवारात घडली आहे.

सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3018&cat=Nanded

उपोषण सुरु.

ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे 

आमरण उपोषण सुरु...हिमायतनगर(प्रतिनिधी)सबंध हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून, बैन्केची कर्जमाफी द्या या मागणीसाठी मंगळवार ता.२७ पासून शेतकर्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्या शेतकर्यांना तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी पाठिबा दर्शविला आहे.........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3019&cat=Himayatnagar
.

जन्माष्ठमी विशेष लेख...

संभवामी युगे युगे .....भगवान श्रीकृष्ण.........

गोकुळचा कृष्ण आला ... दहीहंडी खेळायला.... आपण भारतीय हिंदू लोक अवतार हि संकल्पना मानणारे आहोत. आपल्या दहा अवतारांपैकी पूर्ण अवतार म्हणून फक्त श्री कृष्णाकडेच पाहतो. भगवान श्रीकृष्णाचे जीवन जन्मापासूनच संघर्षमय राहिले आहे. श्रीकृष्णाचा जन्मच मुळी कारागृहात झाला. असे म्हणतात कि, क्रांतीचा जन्म बंदिवासातच होत असतो. तत्कालीन भारत खणात " बळी तो कान पिळी " अशी स्थिती होती. म्हणूनच श्रीकृष्णाचे घोष वाक्य होते कि, " धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे "....
सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा...

सोमवार, 26 अगस्त 2013

‘अन्न सुरक्षा’

महाराष्ट्रात ‘अन्न सुरक्षा’ यशस्वीपणे राबविणार, अन्न सुरक्षा कायदा हा भुकेशी लढा देणारा कार्यक्रम -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणमुंबई(प्रतिनिधी)देशातील 82 कोटी जनतेला स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध करून देणारा अन्न सुरक्षा कायदा हा राजकीय व सामाजिक पातळीवर आमूलाग्र परिवर्तन घडवणारा असून कोणीही उपाशी रहाणार नाही याची खात्री देणारा आगळावेगळा असा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात हा कायदा यशस्वीपणे राबविण्याचा आमचा निर्धार आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ......
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3012&cat=Marathwada

मोर्चाचा इशारा

३० ऑगस्ट पर्यंत ओला दुष्काळ जाहीर न केल्यास 

शिवसेना काढणार रुमने मोर्चा....हिमायतनगर(वार्ताहर)अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आघाडी सरकार नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करून शेतकर्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. बळीराजा पुरता अडचणीत आला असून, ३० ऑगस्ट पर्यंत शासनाने ओला दुष्काळ जाहीर न केल्यास ३१ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर भव्य रुमने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा........

सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...


http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3011&cat=Himayatnagar

शिक्षणाचा अधिकार

बालकांच्या सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याची 


प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी धीरजकुमार


नांदेड(प्रतिनिधी)सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सर्व गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना आज आयोजित बैठकीत दिले. .........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा ...

कावड यात्रा

रामजी कि निकली सवारी ...श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण...नागेश पाटील यांच्या वतीने स्वागत व फराळाची सोय....हजारो कावडधारी सामील


हिमायतनगर(अनिल मादसवार)बजरंग दल शाखेच्या वतीने सहस्रकुंड धबधबा ते हिमायतनगर (वाढोणा) अशी पाई कावड यात्रा दि.२६ रोजी हर हर महादेव .. जय श्री राम नामाच्या गजरात काढण्यात आली. यात हजारो कावडधारी युवकांनी हाती भगवे झंडे व कावड तर अनेक भजनी मंडळ टाळ - मृदुंगाच्या गजरात सहभागी झाले होते. कावड यात्रा शहरात येताच श्री परमेश्वर दर्शनासाठी मंदिर परिसरात एकच...........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

रविवार, 25 अगस्त 2013

सामाजिक वनीकरण...चौकशीची मागणी

झाडे लावल्याचे दाखून २.५ लाखाची रक्कम उचलली....
प्रभारी सामाजिक वनीकरण लागवड अधिकार्याचा प्रताप... चौकशीची मागणीहिमायतनगर(अनिल मादसवार)तत्कालीन लागवड अधिकारी श्री शेख यांनी पळसपूर - घारापुर परिसरात २० हेक्टर मध्ये ५० हजार रोपे लावल्याचा अहवाल सादर करून २.५ लाखाची रक्कम उचलल्याची माहिती समोर आली आहे. अतिरिक्त लागवड अधिकार्याने केलेल्या या प्रकाराकडे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी लक्ष देऊन निकृष्ठ - अर्धवट 
...............
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

श्रधांजली

गजानन घुर्ये यांना पत्रकार व छायाचित्रकारांच्या वतीने भावपूर्ण श्रधांजली

हिमायतनगर(वार्ताहर)गजानन घुर्ये यांनी राजकीय क्षेत्रातील कुशल छायाचित्रकार म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली होती. त्यांच्या निधनाने एक कलाकुशल, दर्जेदार छायाचित्रकार आपण गमावला आहे, अशा शब्दांत जेष्ठ पत्रकार भास्कर.....
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

सामुदायिक पारायण

श्री संप्रदायक हिमायतनगरच्या वतीने परमेश्वर मंदिरात सामुदायिक पारायणहिमायतनगर(वार्ताहर)जगद्गुरु नारेन्द्रचार्याजी महाराज प्रेरित श्री संप्रदायक तालुका हिमायतनगरच्या वतीने मासिक उपक्रमांतर्गत येथील श्री परमेश्वर मंदिरात सामुदायिक पारायण सोहळा संपन्न झाल असून, या कार्यक्रमास १०१ भक्त पारायणाला बसले........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

धोका

एकंबा - कोठा रस्त्यावरील कठडे नसलेला पूल धोकादायक....


सिरंजणी(वार्ताहर)तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्ठीनिसाठी सुरु करण्यात आलेली मानव विकास मिशनची बस हि कठडे नसलेल्या धोकादायक पुलावरून प्रवास करीत असून, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे. ....
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

आंदोलन .

मुंबई- लातूर- नांदेड रेल्वे त्वरीत सुरु करण्यासाठी तीव्र आंदोलन .
रेल्वे दोन तास अडविली तरीही रेल्वे प्रशासनाकडून मात्र मोघम आश्वासन..!


नांदेड(अनिल मादसवार)मुंबई-लातूर-नांदेड रेल्वे त्वरीत सुरु करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर व रेल्वे संघर्ष समितीचे नेते ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय रेल्वे रोको आंदोलन करण्यात आल्यावरही रेल्वे प्रशासनाने केवळ मोघम आश्वासन दिल्याने एवढे मोठे आंदोलन...........

सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=2976&cat=Mainnews

शनिवार, 24 अगस्त 2013

श्रावण कावड

श्रावण मासानिमित्ताने कावड यात्रेची जय्यत तयारी ....

हजारो कावडधारी सहभागी होणार

हिमायतनगर(अनिल मादसवार)प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा नगरीतील बजरंग दलाच्या युवकांनी कावड यात्रेचे आयोजन केले असून, सदर यात्रा दि.२५ रविवारी सायंकाळी येथील परमेश्वर मंदिरातून प्रस्थान होणार आहे अशी माहिती, विश्व हिंदू परिषद तालुका संयोजक श्री महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना........

दिंडी

श्रावण मासात अखंड हरिनाम सप्ताहाची दिंडी - महाप्रसादाने सांगता

सिरंजणी(वार्ताहर)येथील हनुमान मंदिरात मागील १० दिवसापासून श्रावण मासानिमित्ताने सुरु असलेल्या अखंड हरिनाम साप्ताची सांगता गरम दिंडी व नगर भोजनाने करण्यात आली आहे.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी येथील हनुमान मंदिरात.........

गुन्हा

विश्वासघात करुन फसवणूक केली.. मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल ...

हिमायतनगर(वार्ताहर)येथील राजाभगीरथ विद्यालयतील कार्यरत माजी मुख्याध्यापक वाय. एन. गवंडे, आपल्या पदाचा दुरुपयोग करुन, शाळेतील पोषण आहाराचा स्वत:चे...
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

अत्याचार

आयुष्यच उद्ध्वस्त करणाऱ्या ‘त्या’ नराधमांना जन्मठेप व्हावी...!

मुंबई(ऑनलाइन वृत्त)'आई, 'त्या' पाच नराधमांनी माझं आयुष्यच उद्ध्वस्त केलंय. त्यांनी माझ्यावर जो अत्याचार केलाय, माझ्या मनावर जे आघात केलेत, त्याबद्दल त्यांना जन्मठेपेपेक्षा कमी शिक्षा होऊ नये', अशी उद्विग्न भावना मुंबई बलात्कार प्रकरणातील ...........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी....धीरजकुमार

नांदेड(प्रतिनिधी)स्वाईन फ्लूच्या आजाराची वेळीच काळजी घेतली तर हा आजार टाळता आणि पूर्णत: आटोक्यात आणता येतो. स्वाईन फ्लूच्या संशयित रुग्णांची तपासणी करुन पुढील योग्य त्या उपचाराची........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

श्रावण चतुर्थी

श्रावण संकष्ट चतुर्थीला हजारो भाविकांनी घेतले वरद विनायकाचे दर्शन...
घाण रस्त्यामुळे भक्तांच्या नाकाला रुमाल...
ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणीहिमायतनगर(अनिल मादसवार) पवित्र श्रावण मासात दि.२४ शनिवारी श्रावण कृ.४ संकष्ट चतुर्थीला येथील हजारो भाविकांनी पांडव कालीन तलावाच्या काठावरील श्री वरद विनायकाचे दर्शन घेतले.परंतु मंदिराकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर झालेला चिखल ......
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=2955&cat=Himayatnagar

शुक्रवार, 23 अगस्त 2013

यात्रेकरूंच्या अपेक्षा

माहूर रेणुकामाता मंदिरावरील नव्या प्रशासकीय मंडळाकडून यात्रेकरूंच्या अपेक्षा वाढल्या .....
स्थावर मालमत्ता जमा करण्याकडे प्रारंभीक कल, उत्पन्नवाढीबरोबरच सोयीसुविधांकडे लक्ष

नांदेड(विशेष प्रतिनिधी ) सर्वोच्च न्यायालया मार्फत माहूर गडावर १५ जुलै २०१३ रोजी मंदिरावरील बेजबाबदार निलंबित विश्‍वस्ता नंतर सह.आयुक्त औरंगाबाद यांचे कडे आरोप निश्‍चिती नंतरच्या कार्यवाहीसाठी पाठवून उपविभागीय महसूल अधिकारी ब्रिजेश पाटील यांचेसह विनायक फांदाडे व भवानीदास भोपी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी या मंडळाने कारभार ताब्यात घेऊन नारळी पौर्णिमेया प्रचंड यात्रेमुळे ताबा प्रक्रीयेवर दोन - चार दिवसांचा विश्राम दिला आहे. परंतु कार्यालय ताब्यात घेऊन दैनंदिन उत्पन्न वाढीसाठी बैठक घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न सुरु...........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

निषेध

मुंबई येथील छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलत्कार घटनेचा... हिमायतनगर तालुका पत्रकार व फोटोग्राफर असोशियनाच्या वतीने निषेधहिमायतनगर(प्रतिनिधी)मुंबई येथील एका इंग्रजी मासिकाची २२ वर्षीय छायाचित्रकार तरुणीवर अमानुष पद्धतीने पाच जणांनी सामुहिक बलात्कार करून, माणुसकीला काळिमा फसला आहे. सदर घटना निंदनीय.....
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=2932&cat=Himayatnagar

गुरुवार, 22 अगस्त 2013

चित्रपटांचा अभ्यास

चित्रपट अभ्यास ही काळाची गरज : डॉ. दुर्गेश त्रिपाठी


नांदेड(अनिल मादसवार)चित्रपटात काळाचे प्रतिबिंब उमटते. दादासाहेब फाळकेंनी निर्माण केलेल्या चित्रपटा पासून सुरू झालेला प्रवास काळानुसार बदलत आहे. या बदलत्या चित्रपटांचा अभ्यास ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य डॉ. दुर्गेश त्रिपाठी.............
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=2930&cat=Mainnews

उपोषणचा इशारा

ओला दुष्काळ जाहीर करून, बैन्कांची कर्जमाफी द्या..

२७ पासून आमरण उपोषण 


हिमायतनगर(वार्ताहर)अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी... हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून, बैन्केची कर्जमाफी द्या या मागणीसाठी दि.२७ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील शेतकरी .......
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=2920&cat=Himayatnagar

पदयात्रा स्वागत

विश्वधर्म जागरण पदयात्रेचे जंगी स्वागत

भोकर(वार्ताहर)मल्लिनाथ महाराज यांच्या विश्वधर्म जागरण पदयात्रेचे पवित्र श्रावण मासात भोकर शहरात आगमन होताच भक्तांनी जंगी स्वागत करून भोळ्या शंकराच्या मूर्तीचे दर्शन घेतले आहे. यावेळी हजारो भाविक - भक्तांची मांदियाळी ........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा .........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=2914&cat=Nanded

तयारी गणेशोत्सवाची

हिमायतनगर - गणेशौत्सव अवघ्या महिन्यावर येउन ठेपला असून, शहरातील मूर्तिकार मुर्त्या बनविण्यात व्यस्त आहेत. येथील मूर्त्यांना विदर्भासह - आंध्र प्रदेशात मोठी मागणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पिरीस, नारळी रंगासः कच्या मालाचे भाव वाढल्यामुळे गणेश भक्तांना महागाई चा सामना करावा लागणार आहे. छाया - जांबुवंत मिराशे

हत्येचा निषेध

हिमायतनगर तालुका पत्रकार संघटनेकडून दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध

हिमायतनगर(वार्ताहर)अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष,"साधना" मासिकाचे संपादक,जेष्ट विचारवंत डॉ.नंरेंद्र दाभोलकर यांचा निर्घुण हत्त्येचा निषेध व्यक्त करून हिमायतनगर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. 
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा....

बुधवार, 21 अगस्त 2013

राजीव

राजीवजींच्या दूरदृष्टीमुळेच देश महासत्तेच्या मार्गावर- नसीम खान

मुंबई, दि. 21 : देशात झालेल्या संगणक, इंटरनेट आणि टेलिकॉम क्रांतीचे राजीव गांधी हे खऱ्या अर्थाने प्रणेते होते. सुमारे 30 वर्षांपूर्वी अत्यंत दूरदृष्टीने त्यांनी घेतलेल्या.सविस्तर बातमीसाठी समोरील लिंक क्लिक करा .......http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=2907&cat=Latestnews

नांदेड न्यूज लाईव्हला वाचकांची वाढती पसंती....

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील विशेष: हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागातील ताज्या बातम्या वाचण्याची सोय आता उपलब्ध झाली आहे. हिमायतनगरचे तरुण पत्रकार अनिल मादसवार यांनी, नांदेड न्यूज लाइव्ह हा ऑनलाईन न्यूज पेपर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केला असून, राज्यतील तसेच देश - विदेशातील वाचक व नांदेडकरांनी या वेबसाईटला भेट देवून, आपली पसंती दर्शविली आहे. अल्पावधीतच हि वेबसाईट लोकप्रिय झाली असून, ताज्या घडामोडी वाचण्यास मिळत असल्याने वाचक वर्गातून शुभेच्छा व सूचना, घटनांची माहिती पोहोन्चाविली जात आहे.

या ऑनलाईन न्यूजपेपरचे संपादक अनिल मादसवार हे हिमायनगर (जि.नांदेड) येथील रहिवासी असून, ते गेल्या 7 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दैनिक देशोन्नती, पुण्यनगरी, लोकपत्र, गोदातीर, दैनिक एकजूट, लोकाशा, देवगिरी तरुण भारत, सर्वजन, उद्याचा मराठवाडा, दैनिक भास्कर, दैनिक पुढारी, दैनिक सामना, यासह बहुतांश दैनिकात पत्रकार म्हणून काम केले. त्यांच्या शेकडो बातम्यांची दाखल घेतल्या गेली असून, त्यांना नुकताच जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे व डॉक्टर काब्दे यांच्या हस्ते युवा पत्रकारिता पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे. तसेच या पूर्वी विविध पुरस्कार प्राप्त झाले असून, जिल्हा मूल्यमापन तंटामुक्त समितीचे सदस्यपद व तालुका अध्यक्ष असे अनेक पदे भूषविली आहे. ते एक उत्तम छायाचित्रकार असून, आजही लोकसत्ता, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकमत, गावकरी, एकमत अश्या अन्य नामवंत राष्ट्रीय वर्तमान पत्रात त्यांचे छायाचित्र प्रकाशित होतात. पत्रकार मादसवार यांना ऑनलाईन न्यूज पेपर सुरू करण्याची प्रेरणा सुरेश कुलकर्णी, गोविंद मुंडकर,यांनी दिली असून, मुख्य मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार भास्कर दुसे आहेत. या ऑनलाईन लाईन न्यूज पेपरमध्ये ताज्या घडामोडी प्रसिध्द होत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील वाचकांची मोठी सोय झाली आहे.
त्यांचा हा ऑनलाईन पेपर वाचण्यासाठी खालील लिंक क्लीक करा ..........http://www.nandednewslive.com/

श्रधांजली

दाभोलकरांनी आयुष्य कर्मी लावले.... श्रधांजली अर्पण

नांदेड(प्रतिनिधी)राज्यात पुरोगामीत्वाचे वारे अधिक वेगाने वाहण्यासाठी ज्या व्यक्तीने आपले आयुष्य कर्मी लावले अशा डॉ. नरेंद्र दाभोलकरांची मंगळवारी पुण्यात हत्त्या करण्यात आली. केवळ अंधश्रद्धानिर्मूलन समिती स्थापून या व्यक्तीने आपले कार्य थांबविले नाही. तर व्यसनविरोधी चळवळ, विज्ञानाची कास, निरपेक्ष समाजसेवा हे मूल्य समाजात रुजविण्याचे अविश्रांत कार्य केले. ‘साधना’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून लोकहिताचे विचार निस्वार्थीपणे समाजासमोर मांडले. धर्मांधतेच्या विरोधात जावून श्रद्धेने राहण्याचा संदेश देणा-या या विचारवंताचे विचार संपविण्याचा प्रयत्न अज्ञात समाज कंटकांनी केला.

नांदेड शहर व जिल्ह्यातून डॉ. दाभोलकरांच्या हत्येविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, घटनेचा निषेध मोर्चे काढून अनेकांनी केल, तसेच नांदेड जिल्हा अन्धश्रधा निर्मुलन समितीच्या वतीने शहरातून भव्य मोर्चा काढून तात्काळ मारेकर्यांना अटक करण्याची मागणी केली. तसेच डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना अनिसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ श्रधांजली अर्पण करण्यात आली यावेळी त्यांच्या कार्याची माहिती व पुढील दिशे बाबत मार्गदर्शन करताना गुणवंत पाटील हंगरगेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दाभोळकर यांच्या मारेक-यांना फाशी द्या

कंधार(वार्ताहर)पुरोगामी विचारांची परंपरा अविरतपणे पुढे जात रहावी यासाठी जन्मभर विवेकपूर्ण पध्दतीने केवळ विचारांचाच संघर्ष करणारे आणि अंधश्रध्देचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी सतत धडपडणारे अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष  सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

कळलावी

स्वागत गणेशोत्सवाचे 


गणेशोत्सव अवघ्या महिन्याभारावर येउन ठेपला असून, नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने माळरानावर कळलावीचे फुले बहरली आहेत.. या मनमोहक फुलानावर सूर्याचे सोनेरी किरण पडल्याने त्याचे आकर्षण वाढले असून, हे छायाचित्र टिपले आहे अनिल मादसवार यांनी  ..........कायदा....

जादूटोणाविरोधी वटहुकूम कायदा.... दाभोलकरांना हीच खरी श्रद्धांजली..!


मुंबई(प्रतिनिधी)अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची १४ वर्षांची तपश्चर्या अखेर त्यांच्या मृत्यूनंतर फळाला येणार आहे. समाजातील अंधश्रद्धा व कुप्रथांना चाप लावणारा जादूटोणाविरोधी कायदा प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत. हा कायदा करण्यावर राज्य मंत्रिमंडळाचे एकमत झाले असून लवकरच याबाबतचा वटहुकूम काढला जाणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना ही खरी श्रद्धांजली असल्याचे मानले जात आहे. सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा 
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=2908&cat=Mainnews

श्रद्धांजली

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दाभोलकर यांना श्रद्धांजली  


नांदेड(प्रतिनिधी)अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे अंधश्रधा निर्मुलन समितीचे अध्यक्ष व "साधना" मासिकाचे संपादक,जेष्ट विचारवंत डॉ.नंरेंद्र दाभोलकर यांचा निर्घुण हत्त्येचा निषेध व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.काल पुण्यात घडलेल्या या दुर्देवी घटनेचा अभाविप च्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत विचारांची लढाई हि विचारांनी करायला हवी.राज्य सरकारने हल्लेखोरांचा त्वरित शोध घेऊन हल्लेखोरांना कडक शिक्षा करावी. 

पुरोगामी महाराष्ट्रात सामजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते,पत्रकार यांची हत्त्या,हल्ले या सारखे प्रकार घडले आहेत. यांचा कुठे पर्यंत तपास झाले,हल्लेखोर मोकाट फिरत आहेत.एकूणच सर्वसामान्य जनतेची सुरक्षा करण्यात सरकार गंभीर दिसत नाही, अभाविप निषेध व्यक्त करत आहे. 

यावेळी विद्यापीठातील अभाविपचे कार्यकर्ते नवीन कौडगे,आशिष चौधरी,ईशान बंग,अपर्णा रुद्रवार,शैलेंद्र तेहरा,श्रीकांत साखरे,प्रफुल्ल अग्रवाल,अविनाश वांद्रे,विलास नेवकर,प्रशांत दरगु,सागर खेडकर,उमाकांत पावडे,महेश घुंगरे,व्यंकटेश मुंडे, संतोष गच्छे,कुलदीप परदेशी, अविनाश खराने.संगणकशास्त्र संकुल,व्यवस्थापन व वाणिज्य संकुल चे अनेक विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

समन्वय चषक स्पर्धा

गुन्हेगारी शिगेला पोचली आणि पोलिसांना सुचतोय खेळ ....
पोलीस- नागरीक जिल्हा स्तरीय समन्वय चषक स्पर्धा 31 ते 7 सप्टेंबर दरम्यान

नांदेड(प्रतिनिधी)जिल्ह्यात दररोज चोऱ्या होत आहेत खून पडत आहेत आणि मन्ग्ल्सुत्रांच्या चोरया,मोटारसायकली आणि बँकेतून काढलेल्या मोठ्या रक्कमेच्या चोऱ्या सुरुचासून सर्वप्रकारची गुन्हेगारी शिगेला पोचली आहे आणि पोलीस खात्याला खेळ सुचत आहेत.नुकत्याच क्रीडा स्पर्धा झालेल्या असताना पुन्हा31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान पोलीस नागरीक समन्वय चषकच्या जिल्हास्तरीय स्पर्धा नांदेडला होणार आहेत.

पोलीस ठाणे स्तरावर विजयी स्पर्धकांनी वेळापत्रकानुसार जिल्हास्तर स्पर्धेत उपस्थीत राहावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले व गृह पोलीस उप अधीक्षक चंद्रभान यशवंत यांनी केले आहे.ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्हयाच्या 36 पोलीस स्थानकाअंतर्गत विविध स्पर्धा झाल्या. त्यात विजेत्या स्पर्धकांना पोलीस नागरीक समन्वय चषक व रोख बक्षीसे देण्यात आली. 36 पोलीस स्थानकाअंतर्गत विजेत्यांना आता जिल्हास्तरावर पुन्हा जिंकण्याची संधी आहे. वेळापत्रकानूसार सर्व स्पर्धकांनी दिलेल्या ठिकाणी हजर रहावे, पोलीस मित्र यांच्या विविध गटांनूसार या स्पर्धा होणार आहेत.

1) वाहतूक पोलीस मित्र - निबंध स्पर्धा: दिनांक 31 ऑगस्ट 2013 रोजी वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 स्थळ चिंतन सभागृह पोलीस अधीक्षक कार्यालय,2) बाल पोलीस मित्र - चित्रकला स्पर्धा: दिनांक 1 सप्टेंबर 2013 रोजी वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 स्थळ चिंतन सभागृह पोलीस अधीक्षक कार्यालय,3) छात्र पोलीस मित्र - वकृत्व स्पर्धा: दिनांक 2 सप्टेंबर 2013 रोजी वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 स्थळ चिंतन सभागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय,4) महिला पोलीस मित्र - रांगोळी स्पर्धा: दिनांक 3 सप्टेंबर 2013 रोजी वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 स्थळ पोलीस अधीक्षक कार्यालय परीसर,5) युवा पोलीस मित्र - टी-20 क्रिकेट स्पर्धा: दिनांक 4 ते 6 सप्टेंबर वेळ सकाळी 11.00 ते सायंकाळी 06.00 स्थळ पोलीस मुख्यालय मैदान,6) जेष्ठ नागरीक पोलीस मित्र - मॅरेथॉन स्पर्धा: दिनांक 7 सप्टेंबर 2013 रोजी वेळ सकाळी 11.00 ते दुपारीस्थळ पोलीस मुख्यालय नांदेड. या पोलीस नागरीक समन्वय चषक स्पर्धेचा समारोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा 7 सप्टेंबर 2013 रोजी सायंकाळी 05.00 वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे.या स्पर्धेतील स्पर्धकांनी हजर राहावे तसेच जनतेतील लोकांनी या स्पर्धामध्ये हजर राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com