नांदेड न्यूज लाईव्हला वाचकांची वाढती पसंती....

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील विशेष: हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागातील ताज्या बातम्या वाचण्याची सोय आता उपलब्ध झाली आहे. हिमायतनगरचे तरुण पत्रकार अनिल मादसवार यांनी, नांदेड न्यूज लाइव्ह हा ऑनलाईन न्यूज पेपर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केला असून, राज्यतील तसेच देश - विदेशातील वाचक व नांदेडकरांनी या वेबसाईटला भेट देवून, आपली पसंती दर्शविली आहे. अल्पावधीतच हि वेबसाईट लोकप्रिय झाली असून, ताज्या घडामोडी वाचण्यास मिळत असल्याने वाचक वर्गातून शुभेच्छा व सूचना, घटनांची माहिती पोहोन्चाविली जात आहे.

या ऑनलाईन न्यूजपेपरचे संपादक अनिल मादसवार हे हिमायनगर (जि.नांदेड) येथील रहिवासी असून, ते गेल्या 7 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दैनिक देशोन्नती, पुण्यनगरी, लोकपत्र, गोदातीर, दैनिक एकजूट, लोकाशा, देवगिरी तरुण भारत, सर्वजन, उद्याचा मराठवाडा, दैनिक भास्कर, दैनिक पुढारी, दैनिक सामना, यासह बहुतांश दैनिकात पत्रकार म्हणून काम केले. त्यांच्या शेकडो बातम्यांची दाखल घेतल्या गेली असून, त्यांना नुकताच जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे व डॉक्टर काब्दे यांच्या हस्ते युवा पत्रकारिता पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे. तसेच या पूर्वी विविध पुरस्कार प्राप्त झाले असून, जिल्हा मूल्यमापन तंटामुक्त समितीचे सदस्यपद व तालुका अध्यक्ष असे अनेक पदे भूषविली आहे. ते एक उत्तम छायाचित्रकार असून, आजही लोकसत्ता, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकमत, गावकरी, एकमत अश्या अन्य नामवंत राष्ट्रीय वर्तमान पत्रात त्यांचे छायाचित्र प्रकाशित होतात. पत्रकार मादसवार यांना ऑनलाईन न्यूज पेपर सुरू करण्याची प्रेरणा सुरेश कुलकर्णी, गोविंद मुंडकर,यांनी दिली असून, मुख्य मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार भास्कर दुसे आहेत. या ऑनलाईन लाईन न्यूज पेपरमध्ये ताज्या घडामोडी प्रसिध्द होत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील वाचकांची मोठी सोय झाली आहे.
त्यांचा हा ऑनलाईन पेपर वाचण्यासाठी खालील लिंक क्लीक करा ..........http://www.nandednewslive.com/

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी