श्रधांजली

दाभोलकरांनी आयुष्य कर्मी लावले.... श्रधांजली अर्पण

नांदेड(प्रतिनिधी)राज्यात पुरोगामीत्वाचे वारे अधिक वेगाने वाहण्यासाठी ज्या व्यक्तीने आपले आयुष्य कर्मी लावले अशा डॉ. नरेंद्र दाभोलकरांची मंगळवारी पुण्यात हत्त्या करण्यात आली. केवळ अंधश्रद्धानिर्मूलन समिती स्थापून या व्यक्तीने आपले कार्य थांबविले नाही. तर व्यसनविरोधी चळवळ, विज्ञानाची कास, निरपेक्ष समाजसेवा हे मूल्य समाजात रुजविण्याचे अविश्रांत कार्य केले. ‘साधना’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून लोकहिताचे विचार निस्वार्थीपणे समाजासमोर मांडले. धर्मांधतेच्या विरोधात जावून श्रद्धेने राहण्याचा संदेश देणा-या या विचारवंताचे विचार संपविण्याचा प्रयत्न अज्ञात समाज कंटकांनी केला.

नांदेड शहर व जिल्ह्यातून डॉ. दाभोलकरांच्या हत्येविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, घटनेचा निषेध मोर्चे काढून अनेकांनी केल, तसेच नांदेड जिल्हा अन्धश्रधा निर्मुलन समितीच्या वतीने शहरातून भव्य मोर्चा काढून तात्काळ मारेकर्यांना अटक करण्याची मागणी केली. तसेच डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना अनिसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ श्रधांजली अर्पण करण्यात आली यावेळी त्यांच्या कार्याची माहिती व पुढील दिशे बाबत मार्गदर्शन करताना गुणवंत पाटील हंगरगेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दाभोळकर यांच्या मारेक-यांना फाशी द्या

कंधार(वार्ताहर)पुरोगामी विचारांची परंपरा अविरतपणे पुढे जात रहावी यासाठी जन्मभर विवेकपूर्ण पध्दतीने केवळ विचारांचाच संघर्ष करणारे आणि अंधश्रध्देचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी सतत धडपडणारे अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष  सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी