हदगाव, शे.चांदपाशा| काही वर्षापुर्वी हदगाव तहसिल कार्यालयामध्ये तलाठी व नायब तहसिलदार म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी व अधिकारी आता तेच नायब- तहसिलदार व तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी व हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी म्हणून नुकताच काही दिवसापुर्वी ह्या तीन अधिका-यानी प्रशासकीय पदभार घेतलेला आहे.
हा तालुक्याच्या दृष्टीने 'योगायोग' म्हणावे लागेल. यापुर्वी आनिल तामसकर हे अंदाजे २००९ च्या दरम्यान हदगाव तहसिल कार्यालयमध्ये तलाठी म्हणून रुजू झाले होते. ते आता ते नायब तहसिलदार (महसुल २) मध्ये रुजु झालेले आहे. यानंतर १० ते १५ वर्षापुर्वी विनोद गुड्डमवार हे नायब तहसिलदार म्हणून कार्यरत होते. आता तेच हदगाव तहसिल कार्यालयचे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी म्हणून त्यांनी पदभार घेतलेला आहे. अणखीन विशेष म्हणजे अरुणा संगेवार ह्या पण हदगाव तहसिल कार्यालय मध्ये काही वर्षापुर्वी नायब तहसिलदार म्हणून कार्यरत होत्या. आता त्या हदगाव व हिमायनगर तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी म्हणून आलेल्या आहेत.
हे तिन्ही अधिका-याना हदगाव तालुक्याच्या राजकीय सामाजिक जाण असली तरी १० ते १५ वर्षापुर्वीची राजकी परिस्थिती व आताच्या राजकीय वातावरणात खुप फरक आहे. तालुक्यात सध्या गौणखनिज माफीयांनी चांगलेच बस्तान बसविलेले आहे. या तिन्ही अधिका-यासमोर मोठ अवाहन राहणार आहे. हे अधिकारी कशी राजकीय परिस्थिती हातळणार आहेत. याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.
रेती माफीया मुळेच हदगाव तालुकूयातील रेतीघाट खूले करण्यात आले नसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पेंनगंगा नदीवरील हदगाव हद्दजवळ विदर्भातील उमरखेड तहसिल कार्यालय गुरफळी गट रेतीघाट सुरु होते. पण हदगाव तहसिलच्या गौण खनिज विभागाने सुरु न केल्याने रेती तस्कांराना संधी मिळाली. यावर आता हे तहसिलदार व उपविभागीय अधिकारी कश्या प्रकारे या रेती तस्कारावर आळा घालतील. हे येणारा काळच ठरविणार आहे हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.