सोनारी फाटा येथे ४ जानेवारीला भव्य एकदिवसीय बौद्ध धम्म परिषद -NNL

भन्तेजींची धम्मदेसना,विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, बुद्ध-भिम गिते व सत्यपालाची सत्यवाणी आदी भरगच्च कार्यक्रम

संयोजक त्रिरत्नकुमार भवरे व निमंत्रक कैलासराव माने पोटेकर, सुधाकर पाटील सोनारीकर यांनी दिली माहिती


हिमायतनगर।
हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड द्वारा दि. ४ जानेवारी रोजी एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमासाठी परिसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमस्थळी जय्यत तयारी सुरू झाली असून यंदाच्या धम्म परिषदेला महाराष्ट्रातील थोर सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा सत्यवाणी कार्यक्रम होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने आयोजक व निमंत्रकांनी जय्यत तयारी सुरू केली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला बोलताना दिली.

एक दिवसीय धम्म परिषदेचे अध्यक्ष हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर तर उदघाटक म्हणून किनवट- माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम व स्वागताध्यक्ष प्रा.मोहन मोरे माजी नगराध्यक्ष पूर्णा हे उपस्थित राहणार आहेत. एकदिवसीय बौद्ध धम्म परिषदे निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२२- २३ प्राप्त अभि.प्रशांत ठमके, भाजपा नेते बालाजी बच्चेवार, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ अध्यक्ष गोवर्धन बियाणी, जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी. माळोदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहाय्यक वनसंरक्षक बी.एन. ठाकूर,डॉ.आनंद सूर्यवंशी, सेवानिवृत्त शिक्षिका जनाबाई मारुतीराव पोपुलवार,

हिंगोलीचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके, बी.एस.चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी हिमायतनगर,अनिल महामुने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती किनवट, बि.डी. भुसनूर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिमायतनगर,समतादूत राणीपद्मावती बंडेवार,डॉ.राजेंद्र वानखेडे हिमायतनगर, पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे, नांदेड जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीनिवास मुगावे, अभि. श्रीराज भवरे, साहित्यिक डॉ.मारुती वाघमारे आंदेगावकर, सौ. उजमा पठाण ग्रामसेविका धानोरा, अभि.भरतकुमार कानिंदे एकंबेकर आदी मान्यवरांना या ठिकाणी गौरवण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक कैलासराव पोटेकर व सुधाकर पाटील यांनी दिली.

सोनारी फाटा येथील एकदिवशीय बौद्ध धम्म परिषदेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शांताबाई पवार, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर, शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर,माजी आमदार विजयभाऊ खडसे उमरखेड, लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर,माजी महापौर शीलाताई किशोर भवरे,शफकत आमना मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर, डी.एन. गायकवाड तहसीलदार हिमायतनगर, एम.डी.आंदेलवाड गटविकास अधिकारी हिमायनगर, एस.एम.तायडे कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग भोकर,अशोक भोजराज जिल्हा जलसंधारण अधिकारी जि.प. नांदेड,

अभि. सुनील पोपुलवार,प्राचार्या शुभांगीताई ठमके, हिमायतनगर गट शिक्षण अधिकारी आर.आर. जाधव,विभागीय वन अधिकारी आशिष हिवरे,सहाय्यक वनसंरक्षक जी.डी.गिरी,वन परिक्षेत्र अधिकारी भोकर पी.एस.मोडवान,वन परिक्षेत्र अधिकारी अनिल रासने,हदगांव न.प.माजी उपगनराध्यक्ष सुनिलभाऊ सोनुले, अभि. विजय कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे, डॉ. प्रमोदकुमार अंबाळकर, डॉ. पी.बी. नामवाड, डॉ.इरवंत पल्लेवाड, बालाजी नागमवाड, जेष्ठ पत्रकार विजय जोशी, प्रकाश कांबळे, प्रदीप नागापूरकर,परमेश्‍वर गोपतवाड, अनिल मादसवार, बालाजी राठोड,उत्तम कानिंदे, अभि. मिलींद गायकवाड, मंगेश कदम, शाहीर नरेंद्र दोराटे,किशनराव ठमके आदी मान्यवर या धम्म परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

बौद्ध धम्म परिषदेच्या द्वितीय सत्रामध्ये दुपारी दोन वाजता बुद्ध- भीम गीतांचा व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. भिमशाहिर बापूराव जमदाडे, गायिका सुरेखा रंगारी चंद्रपूर, नालंदा सांगवीकर नांदेड, रविराज भद्रे मुखेड,गायक शंकर दादा गायकवाड भोसीकर यांचा दणदणीत गीतांचा कार्यक्रम होणार आहे तर सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्रातील थोर सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांची सत्यवाणी यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.

सदर कार्यक्रमाची जयत तयारी सुरू असून डॉ. मनोज राऊत, लक्ष्मणराव मा. भवरे, कानबा पोपूलवार,पांडुरंग मिरासे, शिवाजी डोकळे,विष्णू वानोळे,शेख खय्युम, नागनाथ वच्चेवाड, परमेश्वर वालेगावकर, अविनाश कदम,बसवंत कांबळे, नागोराव मेंडेवाड, सुभाष गुंडेकर, केशव माने, जगन्नाथ नरवाडे, प्रताप लोकडे, गौतम राऊत, रामकुमार गुंडेकर, संजय गुंडेकर, सुर्यकांत खिराडे, किरण वाघमारे,यशवंत थोरात यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

परिसरातील सर्व नागरिकांनी एकदिवशीय धम्म परिषदेमधील तिन्ही सत्राच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजक त्रिरत्नकुमार भवरे, निमंत्रक कैलासराव माने पोटेकर,सुधाकर पाटील सोनारीकर,बालाजी राठोड आदींनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी