शिक्षणाशिवाय आदिवासींचा विकास शक्य नाही - डी. एम धनवे -NNL

तामसा येथे बिरसा मुंडा जयंती साजरी..


हदगाव/तामसा, गजानन जिद्देवार।
शिक्षणात मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान समाविष्ट असल्याने त्या शिवाय मानव आपली विकासाची प्रक्रिया पूर्ण करु शकत नाही म्हणुनच भारत देशाचा मूळ मालक म्हणुन संबोधला जाणारा आदिवासी समाजास आपली सर्वांगीण उन्नतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन हदगाव तालुक्यांतील मौजे तामसा येथील आयोजित समाज प्रबोधन मेळाव्याच्या मुख्य मार्गदर्शक म्हणुन लाभलेले डी. एम.धनवे सर यांनी व्यक्त केले. 

यावेळी त्यांनी शिक्षणाचे महत्व आणि त्यांचे मानवी जीवनातील स्थान अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने एका विशेष शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, यात वानवाडी येथील दंडारणे नृत्याने तामसा वासियाचे लक्ष वेधून घेतले, याचे उद्घाटन हदगाव - हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात ॲड. रामदास डवरे यांनी तामसा येथे "बिरसा मुंडा सांस्कृतिक सभागृह" व्हावे असा मनोदय व्यक्त केला त्यास उत्तर देत येथील मा.सरपंच बालाजी महाजन यांनी पुढील तामसा येथील बिरसा मुंडा यांची जयंती हि तामसा तेथे बिरसा मुंडा सभागृह उभारून त्याचं सभागृहात होईल असे आश्वासन दिले. आमदार माधवराव पाटील यांनी त्या प्रकारचे नियोजन केले आहे सरपंच यांनी सांगुन त्या बद्दल जागेचा नमुना नंबर आठ चा उतारा आठ दिवसांत देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

तर बाबूराव कदम कोहळीकर यांनी समाज बांधवांच्या अनेक समस्या बाबत आपण पाठपुरावा करत असल्याचे नमूद केले. त्याच बरोबर कृष्णा पाटिल आष्टीकर यांनी शिक्षणाची गंगा आपल्या भागात कशी जास्तीत जास्त वाहील असे आपणास प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसेच हदगाव नगर परिषद येथील सांस्कृतिक सभागृह होण्यास नक्कीच मदत करु अशी ग्वाही दिली. तर अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. सतिश पाचपुते यांनी समाजाच्या ज्वलंत समस्याना आपण स्वतः कारणीभूत असल्याने आज आपणास अनेक समस्या जाणवत आहेत त्या करीता सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे असल्याचे मत ठणकावून सांगितले. तसेच डॉ बळीराम भुरके यांनी समाजाच्या विविध प्रकारच्या समस्या लोक प्रतिनीधी यांनी सभागृहात मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी, ती घोषणा फक्तं स्टेजपुरतीच मर्यादित राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.            

चिमुकल्यांचे भाषण ठरले आकर्षन..... याचं कार्यक्रमात अगदी चिमुकले बालके यांनी बोबड्या बोलीत मोडक्या तोडक्या शब्दात आपले मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण श्रोत्यांना मात्र विशेष भावले यात मयूर डवरे आणि श्रीनिधी मुरमुरे आदींचा समावेश होता. 

यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल धुमाळे, उपाध्यक्ष जिगाजी वाणोळे, स्वागताध्यक्ष संजय गारोळे सह सरपंच बालाजी महाजन, शंकरराव गायकवाड, ॲड. रामदास डवरे, शंकरराव मेंडके, बाबूराव कदम कोहळीकर, रमेशराव घंटलवार, संदीप भाऊ राठोड, डॉ. बळीराम भुरके, मनोहर माहूरे, डॉ नारायण डाखोरे, डॉ. वावधने, शिवाजी मुरमुरे, किशोर सरकुंडे, रामजी वाकोडे, ज्ञानेश्वर तायवाडे, सटवाजी नखाते, धनराज सोनटक्के, डॉ. डी. के.नाईक, श्रीरंग देशमुखे, डी. के. बुरकुले, दादाराव ढोले, शंकर भिसे, सुभाष गारोळे ,माधव झाडे , अवधूत भिसे, सरपंच बालाजी कोंडामंगल ,प्रकाश देशमुखे, चंपत नाव्हेकर ,गणपत डवरे, गणपत मुरमुरे, गायकवाड सर, 

गजानन डवले, अशोक हुरदुके , बोरकर, साहेबराव भिसे,प्रा. मेटकर, बापूराव सोनटक्के, विश्वंभर मेटकर, गोकुळ पांडे, हेमंत नरवाडे आदीसह अनेक मान्यवर, सामजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी बांधव, महीला,सरपंच संघटनेचे सर्व प्रतिनीधी, अनेक पत्रकार बंधू, युवा कार्यकर्ते यांच्या सह परिसरातील अनेक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधव भुरके व संतोष डवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. भुरके यांनी मानले अशी माहिती प्रसिध्दी प्रमूख अंकूश मिराशे यांनी दिली आहे..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी