लोहा| राजकीय क्षेत्रासह सामाजिक सेवा व उपक्रम यात समर्पित भावनेने समरस होणाऱ्या भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांनी गॅलेक्सी हेल्थ केअर फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहिले फिरते एंडोस्कोपी रुग्णालय सुरू झाले. त्यास लोह्यात भेट दिली व डॉक्टरांशी चर्चा केली.
ग्रामीण भागात गॅलेक्सी हेल्थ फाउंडेशन ने फिरत्या रुग्णालयाची संकल्पना डॉ नितीन जोशी, डॉ अनुराग लव्हेकर यांनी मांडली लोह्यात हे फिरते रुग्णालय आल्या नंतर नगरपालिका परिसरात प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी भेट दिली व फिरत्या रुग्णालयाची पाहणी केली.
फिरत्या रुग्णालयाची संकल्पना व त्यांची वैशिष्ट्ये याविषयी डॉ. नितीनजी जोशी, डॉ. अनुराग लव्हेकर यांच्याशी चर्चा करून त्यांना रुग्णसेवेचा जो वसा घेतला त्या विषयी गौरवोद्गगार काढले समाजसेवा व रुग्ण सेवेसाठी ,स्वखर्चाने माफक दरात उपचार करतात.
अशा व्यक्तींना भेटून खरोखर आनंद होतो आणि सामाजिक-राजकीय चळवळीमध्ये काम करण्यासाठी बळ मिळतं.असे भावोद्गार काढले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम उपनगराध्यक्ष दत्ता वाले, नगरसेवक भास्कर पा.पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बंडु वडजे,प्रविण धुतमल यांच्यासह डॉक्टर व त्यांचा स्टाफ उपस्थितीत होता.