अर्धापूर। तालुक्यातील दाभड येथे श्री दत्तमुर्ती प्रतिष्ठापना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भक्त मंडळींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त संस्थान मंदिर समिती व समस्त गावकरी मंडळी दाभड ता.अर्धापुर यांनी केले आहे.
पंचक्रोशीतील प्राचीन देवस्थान श्री दत्त मंदिर मठ दाभड येथे श्री दत्त मूर्ती प्रतिष्ठाना निमित्त दि.१२ ते १८ डिसेंबर या कालावधीत अखंड दत्तनाम सप्ताह, श्री गुरू चरित्र पारायण, अष्टा प्रहर जागर आदी धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम मंहत श्री मधूसुदनजी भारती महाराज दत्तशिखर माहूरगड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.यावेळी समगीरी गुरु जयगीरी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. सप्ताहात सकाळी भुपाळ्या, महापूजा, द.भ.प.संत निरंजनगीरी महाराज यांचे श्रीगुरूचरित्राचे पारायण सायंकाळी महापूजे नंतर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१७ शनीवार रोजी सव्वाखंडी तांदूळाची महापूजा होणार आहे. सप्ताहातील किर्तनकार १२ डिसेंबर साईनाथ महाराज बळीरामपपूर, १३ रोजी उर्मिलाताई गोविंदपूरकर,१४ रोजी आनंदबन महाराज मठसंस्थान तुप्पा,१५ रोजी शादत्त महाराज सरेगांव,१६ रोजी रुद्रगीरी महाराज किवळा,१७ रोजी अविनाशबन महाराज कोलंबी,१८ रोजी गोस्वामी संतोषपुरी महाराज चोळाखा यांचे किर्तन होणार आहे. दि.१८ रविवार सकाळी गावातील प्रमुख मार्गाने श्रीदत्तमुर्तीची कलशासह मिरवणुक, नंतर वासूदेवानंदजी भारती महाराज यांच्या हस्तै दत्तं मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
किर्तनानंतर १ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्व भाविकांनी लाभघ्यावा असे आवाहन श्रीदत्त संस्थानचे समितीचे उपाध्यक्ष संभाजी टेकाळे,सचीव आर के दाभडकर, कोषाध्यक्ष शंकरराव पाटील टेकाळे, राजू पाटील टेकाळे,रमेश दवे,दिपक दादजवार, बालाजी दवे, देविदास टेकाळे, रावसाहेब टेकाळे, बळीराम टेकाळे,वस़ंत टेकाळे, दिगंबर टेकाळे, दादाराव टेकाळे, भुजंग टेकाळे,तातेराव टेकाळे,पुरभाजी टेकाळे यांनी केले आहे.