बावरीनगर येथील अ. भा. बौद्ध धम्म परिषद ६ व ७ जानेवारीला -NNL


अर्धापूर।
प्रतिवर्षी प्रमाणे महाविहार बावरीनगर दाभड ता.अर्धापूर जि. नांदेड येथे दि. ६ व ७ जानेवारी २०२३ रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय भिकखु संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा चे संस्थापक अध्यक्ष पू.भदंत धम्मसेवक महास्थवी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न  होणार आहे.

सन १९८८ पासून  महाविहार, बावरीनगर, दाभड  ता.अर्धापूर येथे दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे अविरतपणे आयोजन करण्यात येत आहे. देश-विदेशातून आमंत्रित विद्वान भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा लाभ घेण्यासाठी लाखोंच्या संख्येत नागरीक येथे उपस्थित राहतात. महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशभरात नावलौकिक असलेले तथा महाराष्ट्र शासनाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त असलेले हे ठिकाण बुद्धकालीन धम्मानुयायी बावरी ब्राह्मणाच्या स्मरणार्थ “बावरीनगर” म्हणून संबोधिल्या जाते. 

धम्म परिषदेत इंग्लंड, ब्रह्मदेश, थायलंड तथा श्रीलंका आदी देशांतील पूजनीय भिक्खु चंद्रबोधि महाथेरो, भिक्खु अतुरलिए रतन थेरो, भिक्खू अशिनकोमल थेरो, भिक्खू नराँग आणि भिक्खू नोट तसेच भिक्खु प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो-मुळावा, भिक्खु सुमेधबोधी महाथेरो-वटफळी, भिक्खु बोधीपालो महाथेरो-औरंगाबाद, भिक्खु डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खु डॉ. एम. सत्यपाल थेरो, भिक्खु विशुद्धानंद महाथेरो-बुद्धगया, भिक्खु इंदवंश महाथेरो-औरंगाबाद, भिक्खु विणय बोधिप्रिय थेरो, भिक्खू पय्यारत्न थेरो, भिक्खु हर्षबोधी थेरो, भिक्खु करुणानंद थेरो, भिक्खु ज्ञानरक्षित-औरंगाबाद, भिक्खु अश्वजित, भिक्खु संघपाल, भिक्खु शीलरत्न आणि भंते बुद्धभूषण आदी देश विदेशातील विद्वान भिक्खुंची धम्म देसणा होईल.यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक आदरणीय डॉ एस पी गायकवाड व सहाय्यक डॉ मिलींद भालेराव यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी