आजच्या विदीर्ण झालेल्या कुटुंब व्यवस्थेला रामायणातील कुटुंब व्यवस्थेची नितांत गरज- ह.भ. प.अजय महाराज -NNL


हदगाव/तामसा, गजानन जिदेवार।
तामसा येथून जवळ असलेल्या उमरी ज. येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री विठ्ठलेश्वर मंदिरात मागील अकरा वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह व संगीत तुलसी राम कथा सोहळ्याचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. संबंध महाराष्ट्रात परिचित असलेले युवकांचे प्रेरणास्थान तथा युवा कीर्तनकार रामायणाचार्य ह भ प अजय महाराज अनसिंगकर यांच्या सुमधुर पावन वाणीतून दिनांक 8.12.2022 ते 15.12.2022 दरम्यान तुलसी राम कथा तर रामजी महाराज यांच्या वाणीतून गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन गावातील सर्व नवयुवक व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आले होते. या सप्ताहात भजन कीर्तन काकडा आरती हरिपाठ व गाथा पारायण असे अनेक नित्य कार्यक्रम चालतात यावरून या भारतातील मूळ सर्व भारतीय हे विठ्ठलाचे उपासक आहेत.


 कारण सांप्रदायात कसलाच भेदाभेद जातीभेद स्त्री-पुरुष भेद उच्चनीच भेद मान्य नसून संत अभंग रूपाने सांगतात जाती कुळ गोत्र न पाहे विठ्ठल भक्तांचे माहेर माझे पंढरपुर असे मानले जाते. या धार्मिक सोहळ्यात गावकऱ्यासोबतच शिवतेज मित्र मंडळ व शिवसुर्य मित्र मंडळाचे मोठे योगदान असते सालाबाद प्रमाना पेक्षा यावर्षी या सप्ताहामध्ये अजय महाराज यांनी आपल्यासमोर गाडगे महाराजांचा आदर्श नवयुवकांच्या डोळ्यासमोर असावा यासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले अजय महाराज व त्यांच्या बरोबर असणारे गजानन महाराज यांनी स्वतहाच्या हाताने  संपूर्ण उमरी गावची स्वच्छता करण्यात आली या धार्मिक सोहळ्यास महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत महात्मे यांचे कीर्तन संपन्न झाले यामध्ये सगळ्यात कौतुकास्पद कीर्तन ठरले.

बाल कीर्तनकार चैतन्य महाराज राऊत यांनी आपल्या या रामकथेतून अजय महाराज सांगतात की आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून समाज एकत्रीकरण करण्याची शिकवण घेऊन प्रगल्भपणे धर्माची पताका उंचावरती द्यावी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रातून स्वराज्य प्रतीची निष्ठा व धर्माप्रतीची निष्ठा ही शिकवण घ्यावी. छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांचे जीवन सदैव आदर्श ठेवून त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करून निरव्यसणी जीवन जगत धर्माची जागृती करावी. त्याचबरोबर आजच्या समाजाने रामायण या ग्रंथातून फारसंपत्ती जमवण्यापेक्षा आपल्या संततीवर संस्काराची शिकवण टाकावी.

 तुमच्या जीवनामध्ये संपत्ती भरपूर असून जर संतती वाईट निघाली तर सर्व संपत्ती लयाला जाते पण या उलट जर संतती चांगली असली तर संपत्ती त्याच्या मागे धाव घेते म्हणून आजच्या समाजाने आपल्या मुलाबाळावर संस्काराची भर टाकण्याकरिता रामायण ग्रंथांची नितांत गरज आहे रामायण हा संस्कारीत ग्रंथ असून आजच्या सामान्य लहान मुलांना भविष्यात आदर्श तरुण घडू शकतो असा हा आदर्श ग्रंथ आहे म्हणून आजच्या समाजाने संपत्तीचा मोहन ठेवता संततीला संस्कार देण्याची शिकवण रामायणाकडून घ्यावी.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी