पोटा येथील दत्तप्रभू यात्राउत्सव आनंदाने पार पाडा - पोनी.बी.डी.भुसनूर यांच मंदिर कमेटीसह जनेतला आवाहन -NNL

यात्रा काळात अनुचित घटना घडणार नाही यासाठी आजपासून पोलीस बंदोबस्त तैनात  

देशी दारू, जुगार अड्डे, मटकासह गुटखा, गुडगुडी, तीनपत्ते आदी धंद्यांना हद्दपार करण्याच्या सूचना 


हिमायतनगर,अनिल मादसवार|
तालुक्यातील पंचकोशीत प्रसिद्ध असलेल्या मौजे पोटा बु. येथील श्री  दत्तप्रभूच्या यात्रेला सोमवार पासून सुरुवात झाली आहे. यात्रा काळात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही म्हणून यात्रेच्या नियोजन संदर्भात हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांनी भेट देऊन मंदिर परिसर आणि यात्रा जागेचे करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकान परिसराची पाहणी केली. तसेच सुरक्षाच्या दृष्टिकोनातून कमिटीला विशेष सूचना देत यात्रा शांततेत व आनंदाने पार पाडावी कोणतेही गालबोट न लागू देता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. 


दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यंदा नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु. गावात भगवान दत्तात्रेय उत्सवाच्या यात्रेला सोमवार, १२ डिसेंबरपासून सुरुवात होते आहे. सायंकाळी ५ वाजता भगवान दत्तात्रेयांच्या पालखी मिरवणुकीने यात्रेची सुरूवात होणार असून, मंगळवारी कुस्त्यांची दंगल, बुधवारी कबड्डी स्पर्धा, विजेत्यांना पारितोषिक आणि यात्रेचा समारोप होणार आहे. विशेष करून यात्रा काळात अवैद्य दारू विक्रीसह कोणतीही अवैध धंदे चालणार नाहीत आणि यात्रेसाठी येणाऱ्या महिला मुलींना कोणताही त्रास होणार नाहीत. याबाबतच्या खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी मंदिर कमिटीला दिल्या. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेला तीन वर्षांनंतर व्यापक स्वरुप आल्याने यंदा यात्रेत भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होणार आहे. 


आज सायंकाळी पालखी मिरवणूक होऊन यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रोसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच महिलांसाठी विविध खेळांबरोबरच मिठाईची व इतर साहित्याची दुकाने, घोडागाडी, झुले आदी दाखल झाले आहेत. या यात्रा संकुलाच्या परिसरात कबड्डी स्पर्धा, कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीला अधिक महत्त्व आहे. कारण पोटा येथील उत्सव या भागातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते. त्यामुळे जवळ पासच्या बंजारा बांधवांसह सर्व जाती धर्माचे लोक यात्रेत सहभागी होऊन उत्सवाचा आनंद लुटतात. यात्रा काळात महिला भाविक भक्तांना मद्यपी आणि नशेबाजांचा सामना होणार नाही याबाबत कडक सूचना पोलिसांनी यात्रा कमिटीला दिल्या आहेत. यावेळी गावकरी नागरिक, व्यापारी, पत्रकार उपस्थित होते.


मागील काही वर्षांपासून दोन नंबरचे व्यावसायिकामुळे यात्रेच्या आवारात देशी दारू विक्री, जुगार अड्डे, मटकासह गुटखा, गुडगुडी, तीनपत्ते आदींमुळे यात्रेला गालबोट लागले होते. यावर अंकुश ठेवण्यासाठी चक्क नांदेडच्या एलसीबी पथकाने त्यावेळी येथे छापा टाकून अनेकांना सळो कि पळो करून सोडले होते. दोन वर्षानंतर आता यात्रा मोठ्या आनंदाने साजरी व्हावी असे नियोजन पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी केले आहे. पारंपारिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या दत्तात्रेय जयंती यात्रेत गालबोट लागणार नाही यासाठी त्यांनी आत्तापर्यंत येथे २ वेळा भेट देऊन यात्रेत सीसीटीव्ही कैमेऱ्यासह रस्त्यावर लाईटची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हजारो लोक जत्रेत येणार असल्याने ही जत्रा आनंदाने व शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य व्हावे. यात्रेदरम्यान चालवले जाणारे अवैध धंद्याची प्रथा बंद करण्याच्या विशेष सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामुळे यात्रेचे धार्मिक पावित्र्य राखले जाऊन प्रत्येकाला यात्रेचा आनंद घेणे सोईचे होईल असे सध्यातरी दिसते आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी