तामसा/हदगाव, गजानन जिदेवार। जि प हा आष्टी येथील 7वी ते 10वी विद्यार्थ्यांची चार दिवसीय शैक्षणिक सहल शासकीय बसद्वारे आष्टी ते गणपतीपुळे यशस्वीरित्या संपन्न झाली.
सुरुवातीला किल्ले पन्हाळगड येथे पोहोचली गडाविषयी गाईड यांनी विस्तृत माहिती देऊन विद्यार्थ्यांना पावन झाल्याची जाणीव निर्माण केली, कारण विद्यार्थी आयुष्यात प्रथमच किल्ला पाहत होते त्यात शिवाजी महाराजांनी व शंभू राजांनी रायतेसाठी काय मोठे योगदान दिले याचे सविस्तर विवेचन केले विद्यार्थ्यांनी ते लिहूनही घेतले, कोल्हापूर छत्रपती पॅलेस येथे छ शाहू महाराजांनी वापरलेल्या सर्व वस्तूंचा संग्रह त्यांची छायाचित्रे शस्त्र दरबार खरोखरच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन गेला.
रंकाळा तलाव, महालक्ष्मी मंदिर, म्युजियम, अश्या भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक पर्यटन स्थळे पाहून रात्रीचा मुक्काम सिद्धेश्वरैया कृषी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाला. दुसऱ्या दिवशी गणपती पुळे या प्रेक्षणीय स्थळाकडे रवाना, रस्त्यातच नानिजधाम सुंदर बाग, राम मंदिर, गजानन मंदिर, नरेंद्रनाथ महाराज मठ या अतिशय स्वच्छ निसर्गरम्य शांत परिसराची ओळख विद्यार्थ्यांना झाली. पुढे वाटचाल करताना आंबा घाट पाहून विद्यार्थी अचंबित झाले आणि लगेच दिसला तो सर्वांना पाहण्याची उत्सुकता असलेला अरबी समुद्र, तो बघून विद्यार्थी अतिशय आनंदी झाले व पोचल्यावर गणपती बाप्पा चे दर्शन घेऊन समुद्र किनाऱ्यावर क्षारयुक्त पाण्यात मनसोक्त खेळण्याचा आस्वाद घेतला.
तिसऱ्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन झाले तेथून परतीचा प्रवास सुखरूपपणे पूर्ण करून दि 11/12/2022 सकाळी आष्टी येथे सहलीचे आगमन झाले. पालकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून, रांगोळी काढून सर्व क्रीडांगण सजवले होते भव्य स्वागत व शिक्षक वर्गाचे कौतुक ग्रामस्थ तथा व्यस्थापन समिती यांनी केले सहलीसाठी सहकार्य व मार्गदर्शन योगदान सर्व शिक्षक तथा मु अ हायस्कुल आष्टी श्रीमती गंगासागर मॅडम स्वतः सहभागी होत्या व श्री काकडे सर, पवार सर, वैद्य मॅडम, पांगरे सर, भिंगोले सर, झाम्बरे सर भुरके सर, डांगे मॅडम, राठोड एस एस यांनी सहल पूर्णत्वास नेण्यासाठी मेहनत घेतली.