कंधार,सचिन मोरे| ब्रम्हा विष्णू महेश या तीन्ही देवांच्या पत्नीनी सती अनसूया मातेचे सतीत्व कळाल्यावर त्यांनी आपआपल्या यजमानाकडे तक्रार करून त्यांनचे सतित्व हरन करा असा आग्रह धरला त्यांनंतर हे तिन्ही देव या कामाला लागले व महासती अनुसया माते कडे जावुन आम्हाला नग्न होऊन भोजन वाढ असा आग्रह धरला. तेव्हा महासती अनुसयाने या तिन्ही देवतांना आपल्या पोटात घेऊन त्यांना बाळ होऊन जन्म दिला, या वेळी या तिघांनाही स्तनपान देऊन अनुसयानी भोजन दिले असे या महासती मातेचे सतित्व होते व ते तीन्ही बाळ म्हणजेच आपले श्री सद्गुरू दत्तात्रय महाराज होते असे प्रतीपादन ह.भ.प.रंगनाथ महाराज ताटे यांनी केले.
कंधार तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या दत्तगड बिजेवाडी तालुका कंधार येते प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दि.07/12/22 रोजी दत्त जयंती चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते, यावेळी ग्रामीण भागातून हजारो महिला बालक व पुरुष भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी मोठ्या भक्ती भावात दत्तगुरूंचा जयजयकार करण्यात येऊन दत्त जन्म साजरा करण्यात आला. यावेळी दत्त संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे व खजानदार शासकीय गुत्तेदार वैजनाथराव सादलापुरे यांच्या तर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते.
यावेळी हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी स्वागत पर भाषण करीत दत्त मंदिर स्थापनेचा इतिहास विशद करताना भाई डॉ केशवराव धोंडगे च्या कल्पनेनुसार या मंदिराची स्थापना केली. तीच आम्ही अंमलात आणली व आज या क्षेत्राचे चे एवढे महत्व वाढले असे प्रतिपादन कुरुडे यांनी केले. यावेळी मंदिर समितीची सदस्य जयराम मंगनाळे (गुरुजी) प्राध्यापक वैजनाथराव कुरुडे शासकीय गुत्तेदार माधवराव पटणे नारायणराव पटणे वैजनाथ सादलापुरे आदी प्रमुख कार्यकर्ते हजर होते. कीर्तनकार व भजनी मंडळ यांचा सत्कार समितीच्या वतिने टोपी दस्ती नारळ व माहिलांना खण,नारळ देऊन करण्यात आला, डॉ.प्रकाश सादलापुरे व डॉ.मिनाषी प्रकाश सादलापूरे यांनी कृष्णाई हॉस्पिटल कंधार च्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर ठेवण्यात आले, त्या शिबीराचा फायदा शेकडो महिला व पुरुषांनी घेतला हे शिबीर लक्ष वेधी ठरले.