लाखो भाविकांनी घेतले दत्ताचे दर्शन
माहूर, राज ठाकूर। श्री,दत्त जंन्म निमित्य माहूरात भाविकांची मांदियाळी जमली होती. दि.6, डिसेंबर रोजी हजारों भाविकांनी हजेरी लावत प्रभू दत्तात्रयाचे चरणी लिन होऊन आशीर्वाद घेतले. गत सात दिवसा पासून आश्रम व विविध मठावर दत्त नाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार दि,६ मार्गशीर्ष पूर्णिमा दू,१२ वा ५ मि, गडावरील श्रीदंत्त मंदिरात ,गणपती पुजन करण्यात आले व दंत्त मंदिर मुख्य गाभार्यात महंत प,पू, मधुसूदन भारती यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला,परीसरातील देवदेवतांचे,महंतांच्या समाधिचे पुजन अरण्यात आले,वंश परंपरागत पोरोहित्य रवि जोशी,विलास जोशी,रुषीकेश जोशी,विकास जोशी यांनी पोथीचे पुजन करुन वाचन केले,नंतर प्रभाकर वैघ,बबन महाराज देवकत्ते महाराज व संच यांनी अंभग, किर्तन केले व पाळण्यात बाळ दंत्त ठेऊन पाळना दिला जन्म उत्सव साजरा करून १२,५५ मि, आरती करण्यात आली यावेळि चिंतामन भारती, वासुदेव भारती, चिरंजीव भारती,हरीहर भारती,यांच्यासह हजारों भाविकांच्या उपस्थितित जल्म उत्सव साजरा करण्यात आला.
साईनाथ महाराज वसमतकर,केरोळि फाटा येथील श्यामबापू महाराज, गोवर्धन महाराज, व विविध आश्रमात किर्तन,भजन, भारुड,फटाकांच्या अतिषबाजीत दंत्त जंन्म उत्सव साजरा करण्यात आला. देवदेवेश्वर मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त नामाच्या गजराने गेल्या सात दिवसापासून माहूर शहरात दिगंबरा, दिगंबरा वल्लभ दिगंबरा देवा दत्ता दत्ता च्या गजराने माहूर नगरी दुमदुमून गेली.
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रासह शेजारच्या तेलंगाना, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून दत्तभक्ताच्या दिंड्या माहूर शहरात दाखल झाल्या होत्या. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दत्त शिखर संस्थान मंदिर प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. विविध आश्रमात भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील हज़ारों भाविकांनी विविध ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला..
यावेळि कोणताहि अनुचित प्रकार घडू नये याकरीता उपविभागिय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, तहसिलदार किशोर यादव , पोनि नामदेव रीठ्ठे,सपोनी,अन्नासाहेब पवार,श्रीधर जगताप, संजय पवार न,प,मुख्याधिकारी राजकुमार राठोड, नप कार्यालईन अधिक्षक वैजनाथ स्वामी व दंत्त संस्थान व्यवस्थापक उज्वल भोपि, विविध कार्यालयातील अधिकारी जातीने लक्ष देत होते.