नांदेड। सध्या वातावरणातील बदलामुळे अनेक जेष्ठ नागरिकांना विविध आरोग्य विषयक तक्रारींना सामोरे जावे लागत असल्याने अशा जेष्ठांना या वातावरणात आवश्यक असणा-या सर्व शारिरीक चाचण्या करण्याचे औचित्य साधून तसेच श्री मथूराशांती प्रतिष्ठान, नांदेड च्या जनक स्वर्गीय श्रीमती शांताबाई डॉ. मथुरादास बजाज यांच्या ५ व्या पुण्यतिथी स्मरणार्थ श्री. गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड येथे जेष्ठ नागरिकांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि-७/१२/२०२२ रोजी केले होते.
सदरच्या शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यामध्ये ३५० जेष्ठ नागरिकांची रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.रुग्णालयातील तज्ञ डॉ. लक्ष्मिकांत बजाज, डॉ. अर्चना बजाज, डॉ. प्रदीप संगनोड, डॉ. रमण तोष्णीवाल, डॉ. संदीप दरबस्तवार, डॉ. छाया गवाले, डॉ. ज्ञानेश्वर ढेपाळे, डॉ. पल्लवी तुंगेणवार, डॉ. दत्तात्रय इंदुरकर, डॉ. रामचंद्र हेडगे, डॉ. शेखर चौधरी, डॉ. जयश्री ढोले, डॉ. नेहा जोशी, डॉ. गंगा जाधव, डॉ. यामिनी कोकरे, डॉ. गणेश कदम, डॉ. विनोद घाटोळकर, डॉ. समीक्षा कल्याणकर, डॉ. राजकुमार पवार, डॉ. अक्षय पाचोलकर, डॉ. विजय कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
या शिबिरात जेष्ठ नागरिकांकरिता विनामूल्य मसाज, BMD मशीनद्वारे हाडांची ठीसुळतेची तपासणी, फिजिओथेरपी, नेत्ररोग तपासणी व मधुमेह चाचणी, दंतरोग तपासणी, रक्तदाब-ब्लड शुगर तपासणी व ECG, दैनंदिन दिनचर्चेबाबत योग्य मार्गदर्शन, आजार व आहार संबंधित समुपदेशन संपूर्णतः मोफत करून त्यांच्या पूर्वचाचण्या तपासणी बाबत यथोचित मार्गदर्शन करण्यात आले. औषधी, सोनोग्राफी, एक्स-रे याकरिता शिबिरार्थी जेष्ठ रुग्णांना ७५ % सवलत देण्यात आली.
सदरच्या उपक्रमास जनतेचा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता अशाप्रकारची जनताभिमुख शिबिरे आणि जनहितार्थ आरोग्यविषयक उपक्रम वरचेवर राबविण्याचा मानस रुग्णालयाचे नुतन व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. या शिबिरास दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल सर्व शिबिरार्थ्याप्रती ऋणनिर्देश अभिव्यक्त करण्यात आले . सदर शिबीर यशस्वीतेसाठी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी वृंद यांचे मौलिक सहकार्य लाभले.