हिमायतनगरातील १ व २ वॉर्डातील नाल्याचे बांधकाम करून वाढलेली झुडपे तोडून सुरक्षा देण्याची मागणी -NNL

सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे जीवनमान आले धोक्यात 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहरातील नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक एक आणि दोन च्या बाजूने भला मोठा नाला आहे. या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात निरुपद्रवी वनस्पती वाढल्याने जणू काही शहराला जंगलाने वेडा घेतल्यासारखे चित्र दिसते आहे. याच ठिकाणच्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वराहाचा वावर होतो आणि घाण पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना डासांच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे. या समस्येपासून मुक्ती देऊन नागरिकांना निरोगी जीवन जगण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. आणि या परिसरातील नागरिकांना नागरी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या भागातील जनतेतून केली जात आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, नगरपंचायत अस्तित्वात आल्याने शहराच्या सुविधेत वाढ होऊन कायापालट होईल असे सर्वाना वाटत होते. मात्र याचे उलटेच झाले असून, शहराचा विकास होण्याऐवजी विकासाच्या नावाखाली तुंबडी भरण्याचे काम ५ वर्षाच्या काळात झाले आहे. यामुळे शहरातील रस्ते, नाल्याची दुरवस्था झाली असून, यामुळे अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक २ मंडून वॉर्ड क्रमांक १ च्या शेवटच्या टोकापर्यंत मोठी नाली सध्या या भागातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नालीचे बांधकाम करून द्यावे अशी मागणी होत असताना याकडे नगरपंचायत प्रशासन व राजकीय नेते दुर्लक्ष करत असल्याचे या भागातील नागरिक बोलून दाखवीत आहेत. मागील काळात याचं वॉर्ड क्रमांक २ मधून उपनगराध्यक्ष झाला होता, त्यांनीदेखील याकडे दुर्लक्ष केले असल्याचे नागरिक सांगत आहेत. आजघडीला या भागातील नालीच्या समस्येसह आता वाढलेल्या निरुपद्रवी झाडे, वनस्पतीने नागरिकांना धोक्यात आणले असून, या झुडपामुळे सरपटणारे प्राणी येत आहेत. एव्हडेच नाहीतर यामुळे चोरट्यांची देखील भीती वाढली आहे. 


या मोठ्या नालीमध्ये साचलेल्या घाणीमुळे वराहांचा वावर आणि डासांची उत्पत्ती प्रचंड वाचली असून, यामुळे परिसरातील आबालवृद्ध नागरिक आजारी पडत आहेत. या नालीचे बांधकाम करून देणे आवश्यक आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होते असल्याचे नागरिक सांगत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर या भागात डेंगू, मलेरिया, डायरिया आणि चिकनगुनिया सारख्या भयंकर आजाराच्या सामना या वॉर्डातील नागरिकांना करावा लागणार आहे. या भागातील नागरिक नगरपंचायतीला कर भरत असताना  नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगरपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. हि बाब लक्षात घेता येथील मोठ्या नाल्याचे बांधकाम करून नागरिकांना दुर्गंधीसह निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी साईनाथ रामदिनवार व या भागातील जनतेतून केली जात आहे.

गलथान कारभाराकडे लक्ष द्या; अन्यथा भाजप जनआंदोलन - रामभाऊ सूर्यवंशी


हिमायतनगर शहरातील अनेक भागात अशीच परिस्थिती झाली आहे, घाणीमुळे तर आत्तापर्यंत २ ते ३ बालकांना डेंग्यू होऊन जीव गमवावा लागला आहे. शहरात करण्यात आलेली नाली, रस्त्यासाठी कोट्यवधींची विकास कामे बोगस झाली आहे. शहरातील ठेका घेतलेल्याकडून स्वच्छतेची मोठी अनियमितता दिसून येत आहे. गलथान कारभाराकडे नगपंचायतीने लक्ष द्यावे अन्यथा भाजप जनआंदोलन उभारणार असल्याची प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.



Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी