हिमायतनगर। आज हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भाररत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या महामानवास पुष्पगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला,या प्रसंगी इतिहास विभाग प्रमुख डॉ.वसंत कदम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले,आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, माणसाला माणूसपण बहाल करणाऱ्या, विश्ववंदनीय महामानव, बहुजन उद्धारकांचा आज महापरिनिर्वान दिन त्यांच्या कार्याची स्मृती ठेऊन त्याचे अनुकरण प्रत्येक भारतीयाने केलेच पाहिजे.त्यांचे कार्य कोणापूरते मर्यादित नसून,ते सर्वांसाठी आहे .भारताची घटना या विद्वान माणसाने रात्रंदिन अभ्यास करून लिहिली,या साठी त्यांना2 वर्ष,11 महिने,17 दिवस एवढा कालावधी लागला.
ते समाजशास्त्र, अर्थशास्त्र,राजकारण, मानवशास्त्र, तत्वज्ञान पारंगत असून कायदे पंडित होते .त्यांनी शिक्षण, इतिहास, धर्म, मानवी हक्क,सामाजिक सुधारणा, जलशास्त्र अशा अनेक विषयावर लेख लिहिले.त्यांना सरकारने भारतरत्न, फर्स्ट कोलंबीयन अहेड ऑफ देअर टाईम, द ग्रेटेस्ट इंडियन या पदव्यानी सन्मानित केले.ते भारताचे भाग्यविधाते ,परमपूज्य बोधिस्त्व आहेत असे सांगून ज्ञानाच्या अथांग सागरास सरांनी नमन केले.
या प्रसंगी डॉ.पवार, प्रा.सावंत,डॉ.माने,डॉ. मगर,डॉ.इंगळे, डॉ.पाटील, डॉ. संगपाल इंगळे, श्री.राजीव डोंगरगावकर,श्री. आसळकर, श्री सचिन कदम,श्री. प्रभू पोरजवार, श्री. चंदापुरे, श्री.राहुल भरणे हे होते, जे.सी. एस डॉ.माने व सी. एस शेख शहनाज यांनीही परीक्षेतून वेळ काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. ग्रंथपाल राजु बोंबले सह सर्व जन येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग संचलित डॉ.सविता बोंढारे व प्रा.आशिष दिवडे यांनी केले.सर्वांनी महापरिनिर्वाण दिनी, भारताच्या या शिल्पकारास मानवंदना केली.