भोकर। तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022-23 भोकर येथील जिल्हा परिषद हायस्कूल मैदानावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर येथील विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन प्राविण्य मिळवले आहे.
17 वर्षाखालील कबड्डी स्पर्धेमध्ये मुलींचा संघ प्रथम आलेला आहे .19 वर्षाखालील कबड्डीच्या स्पर्धेमध्ये मुलांचा संघ प्रथम आलेला आहे. तसेच 19 वर्षाखाली क्रिकेट स्पर्धेमध्ये शाहू विद्यालयाचा संघ प्रथम आलेला आहे. मैदानी स्पर्धेमध्ये 200 मीटर धावणे 14 वर्षाखालील मुले अजिंक्य चरलेवार हा विद्यार्थी प्रथम ऋषी चव्हाण हा विद्यार्थी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
14 वर्षाखाली मुली 200 मीटर धावणे यात जान्हवी जाधव प्रथम , राजनंदनी जाधव द्वितीय आलेली आहे. सतरा वर्षाखालील मुले 200 मीटर धावणे यात गणेश विश्वंभर बोईनवाड हा विद्यार्थी द्वितीय आलेला आहे. सतरा वर्षाखालील 200 मीटर धावणे व गोळाफेक मूली या स्पर्धेत जाधव शुभांगी दत्ता ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. सतरा वर्षाखालील 400 मीटर धावणे या स्पर्धेत तेजस्विनी सटवाजी जंगवाड ही विद्यार्थिनी प्रथमआलेली आहे.
गोळा फेक सतरा वर्षाखालील मुली यात पल्लवी दिलीप राठोड ही द्वितीयआलेली आहे. 200 मीटर धावणे या स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात विक्रम कदम हा विद्यार्थीप्रथम, मारोती जंगवाड द्वितीय आलेला आहे. 19 वर्षाखालील मुले 400 मीटर धावणे या स्पर्धेत ओमकार बेलोरे हा प्रथम आलेला आहे तर जगदिश चव्हाण हा द्वितीय आलेला आहे. 200 मीटर धावणे या स्पर्धेत 19 वर्षाखालील मुली या गटात क्रांती खंदारे प्रथम ,वैष्णवी सूर्यवंशी द्वितीय आलेली आहे.19 वर्षाखालील मुली 400 मीटर धावणे यात दुर्गा गणगोपालवाड ही प्रथम तर पूजा जाधव ही दुसरी आलेली आहे.
लांब उडी मुली या गटात शुभांगी जाधव प्रथम आणि दुर्गा गणगोपालवाड द्वितीय आलेली आहे. थाळीफेक व गोळा फेक या स्पर्धेत क्रांती डोंगरे ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. हॉलीबॉल स्पर्धेत 19 वर्षाखालील मुले या गटात भोकर तालुक्यातून शाहू विद्यालयाचा संघ प्रथम आलेला आहे. कुस्ती फ्रीस्टाइल पन्नास किलो वजन गटात संतोष नक्कलवाड हा विद्यार्थी प्रथम आला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट गोविंदरावजी लामकानीकर साहेब तसेच लालबहादूर शास्त्री शिक्षण संस्थेचे सचिव श्री शिरीषराव देशमुख गोरठेकर, संचालक श्री.कैलासभाऊ देशमुख गोरठेकर तसेच मु. अ. श्री.संजय देशमुख कामनगावकर ,क्रीडा शिक्षक श्री शेख सलीम सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.