नांदेड जिल्ह्यातील युपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जिल्हाप्रशासनाचा पुढाकार -NNL

मुलाखतीत सरस ठरण्यासाठी जिल्ह्यासंदर्भात विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण

नांदेड। जिल्ह्यातील शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी पूर्ण करून यशाच्या शिखरापर्यंत पोहचले आहेत. केवळ जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून नव्हे तर या जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधा लक्षात घेऊन इथे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी युपीएससी सारखी मेन परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखातीच्या तयारीत आहेत.

यातील अनेक विद्यार्थ्यांनी संपर्क साधून जिल्ह्यातील सामाजिक, ऐतिहासिक व विकासाचा आलेख कसा जाणून घेता येईल याची विचारणा केली. त्यांच्या प्रयत्नांना यश यावे यादृष्टिने लवकरच अशा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दृकश्राव्य माध्यमाद्वारे मार्गदर्शन सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
जिल्ह्यातील त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या उपलब्ध वेळेनुसार त्यांचाही सहभाग यात करून घेण्यात येईल. याचबरोबर जिल्ह्यात नवनियुक्त झालेले आयएएस व आयपीएस अधिकारी, इतर अधिकारी हेही या उपक्रमात योगदान देतील. झुम व इतर माध्यमाद्वारे या विद्यार्थ्यांना निश्चित तारीख ठरवून दिलेल्या वेळेवर हा उपक्रम कृतज्ञतेपोटी सुरू करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. या विद्यार्थ्यांना आपली परीपूर्ण माहिती ज्यात मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा परीक्षा क्रमांक व इतर माहिती collectornanded1@gmail.com यावर पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी