नांदेड। संत नामदेव महाराज यांच्याविचारांचा वारसा घेऊन सुरू झालेली नानक साई फाऊंडेशनची घुमान यात्रा पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भुषणावह असुन या दोन राज्यात सेतु म्हणून हि चळवळ उभी टाकलीआहे, असे गौरवपर प्रतिपादन लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी यांनी केले. 8 व्या घुमान यात्रेची समाप्ती व धन्यवाद सभा नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथील लंगर साहिब गुरुद्वारा परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी महाराज यांचा कृपा आशीर्वाद या चळवळीला प्राप्त आहे. 2 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2022 या कालावधीत यावर्षी ची घुमान यात्रा संपन्न झाली. महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यातील 248 जण यात्रेत सहभागी झाले होते. धन्यवाद सभेला संत बाबा नरेंद्रसिंघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यात्रेत सहभाग नोंदवलेल्या प्रमुख यात्रेकरूंना शिरोपा देऊन संत बाबा नरेंद्रसिंघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संत शिरोमणी भक्त नामदेव महाराज यांनी एकच धर्म मानला तो म्हणजे मानवता. त्यांनी सातशे वर्षापुर्वी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन उत्तर भारतात बंधुभाव जागृत केला, असे सांगून संत बाबा नरेंद्रसिंघ जी म्हणाले की, त्यांच्याच विचारांचा प्रसार प्रचार करत पंजाब आणि महाराष्ट्रात सांस्कृतिक देवाण घेवाण करून दोन राज्यांना जोडण्याचे
कार्य नानक साई फाऊंडेशन घुमान यात्रेच्या माध्यमातून वकरत आहे हे दोन्ही प्रांतासाठी भुषणावह आहे. प्रारंभी नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी प्रस्तावना करून घुमान यात्रेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केल्याबद्दल महापुरुषांचे धन्यवाद व्यक्त केले. घुमान यात्रा दोन राज्यातील लोकचळवळ व्हावी असा आमचा मानस असुन ११ हजार मराठी जणांना पंजाब दर्शन घडविण्यात येणार असल्याचे बोकारे यांनी सांगितले.
याप्रसंगी नानकसर गुरुद्वारा चे बाबा सुखविंदरसिंघ, घुमान साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा. डॉ गजानन देवकर,घुमान संगीत सभेचे अध्यक्ष पुंडलिकराव बेलकर,मराठी पत्रकार संघाचे महानगर अध्यक्ष विश्वनाथ देशमुख,जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता बळीराम सुकरे,अधीक्षक अभियंता महाजन उप्पलवाड, बानुराब कंकरे, जे एच पिन्नलवार, अमित केंद्रे, दिलिपराव अंगुलवार, तुकाराम कोटूरवार, सौ.ज्योतीताई उप्पलवाड,सौ.विद्याताई सुकरे, बालाजी सरसे, सौ. सुनंदाताई सरसे,शिवाजीराव शिंदे हळदेकर,धनंजय उमरीकर, जयप्रकाश नागला, विनायक पाथरकर,सुरेश दलबसवार यांची प्रमुख उपस्थिती होती अशी माहिती नानक साई फाऊंडेशन चे कार्यवाह सचिव श्रेयस कुमार बोकारे यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.