वीज पुरवठा सुरळीत द्या... अन्यथा एंड्रील पिऊन आत्मदहन करणार - त्रस्त शेतकऱ्याचा महावितरणला इशारा -NNL

यानंतरतरी शेतकऱ्यांच्या विद्दुत पंपाचा वीजपुरवठा सुरळीत होईल का..? याकडे लक्ष 


हिमायतनगर,अनिल मादसवार|
गेल्या महिन्याभरापासून हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी वीजपुरवठ्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. असे असतानाही बिल भरून घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी मात्र शेतकऱ्यांच्या विद्दुत पंपाचा वीजपुरवठा सुरळीत देण्यात अपयशी ठरत आहेत. यामुळं शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ लागला असून, वेळात महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कारभारात सुधारणा करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या नाहीतर वीज पुरवठा सुरळीत द्या... अन्यथा एंड्रील पिऊन आत्मदहन करणार - असा इशारा एकंबा येथील शेतकरी काशिनाथ लक्ष्मण बेले यांनी दिल्यामुळे महावितरणला व अधिकाऱ्यांना गंभीर परिणामाचा सामना करावा लागेल असे दिसते आहे. 


येथील महावितरण कार्यालयाचा दुर्लक्षित कारभार वारंवार चर्चेत येत आहे. खरीप हंगामात झालेली नुकसान भरून करण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामात पिके घेत आहे. मात्र महावितरण कंपनीच्या अभियंता, लाईनमन यांच्याकडुन वीजपुरवठ्यात हलगर्जीपणा केला जात आहे. कुठे वीज पुरवठा झाला तरी कमी दाबाने येत असल्यामुळे मोटर पंप चालत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाळू लागले आहेत, गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या प्रकारला कंटाळलेल्या तालुक्यातील एकंबा येथील काशिनाथ लक्ष्मण बेले नामक शेतकऱ्याने चक्क महावितरण कार्यालयासमोर वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी, नवीन डीपी बसून देऊन पिकांचे होणारे नुकसान टाळा अन्यथा महावितरण कार्यालयासमोर एंड्रील पिऊन आत्मदहन करावे लागेल असा इशारा देत सोबतच विषारी औषध घेऊन आला आहे.


काल दि.०६ डिसेंबरच्या मध्यरात्री अकरा वाजता हा शेतकरी महावितरण कार्यालयावर आला होता. त्यांच्यासोबत इतरही शेतकरी होते, यावेळी येथे उपस्थित ऑपरेटरने अभियंत्याशी संपर्क करून देऊन  समजूत काढून उद्या या समस्येवर तोडगा काढू असे सांगून बोलावले होते. मात्र आज दि.०७ बुधवारी सकाळपासून शेतकरी येथे हजर असताना अभियंते दुपारी दोन वाजता कार्यालयात उपस्थित झाले. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे आणि शेतकऱ्यांत तासभर चर्चा झाली तरी देखील या समस्येवर तोडगा निघाला नाही. उलट अधिकाऱ्यांने लाईनमन यांनी डीपी फौलटी असल्याचा रिपोर्ट दिला नाही असे सांगून हात झटकले आहे. त्यामुळे एकंबा येथील शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळविण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


एकूणच एकंबा येथील शेतकरी महावितरण कार्यालयाचे अभियनाते लाईनमन यांच्या कारभाराला कंटाळले असून, शेतकरी केव्हा कोणत्या प्रकारची टोकाची भूमिका घेतील याचा नेम नसल्याचे आज त्यांनी दिलेल्या आत्महत्येच्या इशाऱ्यावरून दिसून येत आहे. किमान शेतकऱ्याच्या वाळू लागलेल्या पिकाचे गांभीर्य लक्षात घेऊन तरी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या भागातील शेतकऱ्यांचा मोटार पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करून द्यावा अशी मागणी केली जात आहे.




Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी