लाठ ( खु) व जोशीसांगवी येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे महामानवास प्रेरणादायी आदरांजली - NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
महानायक, महामानव प्रज्ञा सूर्य ,दिनदलितांचा कैवारी जागतीक कीर्तीचा प्रज्ञासूर्य , राष्ट्रभक्त , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाणदिना निमित्त परिसरातील लाठ ( खु )व जोशीसांगवी  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षिक व विद्यार्थ्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणादायी आदरांजली  वाहण्यात आली. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाठ (खुर्द  )ता.कंधार येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन शाळेचे मुख्याध्यापक दत्ता गोविंदराव गादेकर  यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून अदरांजली वाहिली. यावेळी शाळेचे शिक्षक प्रकाश ताटे, प्रदीप गो.धुळशेटे, व्यंकटराव ग. कपाळे,बालाजी ना.कांदे,नागोराव श. उद्रबुके,सौ.नभा कुलकर्णी या शाळेतील शिक्षकांनी अभिवादन करून आदरांजली वाहिली.

यावेळी शाळेतील मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर जिवनाविषयी भाषणातून मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने १८ -१८तास अभ्यास  केला त्यावेळी अभ्यास करण्यासाठी त्याच्या घरी लाईटची सोय नव्हती  ते दिव्या खाली अभ्यास करायचे, सार्वजनिक लाईट बसून अभ्यास  करायचे आता तुम्हाला सर्व सुख सोई, उजेडासाठी प्रतेकाच्या घरी लाईट आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर  यांचासारखा  अभ्यास करा ,बुध्दीवंत बना मोठ मोठ्या हुद्द्यावर जा असे मार्गदर्शन  विद्यार्थ्यांना केले.  

पुजा बाबळे,वैष्णवी घोरबांड, आरती घोरबांड, नंदनी घोरबांड, अंकिता बाबळे,स्मरण शेख,श्रुती इंगोले, प्रीती कोल्हे ,श्रेया इंगोले,पुजा इंगोले,पायल इंगोले, प्रिया इंगोले,आयुष्य  पेदे या शाळेतील चौथी ते  सातवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेब  आंबेडकर यांच्या जिवनावर भाषणे केली. श्री बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.

श्री बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालय जोशी सांगवी तालुका लोहा येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक श्री गोविंद गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व तसेच शाळेतील शिक्षक कर्मचारी श्री वडोळे, मेहेत्रे ,कोकतरे व शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी नागोराव भिसे,संजय दुलेवाड यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी