उस्माननगर, माणिक भिसे। येथील सिध्दार्थ ऐज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळा व जि.प.के .प्रा.( मुला, मुलींची) दोन्ही शाळेतील विद्यार्थी तसेच केंद्रप्रमुख जयवंतराव काळे व सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रमुख मार्गाने लेझीम व ढोलाच्या निनादात घोषणा देत भव्य दिव्य अशी प्रभात फेरी ( रॅली) काढण्यात आली.रॅलीतिली ट्रॅक्टरमधील वेषभूषा पाहून नागरिकांनी शाळेचे कौतुक करित होते.
सकाळी शाळेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारले.त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद व इतर मान्य मान्यवरांना सुपूर्त करताना २६ नोव्हेंबर १९४९ भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन हा सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.
संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार व्हावा म्हणून सम्राट अशोक प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षकाने डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान राजेंद्र प्रसाद व इतर नेत्यांना सुपूर्द करताना चे वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकार करून ट्रॅक्टर मधून गावातील प्रमुख रस्त्याने भव्य प्रभात फेरी लेझीम व ढोलाच्या निनादात आणि घोषणाबाजीच्या स्वरात काढण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक सौ.विद्या वांगे , मुख्याध्यापक काळे, यांच्यासह शाळेतील सहशिक्षक उपस्थित होते. शाळेत सामूहिक संविधान वाचन करण्यात आले.