हदगाव। हदगाव येथील रहिवाशी माजी शिक्षण विस्तार अधिकारी गणपतआप्पा हनवते यांच्या पत्नी सौ सुमनबाई गणपत आप्पा हनवते यांचे दिनाक २९ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय ७५ वर्ष होते.
त्यांच्या पश्चात चार मुले,सुणा,नातू असा परिवार असून दिनाक ३० रोजी हदगाव येथील शेतामध्ये सुमनबाई हनवते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव कदम, सभापती शामराव चव्हाण,डॉ. संजय पवार ,भाजपाचे तालुका अध्यक्षष तातेराव पाटील वाकोडे, बाळासाहेब कदम,संभाजी लांडगे, शिवाजी देशमुख, माजी नगराध्यक्ष प्रभाकर देशमुख, , पंजाबराव देशमुख, डॉ देवराव पाटील बाबळीकर, कैलास बलदवा यासह अनेक नागरीक उपस्थित होते.