अर्धापूर, नीळकंठ मदने। नांदेड़-अर्धापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सायंकाळी ५ वा.तिघांनी पाठीमागून पाळत ठेवून दुचाकीवरून एका वसुली अधीकाऱ्यांची दुचाकी अडवून डोळ्यात मिरचीची पावडर टाकून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील पावनेदोन लाख रुपये असलेली बॅग पळवून नेली. यापुर्वीही येथे दुचाकीवरून पाठलाग करण्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात तिन अज्ञात आरोपींविरुद्ध वाटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड-अर्धापूर राज्य क्र.३६१ या महामार्गावरील आसना नदीजवळील पिंपळगाव म. फाट्यावर दुचाकीचा पाठलाग करताना अडवून लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत यापैकी अर्धापूर पोलीसांनी मुदखेडच्या आरोपींना अटक करुन मुदेमाल जप्त केला होता.१३ डिसेंबरला मंगळवारी एका खाजगी मायक्रो फायनांन्स कंपनीत साईनाथ धाराजी प्रेमलवाड वय (२३) यांनी १०२ खातेदारांकडून १ लाख ८६ हजार ९३५ रुपयांची वसुली करुन जात असतांना त्याच्यावर पाळत ठेवून तिघांनी दुचाकीवरून पाठलाग करुन पिंपळगाव म. येथे सायंकाळी ५:३० वा दुचाकी अडवून डोळ्यात मिरचीची पावडर टाकून चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत वरील रक्कम असलेली बॅग हिसकावून घेऊन तिन आरोपी एका दुचाकीवरून पसार झाले.
हे आरोपी २१ ते २३ वयोगटातील असल्याचे साईनाथ प्रेमलवाड यांनी सांगितले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी भेट दिली,या रस्त्यावर काही दिवस पोलीसांनी पहारा लावला होता, नांदेड शहर जवळ असल्याने येथेच वाटमारीच्या घटना घडत आहेत, याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध वाटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे हे करीत आहेत.