माहूर, राज ठाकूर। दिव्यागांची दप्तरी नोंद नसलेल्याची दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाईल.असे विधान प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख तथा माजी मंत्री बच्चु कडू यांनी केले. माहुर येथील तहसील मार्गावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखा माहूरच्या फलकाचे अनावरण केल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
पुढे बोलतांना अधिवेशनानंतर मंत्रिपदासाठी दबाव वाढवला जाईल असा निर्धार व्यक्त करून मंत्रालय केलं, तर मंत्री पद देणारच नं, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. यावेळी माहूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न पोटतिडकीने सोडविण्यासाठी तहसिलदाराशी चर्चा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आ.बच्चु कडू हे बुधवार दि.१४ डिसें.रोजी माहूरगडला आले होते. प्रथम त्यांनी श्री रेणूका माता मंदिरात व दत्तशिखर येथील दत्त मंदिरात जाऊन पुजा ,आरती केली.
श्री रेणुकादेवी संस्थान कार्यालयात विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी त्यांचा सत्कार केला.त्यानंतर तहसील मार्गावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखा माहूरच्या फलकाचे अनावरण करून तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न समजून घेतले. यावेळी त्यांचे समवेत जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख, तालुकाध्यक्ष अमजद खान पठाण,विधानसभा सचिव शिवचरण राठोड, दत्ता बोबडे,दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव मंगनाळे ,तालुकाध्यक्ष किशोर हुडेकर, शहराध्यक्ष डॉ.बळवंत नागरगोजे,गणेश जाधव, मोतीसिंग ठाकुर,प्रभाकर नेवारे, पंढरीनाथ हुडेकर,अनिल शेट्ये,वैशाली शेंडे,आशाताई जाधव,माऊली गीते यांचेसह मोठ्या संख्येत दिव्यांग बांधव, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.